मोबाईलच्या जमान्यात तरुणाईला संस्काराची गरज : इंदुरीकर महाराज
आष्टी (प्रतिनिधी) सध्याची तरुणाई मोबाईलमध्ये अडकली असून तरुण मुलं मोठ्या प्रमाणात व्यवसनाच्या आहारी जाताना दिसतात. त्यांना संस्कार करण्यात पालक कमी पडतात, म्हणून लहानपणीच मुलांना संस्कार होणे गरेजेचे आहे असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले.
तालुयाती श्रीक्षेत्र वाहिरा येथे संत शेख महंमद महाराज पुण्यतिथी निमित्त यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात भरतो या यात्रा उत्सवाच्या किर्तन प्रसंगी इंदुरीकर महाराज बोलत होते. यावेळी संत शेख महंमद महाराजांचे वंशज ह.भ.प. जब्बर महाराज शेख, ह.भ.प. सोमनाथ मेटे महाराज, सुखदेव महाराज झांजे, सरपंच संभाजी गाडे, सिद्धनाथ मेटे, संजय पगारे, उपसरपंच योगेश झांजे, प्रा. दादासाहेब झांजे, पोलीस पाटील शिवाजी झांजे, भाऊसाहेब झांजे, आण्णा आटोळे, फकड झांजे, प्रा. सिताराम झांजे, दगडू शेख, महंमद शेख आदींसह पंचक्रोशितील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ७ वा. महाआरती होऊन यात्रा उत्सवास सुरुवात झाली. संत शेख महंमद महाराज यांची संपुर्ण माहिती असलेल्या वेबसाईटचे उद्घाटन यावेळी भाविकांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती. रात्री ९ ते ११ वा. ह.भ.प. इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी आभार मानले.
पुढे बोलतांना इंदुरीकर महाराज म्हणाले की, कर्म हाच देव असून आपण जे काम करतो ते मनापासून करा देव मिळाल्याखेरीज राहणार नाही. जो जसे कर्म करेल तसेच त्याला फळ मिळेल. चांगले कर्मच मुतीच्या मार्गाला घेवून जावू शकते. संत शेख महंमद महाराजांनी अहंकार, काम,क्रोध,लोभ,मद,मत्सर आदी विकारांवशी युध्द करुन मनावर विजय मिळवला व योगसंग्राम प्राप्त झाला. त्यांनी आयुष्यभर समाज प्रबोधनाचे कार्य केले, साहित्य लिहीले म्हणून वारकरी पंरपरेत त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
stay connected