*संतोष देशमुख खून प्रकरनाची हाळ सगळीकडे जाणवली मग मागासवर्गीय विकास बनसोडेच्या हत्तेची का नाही?-डॉ.जितीन वंजारे*
तुम्हाला झालेल्या वेदना,वेदना आहेत आणि मागासवर्गीय आणि आदिवासी लोक जनावरे आहे की काय?त्यांच्या वेदनाचे जातीयवाद करणारे नेते याला जबाबदार, दुसऱ्या तालुक्यातील प्रकरण उचलून धरणारे स्वयंघोषित जातीयवादी विचाराचे नेते स्वतःच्या आष्टी तालुक्यात,मतदार संघात घडलेले अमानुष मागासवर्गीय तरुण विकास बनसोडे हत्याकांड प्रकरणात चिडीचूप आहेत.स्वजातीचा तरुण मारला तर खूप वेदना होतात जातीसाठी मरणारे लोक इतर जातीचा अमानुष हल्ला प्रकरणात जीव गेला तरी मूग गिळून गप्प आहेत अशी नेते समाजाला घातक असतात. माणुसकी यांच्यात जिवंत आहे की नाही. महाराष्ट्रात भोतमांगे, नितीन आगे,सोमनाथ सूर्यवंशी,विकास बनसोडे सारखे इतर हत्याकांड झाले पण त्याला इतक मोठं रूप दिल गेलं नाही एक मराठा सरपंच हत्याकांड झालं की अक्खा महाराष्ट्र सदन आणि संबंध महाराष्ट्र हदरून काढला इडी,सीबीआय आणि सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या, निकम वकिलाची चौकशी लागली हाच तर खरा जातीयवाद आहे. प्रकरण कोण-कोणत्या जातीत घडलं हे पाहून सोशल मीडियावर व्यक्त होणारे बाजारू समाजसेवक आणि नेते खूप झाले आहेत. 'आपला तो बाबू आणि दुसऱ्याच ते कार्ट ' असं समजणाऱ्या जातीवादी भडवेगिरी करणाऱ्या नेत्यांनी स्वतःच्या मनाला एकदा विचारा हा स्वार्थीपणा कितपत योग्य आहे? विकास बनसोडे या तरुणाला बेदम मारलं गेल तो एक ट्रक ड्रायव्हर होता.आष्टी तालुक्यातील पिंपरी धूमरी येथील तरुण विकास बनसोडे याला मालकाने बेदम मारून त्याला दोन दिवस बिना अन्न पाण्यावाचून डांबून ठेवलं अंगावर एकही जागा शिल्लक नाही इतके वळ, सगळं रक्त सखळलेले आहे.प्रति संतोष देशमुख हत्याकांड घडलं तरीही फक्त मागासवर्गीय तरुण आहे म्हणून की काय हे प्रकरण तसच दडवून ठेवलं गेलं? हीच का तुमची समानता? हेच का तुमचं मागासवर्गीय बेगड प्रेम? हैवानी वृत्तीने मागासवर्गीय मुलाला मारलं गेलं, बेदम मारहाणीत त्याचा जीव गेला आणि या असंवेदनशील बीड च्या गेंड्याच्या कातडी च्या एकाही आमदार, खासदारणे सभागृहात हा विषय घेतला नाही? असं का? मराठ्यांचा असला की तो स्वजातीय आहे म्हणून चार चार आमदार खासदार तिथे बोलता आणि हा मागासवर्गीय तरुण बेदम मारलाय त्यावर अत्याचार झालाय तरीही त्याला अत्याचार करणारा भडवा स्वतःच्या जातीचा आहे म्हणून आपण गप्प बसणार आहात का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते मा सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी येथील नेत्याना केला आहे.
