महाराष्ट्र अशांत ठेवणाऱ्यांनो, दंगली घडवणाऱ्यांनो जरा थांबा-डॉ.जितीन वंजारे

 *महाराष्ट्र अशांत ठेवणाऱ्यांनो, दंगली घडवणाऱ्यांनो जरा थांबा-डॉ.जितीन वंजारे*



 *विशिष्ट धार्मिक विचाराचे धर्मवादी सरकार आल्यास देशात विकास नाही तर दंगे-फसाद होतीलच-डॉ जितीन वंजारे*

            काल परवा नागपूर मध्ये दंगल घडली, संभाजीनगर मधील औरंगजेब याच्या कबरी वरून वाद निर्माण झाला, इतिहास मिटवण्याच्या नादात येथील सरकारी बुजगावने दंगली घडवू पाहत आहेत. पिढ्यानं पिढ्याची कबरी, ऐतिहासिक स्थळ यांना आत्ता काढायची आहेत. जस की इथे लोकांना दुसरं काही गरजच नाही, महागाई, बेरोजगारी,बाजारीकरण, महागाई हे विषय तूर्तास बाजूला ठेऊन गरज नसताना कबरी उकरून धर्माची ठेकेदारी चालू झाली आहे.येथील सरकार आणि त्यांचे नेते मुख्य मुद्यावरून येथील जनतेचे ध्यान भटकावत आहेत. हे येथील समस्थ जणांशी अवगत असायला पाहिजे. आता काल परवा चा मराठा आरक्षणाचा मुद्दा, लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी योजना, इव्हीएम हटाव मुद्दा, येथील वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, वीजबिल माफी,शेतकरी कर्जमाफी असे महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवून धर्माच्या अन जातिच्या नावावर इथे दंगली घडवल्या जातात. हे सगळं अत्यंत चुकीचे आहे.



