महिलांनी शिक्षणाबरोबर आपल्या पाल्याला सुसंस्कारांची सांगड घालावी - प्राजक्ताताई धस
पुरूष युवा पत्रकार संघाने महिलांचा सन्मान केला त्यांचे कार्य कौतुकास्पद - उपविभागीय अधिकारी वसिमा शेख
आष्टी येथे नारी सन्मान पुरस्काराने कर्तबगार ३० महिलांचा सन्मान
आष्टी प्रतिनिधी -
महिलांनी चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता शिक्षणाबरोबर संस्काराची सांगड घालावी आणि कौटुंबिक आर्थिक परिस्थितीच्या प्रगती करण्यासाठी महिलांनी पुरुषाच्या बरोबर आपला संसाराचा गाडा अधिक जोमाने न्यायला पाहिजेत. तसेच आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासह सोबत संस्काराकडे लक्ष दिले पाहिजे.मुलींनो सैराट चित्रपट पहा पण सैराटचा शेवटचा भाग दहावेळा पहा त्यामुळे विचार करून निर्णय घ्यावा आणि आपल्या शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करून काही तरी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करा तर आज महिला सर्वच क्षेत्रात प्रगती करत असून देश महासत्ता होण्यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायासह अत्याधुनिक शेती व नोकरी आदी क्षेत्रात आपले स्थान अधिक मजबूत करणे गरजेचे आहे आणि महिलांचे सक्षमीकरण व सशक्तीकरण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महानंदा दूध संघ मुंबईच्या संचालिका प्राजक्ताताई सुरेश धस यांनी आष्टी येथे केले.
आष्टी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दि १० मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ३० विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्कार सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी वसीमा शेख ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून महानंदा दूध संघ मुंबईच्या संचालिका प्राजक्ताताई धस, तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाणे, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, केंद्रीय फिल्म सल्लागार समिती मंडळ सदस्य डॉ स्मिता बारवकर,सरपंच शालिनी मुळे, महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता कोमल शिंदे, डॉ प्रियांका सिंघण, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णा गि-हे, सरपंच प्रतिभा थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राजक्ताताई धस म्हणाल्या की, युवा पत्रकार संघ नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी तळागाळातील महिलांचा सन्मान करून एक स्तूत्य उपक्रम राबवत आहेत.कोणीही
अन्याया विरुध्द लढत असताना त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मग ती छोट्या घरातील महिला असो किंवा माझ्यासारखी राजकिय घराण्यातील असो जेव्हा माझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करून मला त्यामध्ये गोव्यण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ज्यांनी मला त्रास दिला त्या विरुध्द मी एक महिला असूनही माझ्यावर झालेल्या अन्याया विरोधात मी ताकतीने आवाज उठविला आणि मला न्यायदेवताने न्याय दिला आणि मला त्रास देणाऱ्याची आज काय अवस्था झाली आहे हे सर्व बीड जिल्ह्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे त्याची फेड त्याला लगेच मिळाल्याचे त्यांनी बोलताना मनातील भावना व्यक्त करून सांगितल्या.
यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी वसीमा शेख म्हणाल्या की, जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला छेद देणारा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम आज महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.अशा कर्तबगार महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते परंतु आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचा जागतिक महिला दिनानिमित्ताचा महिला पत्रकार नसताना ही पुरूष पत्रकार बांधवांनी सर्व कार्यक्रमाला छेद देणारा कार्यक्रम घेतला आणि मागिल अनेक वर्षांपासून पुरुषांनी महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम मी पहिल्यांदाच पाहत आहे.आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन सन्मान केला. महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे महिला अत्यंत धाडसी कामे करतात.पुरूषाच्या बरोबरीने आज महिला काम करत आहेत.तळागाळातील उत्कृष्ट कार्य करत आहेत. अशा महिलांमुळे समाजातील महिला मुलींना प्रेरणा मिळत राहते असे त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी गटविकास अधिकारी गोकुळ बागलाणे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर,गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, जिजाऊ ब्रिगेडच्या अहिल्या नगरच्या जिल्हाध्यक्षा ॲड स्वाती जाधव,ग्राम महसूल अधिकारी अंकीता जाधव यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, सचिव जावेद पठाण, निसार शेख,अक्षय विधाते,समीर शेख, गहिनीनाथ पाचबैल, संतोष नागरगोजे, मारूती संत्रे,अतुल जवणे, प्रेम पवळ, संतोष तांगडे, सोपान पगारे, आदिनाथ ठोंबरे,संतोष दाणी, राजेंद्र लाड, सिताराम पोकळे,विठ्ठल राख, सचिन पवार, शिक्षक अनिल बेदरे,किरण शिनगिरे, विजय राजपुरे, ओंकार कदम, संस्कार लाड,आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर शेख यांनी केले तर या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन राजेंद्र लाड यांनी केले व आभार अविनाश कदम यांनी मानले.
