शिक्षणाचं बाजारीकरण म्हणजे नेमकं काय?

शिक्षणाचं बाजारीकरण म्हणजे नेमकं काय?



          अलिकडील काळात शिक्षण शिकविलं जात आहे. जे शिक्षण निःशुल्क आहे व निःशुल्क असायलाही हवं. तेच शिक्षण निःशुल्क असल्यानं गरीबांची मुलं शिकतात. त्यांना शिकविण्याचं शुल्कही सरकार देत असतं. सरकार अशा शाळेतील शिक्षकांना वेतन हे आपल्याकडून देत असतं. 
          देशात तीन प्रकारच्या शाळा आहेत व सरकारनं तीन प्रकारच्या शाळांना सध्याच्या काळात मंजूरी प्रदान केलेली आहे. एक म्हणजे सरकारी शाळा की ज्या शाळा संपुर्णतः सरकारच्याच मालकीच्या आहेत. त्या शाळा सरकार चालवतं. दुसर्‍या शाळा म्हणजे अशा शाळा की ज्या सरकारी आहेत. परंतु त्यांना सरकार चालवीत नाही, मालक चालवतो. तिसऱ्या प्रकारच्या शाळा या पुर्णतः मालकशाहीच्याच आहेत. मालक म्हणेल तसं. त्या शाळा सरकार चालवत नाही. 
           आज शाळेचा विचार केल्यास असं आढळून येतं की ज्या शाळा सरकार चालवीत नाहीत. त्या शाळेत कायदे व नियम हे सरकारचे लागू होत नाहीत. ते सर्व नियम त्या शाळा काढणाऱ्या मालकाचे लागू होतात. मग वेतन वा भत्ते का असेना. ज्याप्रकारे नियम कारखान्यात असतात. तसेच नियम शाळेतही लागू होतात व त्याच नियमानं सामान्य लोकांच्या मुलांच्या शिक्षण घेण्याच्या आवडीनिवडीचा जीव घेतला जातो. 
          आज असं चित्र दिसतं की शाळा या शाळा राहिलेल्या नाहीत तर त्यांचा कारखाना बनलेला आहे. ज्याप्रमाणे कारखान्यातून पक्का माल निघतो. ज्या मालाला किंमत असते. तसाच माल आज शाळेतूनही निघतो. फरक एवढाच आहे की कारखान्यातून मालाच्या रुपात वस्तू वा पदार्थ उत्पादीत होतो आणि शाळेतून मालाच्या रुपात माणसं. त्यातच कारखान्यातून निघणाऱ्या मालाला जशी किमंत असते. तशीच शाळेतून निघणाऱ्या मालालाही किंमत नसते. शाळेतील माल हा बेभाव असतो. प्रत्येकाचे भाव ठरलेले असतात. हं, काम करायचं असेल तर करा. नाहीतर पळा अशी अवस्था शाळेतून निघणाऱ्या मालाची असते. 
         शाळेतून नेमका कोणता माल निघतो? 
          शाळेतून नेमका कोणता माल निघतो. याचा विचार केल्यास त्या मालात डॉक्टर, इंजीनियर, शिक्षक, वकील याचा समावेश होतो. अमूक अमूक एवढे पैसे भरा. त्यानंतर आपल्या मुलाला या कारखान्यात टाका. पाच वर्ष वळून पाहू नका. आपल्याला डॉक्टर, इंजीनियर, शिक्षक किंवा तत्सम गुणवत्ताधारक व्यक्ती तयार होवून मिळणार म्हणजे मिळणारच. याची खात्री शाळा देते. त्यासाठी त्या मुलांना येवो अगर न येवो. अशी मुलं अशा खात्रीशीर शाळेतून तयार होतात. अशी मुलं उद्या उच्चशिक्षित झालीही. तरी ती देशाची सेवा करीत नाहीत. ती सामान्य लोकांच्या परिस्थितीकडं ढुंकूनही पाहात नाहीत. त्यांना पैसा हवा असतो. ते पैशाच्या मागे धावत असतात. कारण ते जेही शिक्षण शिकतात. त्यांना पैसा लागलेला असतो. एवढा पैसा की त्याची आपण कल्पनाही करु शकत नाहीत. उदाहरण द्यायचं झाल्यास एका डॉक्टराचं देवू. एका डॉक्टराला डॉक्टर बनायला म्हणजे डॉक्टरकी शिकायला कमीतकमी