महेश सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा भीमराव धोंडे यांचा मनोदय

 महेश सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा भीमराव धोंडे यांचा मनोदय




 आष्टी ( प्रतिनिधी ) :- आष्टी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला महेश 

(कडा) सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा मनोदय माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बोलून दाखवला. 



    रविवारी कडा येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने साखर कारखाना सुरू होणे महत्त्वाचे आहे.स्वतःच्या कार्यक्षेत्रात साखर कारखाना नसेल तर बाहेरच्या कारखान्याला ऊस देताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो.उसतोड उशिरा होते, भाव चांगला मिळत नाही, पैसे वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे आपला हक्काचा कारखाना असणे महत्त्वाचे आहे.



 सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे २००७ पासून महेश ( कडा ) सहकारी साखर कारखाना बंद होता आणि त्यानंतर महाराष्ट्र सहकारी बँकने  कारखाना ताब्यात घेतला होता. कारखाना एनपीएत गेला होता त्यानंतर बऱ्याचवेळा  हा कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्यासाठी अनेकदा टेडंर काढण्यात आले होते.कोणीही कारखाना चालविण्यास घेतला नाही म्हणुन विद्यमान संचालक मंडळानेच आता हा कारखाना चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 



हा कारखाना सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्याशी चर्चा देखील केली आहे.लवकरच याविषयी सविस्तर कार्यवाही संदर्भात भेटणार आहे. हा कारखाना सुरू करण्याचा अन्य कोणाचा इरादा असेल तर आपण त्यालाही आडकाठी आणणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले . साखर कारखाना सुरू राहिला तर फक्त कामगार आणि शेतकरी यांचाच फायदा होतो असे नाही तर इतर अनेकांनाही वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार प्राप्त होत असतो.त्यामुळे आष्टी तालुक्यातील साखर कारखाना सुरू झाला तर त्याचे जनतेकडून स्वागतच होणार आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.