*शब्दगंध ची शनिवारी कोहिनूर मध्ये आभार सभा*
अहिल्यानगर (प्रतिनिधी ) : *शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने झालेल्या सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची आभार सभा शनिवार दिनांक २९ मार्च २०२५ रोजी दुपारी ४/३० वाजता कोहिनूर मंगल कार्यालय, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे* अशी माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सोळाव्या संमेलनाच्या यशस्वी आयोजना मागे अनेकांचे हात होते, या सर्वांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक भेट देण्यात येणार आहे. तसेच सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील सभासद प्रज्ञावंतांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे.
stay connected