शुभंकरोति साहित्य परिवाराचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन
साहित्य यज्ञ हेच ध्येय असलेल्या शुभंकरोति साहित्य परिवाराचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पुणे येथे ६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ व श्रेष्ठ गझलकार माननीय ए. के. शेख भूषवणार आहेत.
संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते प्रसिद्ध गझलकारा माननीय ममताताई सिंधुताई सपकाळ यांची उपस्थिती.
या दोन मान्यवरांची मुलाखत स्वागत अध्यक्ष माननीय गझलकार श्री किरण वेताळ व माननीय गझलकार रवींद्र यशवंतराव (देशमुख) घेणार आहेत.
या संमेलनाचे उदघाटन माननीय उद्योजक व साहित्यिक राजीव श्रीखंडे यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय दिपक पाटील
(सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी
पालघर जिल्हा) साहित्यसंपदेचे प्रशासक/प्रकाशक कवी वैभव धनावडे, अलिबाग यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याचबरोबर संत साहित्यिक प्राध्यापक रामकृष्ण दादा पाटील, पुणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर निशिकांत श्रोत्री, पुणे, डॉक्टर मधुसूदन घाणेकर, पुणे, शुभंकरोति साहित्य परिवारच्या संस्थापिका सोनाली जगताप, मुंबई, मुख्य प्रशासिका व समाजसेविका डॉक्टर माया दिलीप यावलकर, वरुड इत्यादी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
या साहित्य संमेलनात काव्य वाचनाची स्पर्धा घेण्यात येणार आहे. पुढारी वृत्तवाहिनीचे पत्रकार, कवी व गझलकार पंकज दळवी, मुंबई आणि कवयित्री व गायिका अरुणा मुल्हेरकर, अमेरिका हे दोघे या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.
विशेष गोष्ट म्हणजे शुभंकरोति परिवारातील साहित्यातून ज्या पुस्तकांची निर्मिती झाली आहे अशा पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे.
शुभंकरोति साहित्य/कला पुरस्कार, शुभंकरोति पुस्तकरत्न इत्यादी पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
समूह प्रशासिका व मार्गदर्शिका प्राध्यापिका सुमतीताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आशीर्वाद म्हणून दरवर्षी शुभंकरोति परिवारातील विशेष साहित्यिकाला/साहित्यिकेला देण्यात येणारा "साहित्य गुणगौरव पुरस्कार" या वर्षी साहित्यिका राधिका भांडारकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
शिल्पा चऱ्हाटे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
stay connected