जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय स्वप्नील खाडे यांची निर्दोष मुक्तता.. !

 जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय स्वप्नील खाडे यांची निर्दोष मुक्तता.. !



जामखेड तालुक्यातील सतत अग्रेसर असलेले युवा सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेता ओळख असलेले स्वप्नील खाडे यांना जामखेड पोलिसांनी दि.17 फेब्रुवारी 2022 रोजी अटक करण्यात आली होती त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम (IPC)307 जामखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता

घरात एकटा पुरुष, गर्भवती पत्नी, लहान मुलगा, त्याने त्यांच्या कुटुंबावर संकट आलेलं संपूर्ण तालुक्याने पाहिलं, त्यांच्या आयुष्याचे दिवस पूर्णतः बदलून गेले , ते जामखेड येथे वास्तव्यास आहेत ,ते डेव्हलपर्स मध्ये मजुरी काम करून उदरनिर्वाह भागवतात, दी.19 एप्रिल 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला व ते जामखेड न्यायालयात जामीन सुनावणी सादर करून दि.26 एप्रिल 2022रोजी त्यांना जामिनावर सोडण्यात आले...!


त्यानंतर खटला चालू होता दिनांक 10 मार्च 2025 रोजी अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाचे श्रीगोंदा कोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश एम एस शेख यांनी निर्णय देत स्वप्नील खाडे यांना निर्दोष मुक्तता केल्याचे जाहीर केले

खाडे यांचे वकील Advocate - Patil Sumit K. सुमित पाटील व सरकार पक्षातर्फै अॅड कुलकर्णी हजर उर्वरीत युक्तीवाद ऐकला नि ३६न्यायनिर्णय आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात आले निशाणी ३७/३८ आरोपी तर्फै सी आर पी सी कलम ४३७अ अन्वये जामीनीबाबतची पुर्तता सर्व तिकीटे पंच करुन रदद करण्यात आले संचिका बंद करण्यात आली.

फिर्यादी व साक्षीदार यांच्या जबाबातून व विविध पडताळणीतून

न्यायालयाचा निर्णय 

(१)आरोपी स्वप्नील प्रल्हाद खाडे याने भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार दंडनीय गुन्ह्यांमधून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 235 (1) द्वारे निर्दोष मुक्तता केली आहे.

(२) आरोपीचे जामीनपत्र रद्द केले जाते.

(३)आरोपींना पीबी आणि एसबी रु. 15,000/- फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 437-A च्या उद्देशाने, जे सहा महिन्यांसाठी वैध असेल.

(४)आरोपपत्रात नमूद केलेले मुद्देमाल कलम 1 ते 5 निरुपयोगी असल्याने, माननीय उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठाच्या रजिस्ट्री यांना सूचना दिल्यानंतर अपील कालावधी संपल्यानंतर नष्ट करा.

(५) निकाल थेट संगणकावर लिहिला जातो आणि खुल्या न्यायालयात दिला जातो.

 Court यांनी डिजिटल स्वाक्षरी केली

तारीख: 2025.03.13

तारीख: 10.03.2025.

श्रीगोंदा.

(एम.एस. शेख) अतिरिक्त सत्र न्यायाधीश, श्रीगोंदा. अहिल्यानगर महाराष्ट्र





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.