नोटबंदी, सक्तीची कोव्हीड लस, तीन शेतकरी काळे कायदे जसे चुकीचे ठरले तशेच वाहन हाय सेक्युरिटी नंबर कायदा चुकीचा ठरणार - डॉ.जितीन वंजारे

 *नोटबंदी, सक्तीची कोव्हीड लस, तीन शेतकरी काळे कायदे जसे चुकीचे ठरले तशेच वाहन हाय सेक्युरिटी नंबर कायदा चुकीचा ठरणार - डॉ.जितीन वंजारे*



   बीड प्रतिनिधी :- सरकार ने घेतलेल्या अनेक निर्णयावर जनतेने मोहर लावू दिली नाही कारण ते चुकीचेच होते. बरेच निर्णय हे येथील जनतेला न परवडणारे होते. कारण नसतानाही केलेली नोटबंदी, गरज नसताना केलेली बुलेट ट्रेन, धार्मिक वादाचा हाय बजेट कुंभमेळा,रेल्वे अपघात,अतिशय घातक साबित झाली त्यातून आऊट पुट काहीच मिळाले नाही राजकीय स्वार्थाशिवाय? पण नोटबंदी मुळे अनेक गोर गरिबांना त्रास सहन करावा लागला. सगळ्या वित्त संस्था गर्भ श्रीमंतांच्या होत्या त्यांना घरबसल्या नोटा बदलून मिळाल्या पण गोरगरिबांना स्वतःच्याच पैशासाठी दोन तीन दिवस उपाशापोटी रांगेत उभ राहावं लागलं. त्यांची हेळसांड झाली कुनाच लग्न मोडल, कोणाचे ऑपेरेशन रोखल गेलं, अनेक माणसं पैशा वाचून मेली पण अघोरीं सरकार ला त्याच सोयरसुतक नव्हतं. फक्त काँग्रेसी सत्ताधारी लोकांकडून वर्षानुवर्षे दाबून ठेवलेली घबाड बाहेर काढून इतका पैसा आला कोठून हा सर्वे करून जास्त पैशाचं विस्लेषण न देता आल्याने दबावतंत्र वापरून डायरेक्ट स्वतःच्या पक्षात इनकमिंग चालू केली आणि विरोधी पक्षांना सुरंग लावून अनेक पक्ष फोडून, तोडा फोडा राज्य करा ही कुटनीती वापरून स्वतःचा पक्ष मजबूत केला. पण यात सामान्य माणूस मेला त्याला अक्षरशः लुटून खाल्लं अनेक बँका बंद पडल्या,हजारो अब्जधीश, कोट्याधीश उद्योजक देशाबाहेर पळून गेले सरकारी बँकाना मोठमोठ्या जवळच्या उद्योजकांना भरमसाठ कर्ज द्यायला भाग पाडलं, त्यांना पळवून भागीदारी करून भारताचा पैसा इतर देशात पाठवला. गेले काळा धन वापस आणायला पण इथलंच धन इतर देशात सुखरूप पोहचून आले. वर्षानुवर्षे दडलेला राम वापस आणला पण पळून गेलेलं अदानी, विजय माल्ल्या, मेहुल चॉकशी,निरव मोदी यांना वापस अनु शकले नाहीत, नोटबंदी हा निर्णय सपसेल खोटा ठरला घातकी ठरला एकही धन दांडग्यावर कार्यवाही झाली नाही मोठं मोठ्या लोकांनी घरात राहून अक्खे पैसे व्हाईट करून घेतले, बदलून घेतले आणि रांगेत मात्र माझा शेतकरी कष्टकरी गोर गरीब थांबला. खरोखर हे चोट्टयांचं, लबाडांचं,सुटा बुटा वाल्या उद्योजकांच, सरकारी पैसा लुटून पळून जाणाऱ्याचं,भ्रष्टाचार करून पक्ष प्रवेश करून मंत्रिपद मिळवणाऱ्याचं सरकार आहे हे जवळजवळ सिद्ध झालं आहे. मी नाही त्यातली कडी लाव आतली नेमकी हीच नीती ह्यांनी वापरली.