आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील वामनवस्तीवर भरदिवसा घरफोडी २० तोळे सोन्यासह रोख रक्कम लंपास
आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे जबरी चोरीची घटना शनीवारी भरदिवसा घडली . उंदरखेल येथील वामन वस्तीवरील दोन सख्खा भावंडाचे शेजारीशेजारी घरे आहेत. शेतात काम करत असताना शनिवारी भरदिवसा अज्ञात चोरट्यानी घरफोडी करून २० तोळे सोन्यासह रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील वामन वस्तीवर सुनिल विठ्ठल वामन, बाबासाहेब विठ्ठल वामन ही भावंडे शनिवारी सकाळी घराला लागूनच असलेल्या शेतात काम करत होती . काम करत असताना भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सुनिल वामन
याच्या दिवाणमधील १३ तोळे तर बाबासाहेब याच्या दिवाणमधील ७ तोळे असे दोन भावडांच्या घरातील २० तोळे सोन्यासह रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार मंगेश साळवे , अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ यांनी भेट दिली. उंदरखेल येथील चोरीच्या अनुषंगाने तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू आहे. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले आहे. असे ठाणेदार सपोनि मंगेश साळवे यानी सांगितले.
अंभोरा ठाणे हद्दीत भरदिवसा ही मोठी घरफोडी झाल्याची घटना घडली असुन या घरफोडीचा अंभोरा पोलिसांनी तातडीने तपास करावा अशी मागणी होत आहे.
stay connected