अंभोरा येथे महिलेला मारहाण


अंभोरा येथे महिलेला मारहाण




आष्टी प्रतिनिधी -
आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील एका महिलेला मारहाण करण्यात आली असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत फिर्यादी महिलेने उपोषणाचा इशारा दिला आहे .




अंभोरा येथील रोहीणी दत्तु थोरात वय -34 वर्षे  यांनी पोलीस ठाणे अंभोरा येथे फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे . फिर्यादीत त्यांनी सांगितले आहे की दिनांक- 25/02/2025 रोजी रात्री 09.00 वा सुमारास अंबेश्वर मंदिरा मध्ये किर्तन चालु असल्यामुळे मी, मुलगा सार्थक मुलगी दिक्षा असे आम्ही दुचाकीवर अंबेश्वर मंदिरात गेलो होतो .किर्तन झाल्यानंतर आम्ही जेवन केले व रात्री 10.00 वा सुमारास मी माझ्या मुलासह घरी जात असताना गावातील लहानुबाई दत्तु ओव्हाळ, ही आमचे गाडीला आडवी झाली तेव्हा मी माझे मुलीस म्हणाले की गाडी बाजुला घे. तेव्हा मुलगी दिक्षा हीने गाडी बाजुला घेतली त्यानंतर काही एक कारण नसताना बापू खाकाळ पूर्ण नाव माहीत नाही. अक्षय बापु खकाळ, लहानुबाई ओव्हाळ व बापु खकाळ याची बयको पुर्ण नाव माहीत नाही यांनी मला अगोदर लाथाबुक्याने मारहाण केली त्यानंतर लहानुबाई ओव्हाळ हीने रोडवरील पडलेली काठी माझ्या डोक्यात मारून मला जखमी केले बापु खकाळ याने माझ्या अंगावरील साडी ओढुन काढुन माझ्या मनाल लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व माझ्या माझी मुलगी दिक्षा हीच्या दोन्ही हातावर लाकडी काठीने मारून मुक्का मार दिला. त्यानंतर अक्षय बापु खकाळ याने माझा मुलगा सार्थक याचे गळा दाबीत त्यास पाठीत लाथाबुक्याने मारहाण केली व बापु खकाळ यांची बायकोने माझे केस ओढुन खाली पाडुन मला शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. व भांडणाचे झटापटीत माझे सोन्याचे कानातले व गळयातील सोन्याचे मंगळसुत्र कुठेतरी गहाळ झाले आहे. तसेच त्यानंतर माझ्या डोक्यातुन जास्त रक्त येत असल्याने मला काही ग्रामस्थांनी अंबेश्वर हॉस्पिटल अंभोरा येथे घेवुन गेले . अशी फिर्याद रोहीणी दत्तु थोरात यांनी दिली असुन आरोपींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा मी उपोषण करणार असा ईशाराही त्यांनी दिला आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.