न खाऊंगा न खाणे दूंगा, मै देश का शिपाही हू, मै आया नही मुझे माँ गंगा ने बुलाया है, करप्शन झीरो करुंगा, महंगाई, बेरोजगारी दूर करुंगा, दरवर्षी 25 लाख सरकारी नौकरी,काला धन वापस लाऊंगा, 25लाख जण धन खाते मे दूंगा,फुकट का राशन और मन का भाषण,हिंदू खतरे मे है, राम मंदिर, कुंभ मेळा बजेट, जिएसटी वसुली, टॅक्स वसुली, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, हिंदू राष्ट्र, हिंदू-मुस्लिम, धर्मवाद जातीयवाद आणि प्रांतवाद भाषावाद हीच कारणे समोर ठेवून इव्हिएम साक्षीने महोदयांनी गेली दहा वर्षांपासून खरोखर देश लुटाला आहे. ते कस आपण सविस्तर पाहू एक सामान्य माणसाला समजा तीस हजार पगार आहे त्यात त्याला तीस टक्के टॅक्स भरावा लागतो म्हणजे नऊ हजार गेले उरले 21 हजार त्यात त्याने गाडी घेतली तर त्याला 50% टॅक्स, खाद्य वस्तू 12%व्याज, कपडे लत्ते 12टक्के व्याज, मेडिसिन उपाचार 12टक्के व्याज, प्रॉपर्टी घेतली टॅक्स भरा, विकली तरी भरा, इन्शुरन्स काढतांना टॅक्स भरा मॅचूरिटीच्या आलेल्या पैशाला टॅक्स भरा खाण्यापासून हागन्यापर्यंत आणि लंगोटी पासून कफन पर्यंत जगातील सर्वात जास्त कर वसुल करणारा हाच भारत देश आहे भावांनो. इथे इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, कस्टम ड्युटी टॅक्स, पे्रोल टॅक्स, व्हॅट, कॅपिटल गेन टॅक्स,सर्व्हिसेस अँड ट्रान्सक्शन टॅक्स,कॉर्पोरेट टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, एक्ससाईझ टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, एडुकेशन टॅक्स, वेल्थ टॅक्स, स्वछ भारत टॅक्स, म्युनि्सिपल टॅक्स, स्टॅम्प ड्युटी टॅक्स, गिफ्ट टॅक्स, टोल टॅक्स, कृषी कल्याण टॅक्स, एन्ट्री टॅक्स, जिएसटी सीएसटी केंद्र आणि राज्याचे वेगवेगळे टॅक्स आहेत. माणसाने कराव काय? कमवावं काय? गमवावं काय? खावं काय? आणि नुसतच जन्माला यऊन टॅक्स देऊन मरावं की काय? अशी परिस्थिती आज भारतात आहे आणि इतका कर वसुल करूनही भारत देश कर्ज बाजारी आहे म्हणजे हे नेमका पैसा घालतात कुठं? कोणाचे गर्दड भारतात हे. भारतात आश्या कर प्रणाली लागू केल्यामुळे जवळजवळ मागील पाच वर्षात लाखो उद्योजकाणी सौदी अरेबिया आणि युरोप देशातील नागरिकत्व स्वीकारलं आहे. आणि होय ह्याच कारणाने छुप्या मार्गाने अमेरिकेत घुसलेल्या भारतीयांना हाथकड्या घालून ट्रम्प तात्यांनी हाकलून दिल, शेट चा खरपूस समाचार घेतला शेट नुसतं हसत राहिले. आपल्या देशाला काही दिवसांनी गुलामी नक्की करावी लागणार हे नक्की.आणि ह्याला जबाबदार फक्त शेट असतील.