पन्नास लाखाच्या वर पैसे लागतात. जे पैसे त्याच्या वडीलाला काबाडकष्ट करुन आणावे लागतात. कधी एवढा पैसा कमविण्यासाठी भ्रष्टाचारात हात लिप्त करावे लागतात. हेच मुलाला ते मुल शिकत असतांना माहीत असतं. तद्नंतर ज्यावेळेस मुलगा एखादा डॉक्टर बनतो. तेव्हा त्याच्या लक्षात येते की आपल्या वडीलांना एवढा पैसा भरावा लागला, आपल्या शिक्षणासाठी. हा पैसा काढायचा कुठून? हा पैसा जनतेच्याच खिशातून काढावा लागेल. शेवटी तसा विचार करुन तो एखाद्या खाजगी रुग्णालयात नोकरीला लागतो वा एखादं आपलंच रुग्णालय उघडतं. दोनचार तासासाठी डॉक्टर नियुक्त करतो. त्यांना दोनतीन तासासाठी का असेना येण्याचे शुल्क देतो व आपल्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडील पैशाची एवढी चिरफाड करतो की बिचारे रुग्ण आजाराला पाहून कंटाळतात. काही तर एखादा आजार झाल्यास घरीच तडफडत मरण पावतात. परंतु उपचार करीत नाहीत. कारण तेवढे पैसेच नसतात त्यांचेजवळ.
          डॉक्टर.......त्या रुग्णालयात काम करणारा डॉक्टर तरी काय करणार? त्याला त्या डॉक्टरकीचं शिक्षण शिकायलाच एवढा पैसा लागलेला असतो की ज्यानं निःशुल्क सेवा करतो वा कमी पैशात सेवा करतो जरी म्हटलं तरी जमत नाही. कारण तसं त्यानं आयुष्यभर केलं तरी त्याच्या शिक्षणाला लागलेला पैसा निघू शकत नाही. म्हणून त्याची जरी मनात सेवा करण्याची इच्छा जरी असेल तरी तो मनातल्या मनात मारतो व तो प्रसंगी रुग्णांच्या भावनांशी नाही तर पैशाशी खेळतो. कारण त्याला रुग्णांच्या आजाराशी काही घेणंदेणं नसतं. फक्त पैशाशीच घेणंदेणं असतं. तीच स्थिती असते शिक्षण क्षेत्रातही. शिक्षण क्षेत्रातही ते शिक्षण घेत असतांना व नोकरीवर लागत असतांना जवळपास पन्नास लाखाच्याही वर पैसे मोजावे लागतात. प्रथम पैसे तो ज्या महाविद्यालयातून तो शिकतो. त्या महाविद्यालयात भरावे लागतात. त्यानंतर तो ज्याठिकाणी नोकरीला लागतो. तिथं भरावे लागतात. तरच त्याला नोकरी लागते. असा लागलेला पैसा त्या शिक्षकाला काढायचा असतो. मग तो कुठून काढणार? त्यासाठी तो खाजगी शिकवण्या घेतो. त्यासाठी खाजगी शिकवणी वर्ग उभे करतो. कधीकधी अशा खाजगी शिकवणी वर्गात लपूनछपून काम करतो. मग असे करीत असतांना तो थकतो किंवा थकला नसेल तरी तो जेव्हा शाळेत जातो. तेव्हा शाळेत शिकवीतच नाही. कारण त्याला फक्त पैशाशी देणंघेणं असतं. विद्यार्थ्यांशी वा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी काहीच घेणंदेणं नसतं. त्यातही त्याची चूक नसते. 
           वकीलच्या क्षेत्रातही असेच आहे. त्यांनाही शिक्षण शिकायला बराच पैसा लागतो. जो पैसा काढण्यासाठी त्यांना न्यायालयात सेवा करणे परवडत नाही. तिही मंडळी जेव्हा न्यायालयात सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात. तेव्हा तेही बक्कळ पैसे मागतातच. एव्हाना सरकारी वकीलही असा शिक्षणाला लागणारा पैसा काढण्यासाठी संबंधीत खटल्यात जुळवाजुळव करतात व पैसा कमवतात. मग न्याय, तोही सामान्य, गरीब लोकांना कसा मिळेल?
