तालुक्यातील मच्छिंद्रनाथ गड ते कानिफनाथ गड होणार रोपवे, कॅबिनेटमध्ये मंजुरी

 तालुक्यातील मच्छिंद्रनाथ गड ते कानिफनाथ गड होणार रोपवे, कॅबिनेटमध्ये मंजुरी 



------------------------------------------

आष्टी-भारतातील मच्छिंद्रनाथनाथाची एकमेव संजीवनी समाधी असलेल्या देवस्थानावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असताना येथील नाथ भक्तांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी मच्छिंद्रनाथ देवस्थानचे विश्वस्त तथा आमदार सुरेश धस यांनी शासन दरबारी पाठपुरावठा करत कॅबिनेट मध्ये स्वतःराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी तालुक्यातील सावरगांव मायंबा ते पाथर्डी तालुक्यातील असलेल्या कानिफनाथ देवस्थान या 3.6 कि.मी.अंतरावर रोपवे ची मान्यता दिली असून,या सुविधेमुळे नाथभक्तांच्या वतीने आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री व राज्यशासनाचे आभार मानले आहेत.

            राज्याच्या शासनाच्या पर्यटक विभागाने राज्यात 

NHLML कंपनी मार्फत नविन 29 पर्यटनठिकाणी रोपवे सुरु करण्याचा करार केला असून,यामध्ये 3.6 कि

मी.साठी आष्टी तालुक्यातील मायंबा मच्छिंद्रनाथ गड ते पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ देवस्थानचा समावेश करण्यात आला असल्याने नाथभक्तांची सोय होणार आहे.यामुळे रोपवे मुळे नाथभक्तांना या स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.




--------------

शब्दांचे पक्के...देवेंद्र बाहुबली..!

-------------------------------------

दि. 5 फेब्रुवारी रोजी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे संजीवन समाधी मंदिर भूमीपर्यंत सोहळ्यास उपस्थित होते त्यावेळी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड देवस्थान ट्रस्ट व श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी यांनी श्री. क्षेत्र मढी ते श्री.क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड (मायंबा) ते क्षेत्र कानिफनाथ गड मढी (मायंबा) रोप-वे यास मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब व केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी साहेब यांच्या सहकार्याने त्या कामास शासनाची मान्यता मिळाली असल्याने आष्टी तालुक्यातील क्षेत्र मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी व लगतच पाथर्डी तालुक्यात असणारे श्रीक्षेत्र कानिफनाथ संजीवन समाधी हे

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हे हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथ व कानिफनाथ  यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात.सदरील रोप-वे मुळे येथील स्थानिक पर्यटनास चालना मिळणार असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल.भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."शासनाच्या राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम-पर्वतमाला" अंतर्गत श्री क्षेत्र सावरगांव (श्री मच्छिंद्रनाथ गड) ते श्री क्षेत्र मढी (चैतन्य कानिफनाथ गड) ते  या ३.६ कि.मी. हवाई अंतरामध्ये रोप-वे बसविन्यास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच केंद्रीय मंत्री, श्री.नितीनजी गडकरी साहेब तसेच उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री.अजितजी पवार साहेब यांचे खुप खुप धन्यवाद...!

-सुरेश धस, आमदार 

----------------



---------------

या प्रकल्पांमुळे बीड-नगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल.ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल.स्थानिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल.ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील पर्यटन आणि दळणवळण क्षेत्रात मोठी सुधारणा होईल.

-सुरेश धस मच्छिंद्रनाथ देवस्थान विश्वस्त तथा आमदार

------------------------------------------

-------------

या प्रकल्पांची अंमलबजावणी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड (NHLML) मार्फत होणार आहे. यासाठी राज्य सरकार आवश्यक ती मदत करणार आहे. 'पर्वतमाला' योजनेअंतर्गत रोपवे प्रकल्प दोन पर्यायांद्वारे राबवले जाणार आहेत. पहिला पर्याय जमिनीचा आहे. त्यानुसार सरकारी मालकीची जमीन एनएचएलएमएलला ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली जाईल. इतर विभागांच्या मालकीची जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करून ती एनएचएलएमएलला भाड्याने दिली जाईल.खासगी जमीन असल्यास ती संपादित करून एनएचएलएमएलला दिली जाईल.

---------------------------------------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.