       कोव्हीड काळात बळजबरी लस दिल्याने अनेक लोकांना लस घ्यायची गरज नसतानाही त्यांना लस दिली गेली, जागतिक आरोग्य संघटनेने त्या लसी मुळे रक्तात गुठळ्या होतात हे सिद्ध केल. केवळ सहा महिने संशोधन करून आर एन ए स्ट्रेन लसिच कॉन्ट्रॅक्ट देऊन तयार करून घेतली आणि तिच्यावर करोडो रुपयाच बजेट टाकून कोव्हीड फंड, पीएम फंड, जिएसटी फंड जमा करून येथील जनतेला खूप लुटलं गेलं. आज दिवसाला खेडोपाडी एक तरी हार्ट अटॅक ने मृत्यू ची बातमी येत आहे. जनतेत कुचबूच चालू आहे की लस घेतल्या पासून कमजोरी आली, कोणाची शुगर वाढली कोणाला बिपी चा आजार चालू झाला तर कोणाच्या अतिरिक्त स्टेरॉईड मुळे किडन्या लिव्हर खराब झाले. हे महापाप कुठे फेडणार, काहींना नपुसंकता आली कोणाचा घरचा कर्ता पुरुष गेला घर वाऱ्यावर आलं खूप जुलूम केला त्या काळात सक्तीची लस देऊन. माईस लेकरू पारख झालं कोणी कोणाला हाथ लावणा माणुसकी मेली की काय अशी परिस्थिती झाली होती. घाबरून घेतलेल्या सक्तीच्या लसीने लोक वाचली तर नाहीत. पण मेल्यानंतरही त्यांच्या कुटुंबियांना काहीच मदत नाही केली.कारण गेल्या सत्तर वर्षाची कामांची यादी मागणाऱ्या शेट ने कुठेही स्वजाहिरात करण्याच्या मोहातून बाहेर येऊन आपला अभिमानाने मी केलय सांगणाऱ्या लसीच्या कार्डवरून फोटो लाज-काज काढून टाकला.ह्यांनी विकसित केलेल्या स्पेस टेक्नॉलॉजीचे रस्ते एकाच वर्षात फक्त पावसाने अक्खे उखडले, पूल बांधकाम करतानाच पडले,हजारो लोक पाण्यात बुडून, पुलाखाली चिरडून मेली,योजना निवडणुकी पुरत्याच मर्यादित राहिल्या, हटवायला गेले कौटुंबिक राज्याश्रय पण स्वतःच्या पाच दहा पिढ्याचं सेट करून बसले,अक्ख्या देशातील भ्रष्टाचारी एकत्र करून त्यांची टोळी निर्माण केली त्यांच्या मागे इडी, सीआयडि, सी बी आय, इन्कम टॅक्स मागे लावून सगळे भीतीपोटी एकत्र केले आणि त्यांचा अवैध पैसा वापरून सत्तेची आसन भोगातायत? पण येथील सामान्य जनतेचं काय? कोव्हीड मध्ये गेलेल्या निष्पाप बळीच काय? लसीमुळे मेलेल्या हजारो जीवांचं काय? लस घेऊनही मेल्यावर पाच लाख देणार होते त्याच काय? पीएम फंडात, कोव्हीड फंडात आणि जिएसटी रिटर्न मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच काय? येथील गुलाम मीडिया हे कधीच दाखवणार नाही.