आता कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार,आता कुठे गेले ते नेत्यांच्या भाषांनातील पुरोगामीत्व,समानता आणि बंधुत्व,आता कुठे गेले शिव शाहू फुले आंबेडकरी विचार तुमचा मेला की वेदनांचा पूर येतो आणि आणि दुसऱ्याच मेल की कोल्हे कुत्रे जनावर मेल्यागत गप्प बसणाऱ्या हरामखोर नेत्यांच्या जातीयवादी बुद्धीची कीव येते. इतका अमानुष छळ होऊनही येथील यंत्रणा नेते गप्प बसतात आम्ही पण मानस आहोत उद्रेक होऊ देऊ नका रस्त्यावरचा संघर्ष लयास गेल्यास नियतीने इतके बरबाद व्हाल की हाल विचारायला कुत्र पण मिळणार नाही. खोक्या हा पारधी समाजाचा आहे तो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा द्या पण त्याच घर जळणाऱ्या नाजायश औलादी कोण आहेत, त्यांचं जन्म जीवन जंगलात व्यथित करणारी ही आदिवासी जमात हेच भारताचे खरे मूळनिवासी आहेत त्यांनी जंगलात राहायचं नाही काय? मग राहायचं कुठं? मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी त्या समाजाला जवळून ओळखतो अजूनही त्यांच्या घरात ज्ञानाचा प्रकाश नाही त्यांना शिक्षणासाठी शाळा नाही कारण त्यांना मूळ पत्ता नाही घर नाही रहिवाशी प्रमाणपत्र कोणी देत नाही काहींकडे आधार कार्ड पण नाही. इथून उठेव तिथून उठेव करून हा समाज ना घर का ना घाट का करून ठेवणारी येथील यंत्रणा खोक्या ची प्रगती सहन करू शकत नाही.मग त्यांना मागेल ते जंगल द्यायचा कायदा असताना कोणत्या अधिकाराने त्याच घर उध्वस्त केल. वनविभागाने त्याच घर का पाडले?त्याच्या कुटुंबाचा विचार का नाही केला गेला? मुक जनावर आग लावून जिवंत जाळल याला जबाबदार कोण? बर कोणत्या कायद्यात बसून कार्यवाही केली? बर आजपर्यंत वनविभाग झोपला होता का? इतक्या दिवस त्याला तिथे राहूच का दिल? त्याचे जबाबदार तुम्हीच आहात आणि तो आरोपी आहे पण त्याची कुटुंब आणि इतर नातेवाईक यांना पण मारहाण, जाळपोळ का केला गेला? ह्या सर्व प्रश्नांची एकच उत्तर आहे की इथे दलित आदिवासी यांची मोठ मोठी झालेली पोरं यांना बघवत नाही. खोक्या एक गरीब कुटुंबातून वर आलेला नेता होता, त्याने स्वतःच्या हिम्मतीने त्याचा संसाराचा गाडा चालवीला होता त्याच घर उध्वस्त कारणे योग्य नाही. त्याला वयक्तिक सजा द्या जेल मध्ये टाका पण सुडापोटी कार्यवाही करून आपली राजकीय पोळी भाजून घेणारे नेते येथील दोन समाजात भांडणे लावून मज्जा पाहत आहेत.आज जिल्ह्यात वंजारा मराठा दलित अशी लागून आहेत कोणी कोणाच्या कार्यक्रमाला जातं नाही जातीय द्वेष इथे माजला आहे. असल्या गिधाडी प्रव्रतीच्या नेत्यांना राजकारण करण्याचा नैतिक अधिकार नाही. आरोपी ला भारतीय संविधान आणि महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा शिक्षा करेलच पण येथील जातींचे भडवे, धर्मांचे रंडवे जीवाचा आकांत करून स्वजातीच्या गुंडाणा कशी वाचवतात हे पाहताना मन खिन्न आणि उदास होत आहे. आपला समाजाचा आणि जातीचा माणूस असला की त्याच प्रकरण सभागृहात गाजवायचं आणि दुसऱ्या जातिचा असला की साधं त्याच्या घरी भेट सुद्धा द्यायची नाही कारण अत्याचार करणारा ह्याच्या जवळचा नातेवाईक असतो रक्तातला असतो किती किळसवाना प्रकार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून असले जातीवादी धंदे बरे नव्हे. प्रत्येकाने शपथ घेतल्या प्रमाणे ममत्व किंवा आकस भाव न ठेवता सर्वधर्म समभाव ठेवून कार्यवाही करावी कसा सल्ला डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.जिल्यातलं दूषित वातावरण करणाऱ्या येथील नेत्यांवर प्रथम प्रतिबंध घाला समाज आणि बीडकर म्हणून आम्ही एकत्र आहोत. जिल्ह्याची बदनामी करणारे सगळे हरामखोर कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या जवळचे आहेत इतर साधारण माणसं कोणीही नाहीत म्हणून येथील नेते च जातीयवाद करतात समाज नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नेत्यांना प्रतिबंधित करणे हेच योग्य राहील असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
stay connected