          आज असं सर्वच प्रकारचं शिक्षण वा सर्वच प्रकारच्या नोकऱ्या मिळविण्यासाठी पै पै पैसा खर्च करावा लागतो. नोकऱ्याचं सोडा, साधं शिक्षण घेण्यासाठी लोकांना पै पै पैसा मोजावा लागतो. ज्यातून डॉक्टर, पोलीस, इंजीनियर, शिक्षक व इतर तत्सम पदं सुटलेले नाहीत. एव्हाना जे न्याय प्रदान करतात. ते न्यायाधीशही सुटलेले नाहीत. मग त्यांनी जर आपला पैसा काढण्यासाठी आपल्या सेवाकार्यात दगलबाजी केली तर गैर काय? परंतु सामान्य माणसं त्यावर ओरडतात व सरकारही त्यावर ओरडतं. म्हणतं की हा भ्रष्टाचार आहे. त्यांना भावभावनाच नाही. आणखी काही काही बोलतात. प्रसंगी आंदोलन करतात. 
          हे खाजगी क्षेत्र व या खाजगी क्षेत्राची सामान्य लोकांना लुटीची भावना. ज्यातून सरकारचं चुकत असलं तरी सरकार आपली चूक कबूल करीत नाही. त्यावर उपचारही करीत नाही. शैक्षणिक सुधारणा कायदा अर्थात शैक्षणिक धोरण आणतं. म्हणतं की आम्हाला चांगले तंत्रज्ञ बनवायचे आहेत. विद्यार्थ्यात जन्मतःच सुप्त गुण असतात. त्यांचा विकास करायचा आहे. त्याःच्यातील सुप्त गुण वाढवायचे आहेत. त्यांच्या नोंदी घ्यायच्या आहेत. त्या जतन करुन ठेवायच्या आहेत. जेणेकरुन त्यांचं भविष्य घडवितांना त्या जतन केलेल्या नोंदी कामात येतील. परंतु हे शक्य आहे काय? खरंच या सुप्त गुण वाढविण्याच्या गोष्टी विद्यार्थ्यांचं भविष्य बनविण्यासाठी कामात येतील का? समजा एखाद्या गरीबाच्या मुलात डॉक्टर बनायचे सुप्तगुण असतील आणि त्याच्या बालपणात तो शिकत असतांना सुप्त गुणांच्या नोंदी घेतल्याही तर तो पुढील काळात पैशाअभावी डॉक्टर बनू शकेल काय? एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षक बनायचे असेल व त्याच्या सुप्त गुणात त्याच्याजवळ शिक्षक बनायचे जरी गुण असतील वा तशा नोंदी असतील तरीही ते विद्यार्थी शिक्षक बनू शकतील काय? याचं उत्तर नाही असंच येईल. कारण पुढं शिक्षक बनायला लागणारा पैसा वा ती व्यवसायीक पात्रता शिकण्यासाठी लागणारा पैसा हा साहजीकच त्याचेजवळ नसेल. प्रसंगी त्याला शिक्षक बनताच येणार नाही. मग त्याच्याजवळ असलेल्या गुणवत्तेचा व सुप्त गुणांचा कोणता उपयोग? 
         हे खाजगीकरण नमस्कार त्यात विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीची हत्या. त्याच्या मनात शिक्षण शिकायची इच्छा असूनही त्याला आपलं मन मारावं लागतं. कारण शिक्षण शिकायला पैसा नसतो. हं, काही महाविद्यालयं असतात की जे सरकारी असतात. ज्यात कमीतकमी पैशात आपलं शिक्षण होतं. परंतु त्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी गुणवत्तायादीत यावं लागतं. त्यातही स्पर्धा असते. गरीबांची मुलं ही कितीही अभ्यास करीत असतील तरी ती गुणवत्ता यादीत येवू शकत नाहीत. एखादा अपवाद सोडला तर.... त्याचं कारण आहे आजच्या काळात अस्तित्वात असलेली व आलेली खाजगी शिकवणी. शाळेतील पैसा खर्च करुन नोकरीला लागलेले शिक्षक हे बरोबर शिकवीत नसल्यानं त्या विद्यार्थ्यांना अभिप्रेत असं शिक्षण मिळत नाही. ज्यातून गुणवत्तायादी ही सामान्य गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनापासून कोसो दूर असते. 
