*सर्वपरिचित,मनमिळावू अन् कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक काशिनाथराव राठोड सेवानिवृत्त*
वडवणी/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात सर्वपरिचित असणारे मनमिळावू अन् कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक काशिनाथराव राठोड हे आपली पोलिस प्रशासनातील सेवा पुर्ण करुन आज सेवानिवृत्त होत आहेत. सर्वांकडून या त्यांच्या सेवावृत्ती नंतरच्या वाटचालीसाठी त्यांना सर्वस्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
काशिनाथराव शाहूराव राठोड यांचे मुळगाव भवानवाडी तांडा तालुका बीड जिल्हा बीड सध्या ते वास्तव्यास बीड शहरामध्ये असून त्यांचा जन्म 1967 साली झाला. शालेय शिक्षण पहिली ते दुसरी त्यांच्या मुळ गावीच झाले.आणि तीन ते सात पर्यंत पोखरी येथील शाळेमध्ये व आठ ते दहा पर्यंत शिवनी हायस्कूल या ठिकाणी झालं. महाविद्यालय शिक्षण हे बीडच्या केएसके कॉलेज या ठिकाणी झाले. कुटुंबाची परिस्थिती जेमतेम,व्यवसाय म्हणाल तर शेती,कुटुंबात शेती हाच प्रमुख व्यवसाय म्हणून वडिलांनी शेती जोपासली. भाऊ सुद्धा शेतीचा करतो. श्री.काशिनाथराव राठोड हे 15/ 2/ 1988 मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले. सुरवातीला धारूर पोलिस स्टेशन पाच वर्ष, माजलगाव पोलिस स्टेशन मध्ये चार वर्षे,वडवणी पोलीस चौकी होती त्यावेळी तिथे सहा वर्ष, त्याचबरोबर तलवाडा पोलिस स्टेशन या ठिकाणी तीन वर्ष, सिरसाळा या पोलीस स्टेशनमध्ये सहा वर्ष आणि परत वडवणी पोलीस स्टेशनला पाच वर्ष सेवा दिल्या नंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक म्हणुन त्यांनी पोलीस मुख्यालयामध्ये पाच वर्ष सेवा दिली. असा त्यांचा 37 वर्षाचा सेवाकाल आज संपतोय. 31 मार्च 2025 ला ते सेवानिवृत्त होत आहेत. निश्चितच त्यांनी आपल्या शासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट असं योगदान देत पोलीस प्रशासनामध्ये अत्यंत प्रमाणे आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून बीड जिल्ह्यातील जनतेकडून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 37 वर्षाच्या आपल्या सेवेमध्ये कोणताही धब्बा न लागता. अत्यंत प्रामाणिक सेवा दिली. ज्या ठिकाणी त्यांनी सेवा दिली त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी असतील अथवा सहकारी कर्मचारी असतील कोणाचाही अपमान होईल असे ते वागले नाही. त्यांची वागणूक अत्यंत चांगल्या प्रकारे सर्वांनाच मिळाली. म्हणूनच सर्वांना ते आपले स्नेही करण्यात निश्चितच यशस्वी झाले.या सोबतच त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवण्यावर भर दिला. गोरगरिबांना सदैव साथ देणारे अधिकारी म्हणून काशिनाथराव राठोड यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मुलीचा विवाह स्नेही मंडळीच्या साक्षीने 2016 मध्ये पार पडला. मुलींचे उच्च शिक्षण झाले असून मोठा मुलगा स्वप्निल राठोड हा सिव्हिल इंजिनिअर असून तो अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये जॉब करतो आहे. त्याचबरोबर किरण राठोड हा लहान मुलगा मुंबई पेट्रो केमिकल इंजिनिअर म्हणून आपला जॉब करतोय. असा परिवार पोलिस उपनिरीक्षक काशिनाथराव राठोड यांचा आहे. आई-वडिलांना सर्वस्व मानणारे काशिनाथराव राठोड हे वडिलांच्या तत्त्वावर आजही मार्गक्रम करत आहेत. त्यांचा लहानपणीचा कार्यकाल म्हणजेच पोलीस भरती होण्यापूर्वीचा एक कुस्तीपटू म्हणून ते गावोगावी यात्रेतील कुस्ती फड गाजवत असत. वडिलांना आपला मुलगा पैलवान व्हावा म्हणून काशिनाथरावांनाही कुस्तीची आवड होती. महाविद्यालय व आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठा पर्यंत कुस्ती स्पर्धेत भाग घेतला. ती आवड त्यांनी जोपासली. ज्यांनी त्यांना घडवलं अशा आई-वडिलांना ते आपल्या जीवनाच्या कारकीर्दीचे श्रेय देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पोलीस स्टेशनला सेवा देत असताना आपल्या 37 वर्षाच्या सेवेत अनेक वेळा आणीबाणीच्या वेळी देखील वरिष्ठांनी सोपवलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावण्याची भूमिका काशिनाथराव राठोड यांनी पार पाडली. आज ते आपल्या पोलिस सेवेतून अर्थात पोलिस उपनिरीक्षक पदाची सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त होत आहेत. निश्चितच श्री काशिनाथ राठोड यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या देखील शुभेच्छा.
stay connected