वाहिरा येथील युवकाचा अपघातात मृत्यू

 

वाहिरा येथील युवकाचा अपघातात मृत्यू




नगरहुन दुचाकीने वाहिऱ्याकडे जात असलेल्या युवकाला पाठीमागुन येणाऱ्या टेम्पोने उडवल्याने झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाल्याच घटना घडली आहे .
वाहीरा येथील परवेज बशीर शेख वय 33 हा युवक दुचाकी क्र . MH 23 BA 4871 वरून आहिल्यानगर येथील काम आटोपून घराकडे जात असताना वाळूंज बायपास येथे अशोक लेलँड क्र . MH 16 CD 8373 ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार परवेज शेख याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . मयताचे शवविच्छेदन नगर येथे करण्यात आले असुन आज दि . 25 मार्च रोजी दुपारी 12.30 वा. वाहीरा येथे दफनविधी होणार असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य प्रा . दादासाहेब झांजे यांनी दिली आहे .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.