         सरकार यावर तोडगा काढू शकतं. सरकारच अशी खाजगी स्वरुपाची पैसे घेवून शिक्षण देत असलेली महाविद्यालये बंद करु शकते. ज्यांनी शाळा महाविद्यालयाला कारखान्याचे स्वरुप दिले. जर त्यांनी सरकारमध्ये कायदा करुन खाजगी महाविद्यालय वा शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आणला आणि सर्व महाविद्यालय सरकारी केली. तेथील शिक्षण व्यवस्था सरकारी केली अर्थात निःशुल्क केली तर कदाचीत गरीबांची मुलंही उच्च शिक्षण घेवू शकतील. त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकासही होवू शकेल. त्यांच्यातील सुप्त गुणांच्या वाढीला वाव मिळू शकेल. त्यांना स्वतःला व्यवसायीक पात्रता शिकायची संधी मिळू शकेल. त्यातच जे नवीन. स्वरुपाचं २०२० चं शैक्षणिक धोरण आलं. त्या धोरणानुसार त्यातील उद्दीष्टही साकार करता येवू शकतील. परंतु सरकार हे करीत नाही. करणारही नाही. कारण शाळा व महाविद्यालय हे सरकारमध्ये असलेल्या लोकांच्याच आहेत. त्यांच्याच मालकीच्या आहेत. तीच मंडळी अशा शाळेच्या माध्यमातून होतकरु नसलेल्या मुलांनाही पैशाच्या भरवशावर प्रवेश देवून व पैसे कमवून आपली निवडणूक लढवीत असतात.     
          सरकार त्यावर पांघरुन घालतं व ते पांघरुण घातलं आहे असं दिसू नये म्हणून सरकारी रुग्णालयाची निर्मीती करतं. आयुष्यमान कार्ड काढतं. काही प्राथमिक शाळेत शिक्षण निःशुल्क ठेवतं. खिचडी देतं, पोशाख देतं. लोकांना राशन सुविधा देतं व दाखवतं की आम्ही किती जागरुक आहोत. जनतेच्या प्रति आम्हाला किती सहानुभूती आहे. अन् जनताही तीच सहानुभूती विचारात घेवून सरकार थोडेसे का होईना करीत असलेल्या उपकाराची व त्याच गोष्टीची पट्टी गांधारीसारखी आपल्या डोळ्यावर बांधतात. म्हणतात की आम्हाला सरकार किती मदत करीत आहे. काही लोकं म्हणतात की आम्हाला काहीच दिसत नाही. आम्ही असहाय्य आहोत.
          सरकारची ही सरकारी मदत. ती सरकारी मदत तुटपुंजी जरी असली तरी सहानुभूतीची वाटते. ते लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारी रुग्णालय काढतं. ज्यात गरीब लोकांना थोडीशी मदत होते. ते लोकांना सहानुभूती म्हणून प्राथमिक शाळेला खिचडी पुरवते. पोशाख देते. शिक्षणाचे पैसे घेत नाही. खरं तर सरकार हे अशा मोकाट सुटलेल्या व महाविद्यालयाला कारखाना समजणाऱ्या शिक्षण सम्राटांना धडा शिकवू शकते. त्यांना शाळा, महाविद्यालय बंद करायला लावू शकते. देशातील प्रत्येक मुलांसाठी निःशुल्क शिक्षण देणारी शाळा महाविद्यालये उघडू शकते. परंतु सरकार तसे न करता कॉन्व्हेंट शाळेला परवानग्या देते. त्यांची जाहीरात होवू देते. त्या जाहीरातींना थांबवत नाही. त्यांच्या शुल्कवाढीवरही बंधनं लावत नाही. उलट गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्यावर अंकुश लावते. 
          देशात अशाच स्वरुपाचं खाजगीकरण सुरु आहे. याचं कारण आहे, सरकार जरी दुटप्पीधोरण धोरणानं वागत नसली तरी त्यांचं वागत असल्यासारखं दिसणारं दुटप्पीधोरण. सरकारनं गांधारीसारखी डोळ्याला बांधलेली पट्टी. सरकार दाखवत असलेलं स्वतःचं लाचारीपण. जणू ते आजच्या शिक्षणसम्राटांसमोर लाचार असल्यागत वाटतं. त्यातच आजच्या शिक्षणसम्राटांचा वाढता प्रभाव.
