धनंजय मुंडेंना सहआरोपी करून फेर आरोपपत्र दाखल करावे – मराठा सेवा संघ आष्टीची मागणी

 धनंजय मुंडेंना सहआरोपी करून फेर आरोपपत्र दाखल करावे – मराठा सेवा संघ आष्टीची मागणी



आष्टी – राज्यातील गाजत असलेल्या धनंजय मुंडे प्रकरणात फक्त राजीनाम्यावर समाधान मानता येणार नाही, तर त्यांना सहआरोपी करून संपूर्ण तपास नव्याने व्हावा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे आष्टी तालुकाध्यक्ष इंजि .तान्हाजी बापू जंजीरे यांच्या वतीने करण्यात आली आहे.



या संदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ सुमारे अडीच महिन्यांपूर्वी सरकारकडे पोहोचले होते. तरीही सरकारने उशीर करत आधी आरोपपत्र दाखल केले आणि नंतर राजीनामा घेतला. यावरून हे स्पष्ट होते की, सरकार सुरुवातीपासूनच धनंजय मुंडेंना वाचवत आले आहे.



मराठा सेवा संघ आष्टीच्या वतीने ही ठाम मागणी करण्यात येते की, आता आरोपपत्रात दुरुस्ती करून धनंजय मुंडेंना सहआरोपी म्हणून समाविष्ट करावे व फेर आरोपपत्र दाखल करावे. फक्त राजीनाम्याने हा विषय संपणार नाही, तर संपूर्ण चौकशी निष्पक्ष होण्यासाठी हा आवश्यक निर्णय तातडीने घ्यावा, असे संघाने सांगितले.


यासंदर्भात लवकरच पुढील पावले उचलली जातील आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठी व्यापक स्तरावर जनआंदोलन छेडले जाईल, असेही मराठा सेवा संघ आष्टीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.