११ मार्च ला वाहिरा येथे संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांचा यात्रा उत्सव

 ११ मार्च ला वाहिरा येथे संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांचा यात्रा उत्सव




आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील वाहिरा येथे संत शिरोमणी शेख महंमद महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.



फाल्गुन शुध्द नवमीच्या रात्री हिंदु मुस्लिम धर्मातील भाविक शेख महंमद महाराजांच्या समाधीवर चंदनलेप, फुलांचा हार व चादर अर्पण करुन यात्रा उत्सवाला प्रारंभ होतो तर दशमीच्या दिवशी ग्रामस्थांच्यावतीने नैवद्य मलियाचा प्रसाद अर्पण केला जातो. यादिवशी शेख महंमद महाराजांची पालखी मिरवणूक टाळ, मृदंगाच्या गजरात, आनंदी वातावरणात बंगल्यापासून समाधीपर्यंत येते. सर्व धर्मियांच्या सहकार्याने यात्रोत्सवात आजही

राज्यातील व राज्याबाहेरील सर्व धर्मिय भक्त सहभागी होतात. यात्रेच्या दिवशी सकाळीच पुजा विधी करुन दर्शन रांग सुरु होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. 

अनेक वर्षांपासून पुणेकरांचे विविध विषयांवरील नाटके तसेच संत जीवनावरील चित्रपट सादर झाली. 

या वर्षी आत्रे निमित्ताने समाज प्रभोधन करा ह. भ. प. इंदोरीकर महाराज यांचे ९ ते ११ या वेळेत  जी. प. प्रा. शाळेच्या प्रागणात कीर्तन  होणार आहे. या कीर्तनाचा पंच कृषितील भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान वाहिरा ग्रामस्तानी केले आहे.

हा यात्रा उत्सव शाकाहारी आणि सद्विचारांचा असल्यामुळे यात्रेमध्ये भक्तगण हा स्वतःहून स्वयंशिस्त पाळतात. त्यामुळे समाजाचा समाजाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.



________

संत शिरोमणी शेख महंमद महाराज हे एक प्रसिद्ध संत होते, जे सोळाव्या शतकात होऊन गेले. ते संत तुकारामांचे समकालीन होते आणि त्यांना कबिराचे अवतार मानले जाते, तसेच ते हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक होते. 

_______

शेख महंमद महाराजांचा कार्यकाळ म्हणजे सोळाव्या शतकात होऊन गेले. त्यांनी मराठी, हिंदी, उर्दू आणि फारसी भाषेत काव्यरचना केली.  त्यांनी 'योगसंग्राम', 'पवन विजय', 'निष्कलंक प्रबोध' आणि 'ज्ञानसागर' यांसारखे ग्रंथ लिहिले तसेच अनेक अभंग लिहिली. त्यांचे गुरू चांद बोधले होते, ज्यांनी त्यांना ज्ञानेश्वरीची प्रत भेट दिली होती. 

संत तुकाराम आणि संत शेख महंमद यांच्या मैत्रीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. 



त्यांची कबर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे आहे, जिथे दरवर्षी त्यांची स्मृती साजरी केली जाते. त्यांच्या साहित्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे आणि मानवी मूल्यांचे महत्त्व सांगितले आहे. 

अद्वैत वेदांताचे अनुयायी:

ते हिंदू तत्त्वज्ञानाच्या अद्वैत वेदांत शाळेचे अनुयायी होते. 

ते राज महंमद आणि फुलाई मातेच्या पोटी अवतारी संत म्हणून जन्माला आले असे म्हटले जाते. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा प्रचार करत असले तरी त्यांचा सुफी संप्रदायाशी संबंध होता असे इतिहासकारांनी नोंदवले आहे. 

ते प्रबोधनकार आणि विज्ञानवादी संत म्हणून ओळखले जातात.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.