     शेतकरी कायदे आणले त्याला विरोध केला तो विरोध नसता केला तर अदाणी आणि अंबानी यांच्या घश्यात शेतकरी आणि शेतजमीन गेली असती. जगातील एकमेव उदार राजा शेतकरी आहे की ज्याच्या मालाची किम्मत तिथे एसी मध्ये बसलेले भडवे ठरवतात ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि माझा शेतकरी राजा या कृषिप्रधान देशाचा कणा आहे. त्याला हमीभाव नाही, त्याला दिवसा लाईट नाही, त्याला कुठलीच सेक्युरिटी नाही त्याच कर्ज माफ होत नाही? ह्यांनी चूकीचे बनवलेले कायदे रोकवण्यासाठी आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला, येथील चुकीच्या धोरणामुळे हजारो शेतकरी रोज आत्महत्या करतात. येथील नदीजोड प्रकल्प, मोफत विद्युत धोरण, कृषी योजना, टेक्नॉलॉजी, यंत्र सामुग्री हायटेक शेती ह्याकडे कोणीच लक्ष देत नाही मात्र भ्रष्टाचार करून करोडो खाणाऱ्या औलादी इथेच आहेत. लाज वाटत नाही लाखो रुपये कमावणाऱ्या हरामखोर औलादी, करप्ट अधिकारी, जनसेवक, सरपंच, नेता, मंत्री येथे घरकुल, विहीर,कांदाचाळ, पशु योजना, शेतकरी योजना देण्यासाठी टेबल खालून शेतकऱ्यांकडून पैसे घेतात अरे थू तुमच्या जिंदगीवर.

     शिक्षण, विद्युत, सरकारी भरती, शाळा, सरकारी कंपन्या सगळ्यांचा बाजारीकरण करून तिथे खाजगीकरण आणून आरक्षण खतम केल, नोकऱ्या संपवल्या, सरकारी कंपन्या धन दांडगायांच्या घश्यात घातल्या,मागासवर्ग योजना बंद केल्या, दलित, आदिवाशी, महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत, सगळीकडे शुकक्षुकाट करून शेट आता वाहनातून पैसे कामावण्याच्या नादात आहेत नंबर प्लेट हाय सेक्युरिटी करणार म्हने? साहेब आम्ही सांगितले ते रेट भरू पण तुम्ही हे हाय सेक्युरिटी करूनही गाडी चोरी गेल्यास जबाबदारी घेऊन आम्हाला त्या गाडीची भरपाई देणार आहात का? का हा ही तुमची जनतेचा पैसे उकळण्याची पैसे कमाऊ योजना आहे? यातून जनतेला काय फायदा ते तरी सांगा? नंबर प्लेट चे छोट्या गाडयांना चारशे मोठ्या गाडयांना आठसे वरतून जि एस टी म्हणजे निव्वळ लुटालूट, लाडक्या बहिणीला इकडून मतांपुरत बजेट द्यायचं आणि दाजीकडून अक्ख लुटायचं हे धंदे बरे नव्हे शेट, तरीही गोबर भक्तांनो असेही महागाई मध्ये आता सायकली शिवाय पर्याय नाही आणि लसीमुळे हार्ट अटॅक येऊ नये म्हणून नालीच्या वासातून गॅस पाईपलाईन करुन चहा करणारे, आलू से सोना करणारे, न शिकता डिग्री घेणारे, सन्याशी मॉडर्न सायंटिस्ट सायकल चालवण्याचा फुकटचा सल्ला नक्की देतील. असो कामावण्याचे मार्ग बंद, आणि इकडून तिकडून पैसे कामावलेच तर त्या पंधरा ते वीस वेगवेगळ्या टॅक्स मार्फत सरकार पैसा वसुल करून तुम्हाला आम्हाला कंगाल केल्याशिवाय शेट गप्प बसणार नाहीत. त्यामुळे राषणवर आलेल्या भातात ज्वारीची भाकर बुडवून भिकारी जीवन जगण्यापेक्षा क्रांतिकारी जीवन जगा. प्रेमाने वागा, सत्याची बाजू घ्या, नियतीने वागा, फक्त आपला, धर्माचा जातीचा म्हणून समर्थन करू नका, धर्म ही अफूची गोळी आहे ती सत्तेत वापरली तर सगळेच अपाहीज होऊन देश बरबात होईल हे महामानव विश्वरत्न घटनाकार डॉ बाबासाहेबांचं वाक्य लक्षात घ्या आणि आपल्यात सलोखा ठेवा आपल्या हक्क आणि अधिकारांवर सजक रहा. सावध रहा नुसते गोबरभक्त होऊन षंड राहू नका.....!

   *लेखन मा. सम्राट डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर*




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.