या महिलांचा झाला पुरस्काराने सन्मान...
वैशाली मुकुंद साबळे (आदर्श माता ),रेखा भाऊसाहेब घुले(आदर्श शेतकरी महिला ),वंदना परिवंत गायकवाड (आदर्श महिला सरपंच), ब्रह्मकुमारी सुशिला बहेनजी (आध्यात्मिक समाजकार्यातील उत्कृष्ट महिला),कु.डाॅ.शेख मेहविश आरा (आदर्श महिला वैद्यकीय अधिकारी), कीर्ती हांगे (आदर्श महिला शिक्षिका), ॲड स्वाती राजेंद्र जाधव (आदर्श शैक्षणिक व समाजकार्य ), श्रीमती कवडे अनिता साहेबराव (आदर्श ग्रामसेविका), अंकिता राजेंद्र जाधव ( आदर्श ग्राम महसूल अधिकारी), ज्ञानेश्वरी शंकर लांडे (आदर्श पशुधन पर्यवेक्षक महिला अधिकारी), ह भ प पुष्पाताई उमेश जगताप (उत्कृष्ट समाज प्रबोधनकार महिला), दिपाली अशोक काकडे (उत्कृष्ट खेळाडू), बावदाणकर संजीवनी सोपान (आदर्श कृषी सहाय्यक महिला), रुक्मिणी संपत मराठे (आदर्श अंगणवाडी सेविका), सुनिता रामदास जगताप (आदर्श आशा वर्कर), अंजली दिगंबर वाघमारे (उत्कृष्ट सुपरवायजर), सोनाली रुपेश उपाध्ये (उत्कृष्ट महिला उद्योजिका), ॲड पुष्पा भगत- गायकवाड (आदर्श महिला विधीज्ञ ), विजया मुळे (आदर्श समाज कार्य महिला) शिवनेरी महिला बचत गट पांढरी (आदर्श महिला बचत गट), वंदना सुरेश भैसाडे (आदर्श परिचारिका), वैष्णवी नामदेव रांगुळे (आदर्श कवियत्री), पूजा बिबीषण देवळकर- धोंडे (आदर्श महसूल सेविका), अर्चना सुभाष आरडे (उत्कृष्ट महिला पोलीस कर्मचारी), कल्पना गणेश पाटील (आदर्श सून ), सविता उगले (आदर्श सेविका), कोमल थेटे ( उत्कृष्ट रांगोळी महिला आर्टिस्ट), सुनिता नाथा शिंनगारे (उत्कृष्ट आशा वर्कर), सौ. ज्योती संजय पवार
आदर्श अबॅकस शिक्षिका,श्रीमती वेणूबाई विलास केसकर आदर्श स्वयंपाकी या विविध क्षेत्रातील महिलांना शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व फेटा बांधून 'नारी सन्मान २०२५' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
युवा पत्रकार संघाचा आदर्श इतरांनी घ्यावा - तहसीलदार वैशाली पाटील
बालविवाह रोखण्यासाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे त्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायद्यांची माहिती सर्व पालकांपर्यत पोहचून याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे तर
युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी आष्टी तालुक्यात सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले आहेत तसेच सर्वसामान्य गोरगरीब अन्याय विरोधात वाचा फोडण्याचे काम करत आहेत.आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. अनेक महिला ह्या उत्कृष्ट कार्य करून ही त्यांची दखल घेतली गेली नव्हती. आज युवा पत्रकार संघाने कर्तुत्वान महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करून त्यांना न्याय दिला. त्यामुळे युवा पत्रकार संघाचा आदर्श इतरांनी घ्यावा असे प्रतिपादन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले.
stay connected