            आत्ता काल परवाच प्रकरण धस-मुंढे युती सरकार मधील दोन नेते लढवून गेली सहा महिने महाराष्ट्र अशांत ठेवला. कळीचा मुद्दा मराठा आरक्षण शांत करण्यात फडणवीस यशस्वी. आता नितेश राणे कडून औरंगजेब कबरी आणि मटणाचा विषय काढून लाडकी बहीण व इतर मतदानापुरत्या काढण्यात आलेल्या योजना बंद करण्याचा व नियम व अटी वाढवून निधी लाटण्याचा अन ते झाकण्याचा यशस्वी प्रयत्न येथील सरकार करत आहे. जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा  रीतसर पेशवाई दिमाकाने केलेला हा गेम समाजातील उच्च शिक्षित जाणत्या लोकांनी लक्षात घेतला पाहिजे. सगळं करून जर थकले तर दंगल घडवून जाती जातीत, धर्मा-धर्मात फूट पाडून महाराष्ट्र आणि देश अशांत ठेवणे हे यांचं खूप जून शास्र आहे. येथील बहुजनांनी ओळखून अश्या दंगली थांबवल्या पाहिजेत. नितेश राणे सारख्या व्यक्तींनी अगोदर मटणाचे दुकान टाकावे आणि लोकांना सांगण्यापेक्षा स्वतः,आपले भाऊ, वडील आणि मूल दंगलीत सहभागी करावीत हिंदुत्व आपल्या घरात रुजवावं आणि नंतर बहुजनांची माथी भडकावीत. सरकार सांगितलेल्या किंवा जाहीर केलेल्या शेतकरी वीज बिल माफी, शेतकरी कर्जमाफी, मोफत सिलेंडर, लाखो रोजगार संधी, प्रदूषण मुक्त भारत, नदीजोड प्रकल्प, शेतकरी सन्मान निधी व नवनवीन काढलेल्या योजना तात्काळ बंद करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत आहे कारण राज्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे तिजोरी रिकामी झाली आहे, महाराष्ट्राकडून जमा केलेली जिएसटी रक्कम केंद्राने वापस केली नाही केंद्र सरकार हवालदिल असून भ्रष्टाचारी मोदी च्या जवळच्या लोकांनी सरकार ला धोका देऊन बक्कळ संपत्ती लुटून खाल्ली आणि कर्ज बुडवलं देश खाईत लोटला, अमेरिकेने कर वाढवला असून त्यामुळे देशातील शेअर मार्केट घसरल असून भरलेला पैसा वापस मिळेल की नाही याची शाश्वती गुंतवणूकदाराला नाही त्यामुळे आता सगळं बे भरवश्याच झालं आहे. येथील शिक्षण, सरकारी महामंडळे,सरकारी कंपन्या, सरकारी सुख सुविधा सगळंच बाजारीकरण करून ते प्रायव्हेट तत्वावर येथील जवळच्या उद्योजकांना बेसुमार लुटाण्यास दिले गेले आहे परिणामी भारतात प्रचंड महागाई लुटालूट चालू आहे. येथील सरकार च शासकीय यंत्रनेवर जराही दबाव राहिला नसून येथील राजकारण्यांनी गुंड आणि उद्योजक गोचीडा सारखे पोसून ठेवले आहेत याचा परिणाम म्हणून येथे गुन्हेगारी, भ्रष्टाचार, महागाई वाढली असून देशाला नुसतं लुटून खायचं चार दोन लोकांच्या घश्यात पैसा घालायचा त्यात आपली टक्केवारी ठरवून घ्यायची अशीच तत्व इथे राबवले जात आहेत.यातून कोणी प्रश्न विचारला तर त्याला सरकारी रोब दाखवून जेल मध्ये डांबून ठेवलं जातंय, येथील महापुरुष धर्म जातं पंथ आणि प्रांत व भाषांवाद लावून लोक खेळवत ठेवली जातात मूळ मुद्द्यावरून त्यांचा उद्देश हटवून निरर्थक गोष्टीकडे येथील लोकांचं नेत्यांचे जाणूनबुजून लक्ष केंद्रित केले जातं आहे. येथील धर्माचे ठेकेदार जणू प्रमाणपत्र वाटायला सोडले आहेत, कोण कुणाचा हे ठरवून त्याच्या पत्रावळीवर काय वाढायचं हा नियोजित कार्यक्रम येथील सरकार राबवत आहे. निवडून आयोग शंभर टक्के इव्हीएम मशीन घोटाळ्यात सामील आहे. मोठमोठ्या देशात बॅलेट पेपर वर मतदान घेतले जाते पण इथे मात्र इव्हीएम मशीन वापरल्या जातात, इथे लोकल ट्रेन ला अफाट गर्दी आहे स्वास घ्यायला जागा नाही कारण येथील गरिबी असं असताना स्वतंत्र्य ट्रक देऊन इथे सुटा बुटवाल्यांसाठी बुलेट ट्रेन निर्माण केली जातं आहे तिच्या फेऱ्या मोकळ्या जातं आहेत. त्याची गरज नसताना नाहक पैसा गमावला जातो आहे. इथे गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करून येथील सरकार समांतर दोन गट तयार केले जातात त्यामुळे येथे असमानता नांदू लागली आहे. पण लक्षात असू द्या जिथे तुम्ही आग लावत आहात तिथे जरी तूर्तास तुमचं घर नाही पण त्या अगीच्या वनव्याने एक ना एक दिवस तुमचं पण घर जळून जाणार आहे हे नक्की.मानवी उत्क्रांती त पूर्वजाणी कधीच शेण आणि गो मूत्र पिल किंवा खाल्लं नाही पण येथील गुलामी तपासून पाहणाऱ्या भटवर्नानी तुम्हाला वेळोवेळी मूत पाजून आणि शेण खाऊ घालून तुम्ही अजूनही त्यांचे गुलाम आहात हेच सिद्ध केल आहे, ते हिंदु नाहीत वेळोवेळी ते पात्र बदलतात एकदा सनातनी म्हणतील एकदा वैदिक म्हणतील पण ते ना कोण्या धर्माचे ना लोकांचे ते फक्त शोषणकारी आहेत ते बाहेरचे आहेत ते तुमचा उपायोग करून तुमची माथे आणि टाळके भडकावून दंगली करतील त्यात तुमचे टाळके फुटतील तुम्ही अशांत व्हाल ते एशी मध्ये एशो आरामात परदेश गमन करतील, त्यांची मूल मोठमोठे अधिकारी बनतील तुमची मात्र त्यांनी फेकलेल्या सडक्या विचाराचे गंदे पाईक होतील फोडाफोडी, मारामारी, दंगली होतील भाईचारा नष्ट होईल माणसात माणूस राहणार नाही नारी, शूद्र पशु सम होईल आणि या वर्णव्यवस्थेला अजून बळ देऊन येथे गुलामी करणारे त्यांची मनसोक्त चाटणारे आणि ते सांगतील तसंच घडवणारी येथे व्यवस्था निर्माण होईल. शाळा बंद सरकारी शिक्षण बंद करून येथे रोजगार नौकरी बंद केली जाईल आणि मग तरुणांची माथी भडकावून इथे फक्त भाषवाद धर्मवाद जाती्यवाद निर्माण होईल. हे जर टाळायचं असेल तर शहाणं बना, स्वयंप्रकाशित बना, बुद्धी वीवेक जागा ठेऊन समाजात वागा. अश्या दंगली सारख्या विक्रत मानसिकतेला बळी पडू नका. माणुसकीने नियतीने जगा. दिल्या घेतल्याची जान ठेवा, प्रेम भाईचारा,बंधुत्व समानता, स्वातंत्र्य आणि न्याय व्यवस्था अबाधित ठेवा. असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.

*लेखन-डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर*




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.