गावकऱ्यांनी व्यक्त केले आ.प्रकाश सोळंके,जयसिंग सोळंके यांचे आभार. *- उपळी कुंडलिका धरणातून पाणी सोडले.* *- १३ गावे अन् वाड्या वस्त्यातांड्याना दिलासा*

 गावकऱ्यांनी व्यक्त केले आ.प्रकाश सोळंके,जयसिंग सोळंके यांचे आभार.
*- उपळी कुंडलिका धरणातून पाणी सोडले.*
*- १३ गावे अन् वाड्या वस्त्यातांड्याना दिलासा* 





वडवणी / प्रतिनिधी 

आ.प्रकाश सोळंके यांच्या प्रयत्नातून व युवा नेते जयसिंग सोळंके यांच्या हस्ते उपळी येथील कुंडलिका धरणातून 19 मार्च 2025 बुधवारी रोजी सकाळी 11 वाजता नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. 


याबाबत अधिक वृत्त असे की, वडवणी तालुक्यातील उपळी येथील कुंडलिका धरणातून शेतकऱ्यांच्या हितासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने आ.प्रकाश सोळंके यांच्या कडे केली जात होती. या मागणीला प्रथम प्राधान्य देत आ.प्रकाश सोळंके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकारी यांनी धरण साईटवर जाऊन पाणीसाठा किती प्रमाणात शिल्लक आहे. याची चाचपणी केली आणि आ. प्रकाश सोळंके यांच्या सुचनेनुसार लागलीच प्रकिया सुरू केली. या धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी खुद्द माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते जयसिंग सोळंके यांनी उपस्थिती दर्शवुन नदी पात्रात पाणी सोडण्याचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा व अधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार केला. नदी पात्रात पाणी सोडल्याने धरणाखालील उपळी,लोनवळ बाबी,कुप्पा,

सुलतानपुर,दुकडेगांव,चिंचाळा,धानोरा,राजेवाडी,केंडेंपिंप्री,पुनंदगांव,परडी माटेगांव सह आदी वाड्या, वस्त्या, तांड्यावरील गावांना, शेतकऱ्यांना, पशुधनांना या मुळे मुबलक पाणी मिळणार आहे.यावेळी माजी सभापती प्रशांत सावंत, नगराध्यक्ष शेषेराव जगताप, सभापती संभाजी शिंदे,डॉ.दत्तात्रय दुधाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य औदुंबर  सावंत, नगरसेवक सचिन सानप, माजी सरपंच सुभाष सावंत, माजी सरपंच प्रविण सावंत, चेअरमन दत्तात्रय मायराने,वसंत आबा सावंत, युवा नेते ॲड.आनंद काळे, तानाजी आजबे, संचालक सचिन लंगडे, सरपंच माधव शेंडगे, सरपंच सुभाष आजबे,रामराव पवार, ज्ञानोबा राठोड, रामराव चव्हाण,बबन भिसे, सरपंच प्रल्हाद सोनवणे, दिनेश सावंत, वसंत वडचकर, नारायण बडे, ॲड.प्रदिप शेळके,शेख ताहेर, सचिन हलकर, विजय मोरे, राजाभाऊ काळे,बबन आडे सह आदींची उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.