विवाह जुळवण्यामध्ये मध्यस्थ कमी झाले म्हणून वधु वर सुचक केंद्राची गरज वाढली ..इंजि. तानाजी( बापू )जंजिरे

  विवाह जुळवण्यामध्ये मध्यस्थ कमी झाले म्हणून वधु वर सुचक केंद्राची गरज वाढली ..इंजि. तानाजी( बापू )जंजिरे



 

        आष्टी (प्रतिनिधी) 

         जुन्या काळामध्ये विवाह जुळवण्याचे काम गावातील मध्यस्थ करायचे. आता परिस्थिती बदलली आहे. सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या मध्यस्तांचे संख्या अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे विवाह जुळवण्यासाठी वधु वर सुचक केंद्र पुढे येऊ लागले आहेत. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ती काळाची गरज झालेली आहे. असे प्रतिपादन इंजि. तानाजी जंजिरे यांनी रविवारी आष्टी येथे झालेल्या मराठा वधु वर परिचय मेळाव्यामध्ये केले. 

     अहिल्यानगर येथील सगळे सोयरे वधू वर सेवा केंद्र व मराठा सेवा संघ वधु वर कक्ष आष्टी च्या वतीने सदरचा मेळावा घेण्यात आला. जोगेश्वरी मंगल कार्यालय आष्टी येथील झालेल्या या मेळाव्यात आपल्या अध्यक्ष भाषणात पुढे बोलताना इंजि. जंजिरे म्हणाले की, आता कुटुंब छोटे झाले आहेत. कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी असून सुद्धा त्यांच्यामध्ये आपसात संवाद राहिलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. यावर उपाय म्हणून कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिवसातून एक वेळचे जेवण एकत्र बसून केले पाहिजे. कुटुंब सुरळीत चालावे यासाठी कुटुंबातील सदस्यांनि एकमेकांसाठी वेळ देणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.

वधु वर परिचय मेळावे आयोजित करताना तसेच वधू-वरांचे विवाह जुळवताना येणाऱ्या अडचणी संयोजक हरिभाऊ जगताप यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये विशद केल्या. पुढील काळामध्ये शेती शिवाय पर्याय राहणार नाही. तरीही सर्वानी दलाला पासून सावध राहावे असा इशाराही जगताप यांनी यावेळी दिला.

*उच्च शिक्षित यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त*

     यावेळी बोलताना मराठा वधुवर कक्ष आष्टीचे कार्यकारी अध्यक्ष ॲड सीताराम पोकळे म्हणाले की, सुमारे वीस बावीस वर्षांपूर्वी झालेल्या स्त्रीभृण हत्या याचा परिणाम आज समाज भोगत आहे. तरीही उच्च शिक्षण घेतलेल्या मध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. आणि अशा मुलींना आपल्यापेक्षा कमी शिकलेला साथीदार नको असतो. परिणामी उच्चशिक्षित मुलींचे वय 30 ते 35 च्या घरात गेले तरी त्यांची लग्न जुळत नाहीत. त्यासाठी मुलींनी व त्यांच्या पालकांनी तडजोड करण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे. पुढील काळामध्ये शेतीला पर्याय राहणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मुली शेतकऱ्यांच्या मुलांनाच दिल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. 

   गेवराई ,अंबाजोगाई, बीड, अकोला ,अहिल्यानगर ,कर्जत, करमाळा ,सोलापूर ,धाराशिव या महाराष्ट्राच्या विविध भागातून  मेळाव्यासाठी वधू वर व त्यांचे पालक आले होते.

      यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शशिकांत कन्हेरे, शिवमती सुवर्णाताई गिरे, शिवाजीराव जगताप, मारुतीराव तिपाले, शिवश्री लक्ष्मण रेडेकर व मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी तसेच शिवश्री शिवाजी पाचे व मराठा वधु वर कक्षा चे सर्व पदाधिकारी जिजाऊ ब्रिगेडच्या छायाताई कदम व संभाजी ब्रिगेडचे अविनाश जगताप व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. बाबासाहेब मुटकुळे व शिवमती मायाताई जगताप यांनी केले. तर आभार प्रदर्शन संयोजक हरिभाऊ जगताप यांनी केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.