         विशेष म्हणजे ते सरकारच स्वतः प्रबळ असुनही जर दुर्बल असल्यागत वागतांना दिसत असेल. तेव्हा सामान्य माणसांची स्थिती काय असू शकेल! यावर विचार करण्याची आजतरी गरज आहे. महत्वाचं सांगायचं झाल्यास सरकार काही दुर्बल नाही आणि सरकारला कोणीही दुर्बल समजू नये. तसंच सरकारनंही दुटप्पी स्वरुपाचं वागू नये. खाजगीकरणाला प्रोत्साहन देवू नये. ज्याप्रमाणे दोनचार शाळेतील शिक्षण हे जसं निःशुल्क आहे. तशाच संपूर्ण शाळेतील शिक्षण हे निःशुल्क करावे. केवळ शाळेतीलच शिक्षण निःशुल्क करावे असं नाही तर महाविद्यालयातीलही शिक्षण निःशुल्क करावे. जेणेकरुन गरीब जनतेच्या मुलांनाही उच्च शिक्षण घेता येवू शकेल. त्यांनाही डॉक्टर, इंजीनियर, वकील, शिक्षक वा तत्सम प्रकारचं शिक्षण घेता येवू शकेल. ज्यांना असं निःशुल्क शिक्षण मिळालं तर ते देशातील जनतेची अतिशय अल्प मोबदल्यात सेवा करु शकतील. मग शिक्षण शिकवणं असो वा रुग्णालयात रुग्णावर उपचार करणं असो, वा न्यायालयात न्याय मिळणं असो वा देशातील इतर कोणत्याही गोष्टी असो. असं जर झालंच तरच आजच्या नवीन शिक्षण धोरणाच्या शैक्षणिक उद्दीष्टांची परिपुर्ती होईल. नाहीतर त्या नवीन शिक्षण धोरणाचा काहीही उपयोग होणार नाही हे तेवढंच खरं. 

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०







थांबा. जात टिकविणे आहे?


         *जात...... अलिकडील काळात जात ही एखाद्या घोरपडीसारखी घट्ट चिकटलेली आहे व त्याच जातीवरुन अत्याचार सुरु आहेत. तेच अत्याचार वाढत आहेत. काही ठिकाणी असले होणारे अत्याचार वाढत चाललेले दिसत आहेत तर काही ठिकाणी असले अत्याचार हे समाप्त होणार असेही जाणवत आहेत. काही ठिकाणी जात घट्ट चिकटली आहे एखाद्या बांडगुळागत, तर काही ठिकाणी जात ही विरळ होतांना दिसत आहे. कारण अलिकडील काळात बऱ्याच ठिकाणी प्रेमविवाह अगदी जोरात होत चाललेले असून त्याची तिव्रताही वाढत चाललेली आहे. त्यामुळं जात नष्ट होईल काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे.* 
         अलिकडील काळात जात दिसत नाही. शहरातही प्रेमविवाह थाटात होत असून प्रेमविवाहाला आजच्या समाजातील लोकांनी मान्यता दिल्यागत चित्र दिसत आहे. हे जरी खरं असलं तरी जात नष्ट होणार नाही. ती नष्ट व्हायला वेळ लागेल. कारण ज्या तिव्रतेनं ती वाढली. त्यानंतर ती जशी टिकली. तशीच ती नष्ट होतांनाही बराच वेळ लागेल किंवा लागू शकते. 
         आज समाज सुधारला. कारण तो शिकला आणि शिकू लागला आहे. तो शिकलेला सुधारलेला समाज जातीप्रथा नष्ट करीत असून पाहिजे त्या प्रमाणात जात पाहात नाही. शहरात तर जातीप्रथा तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही. जातीभेद मिटलेला दिसत आहे. हे कामावरुन दिसतं. विवाहावरुनही तेच दिसतं. तसंच एकमेकांच्या व्यवहारावरुनही तेच दिसून येत असतं. कारण जातीच्या आधारावर विचार केल्यास शहरातील माणसे जात जात न करता एकमेकांच्या घरी जातात. मग तो विवाह समारंभ असो की एखादा कोणता समारंभ. शिवाय आजचे शहरातील लोकं हेही समजायला लागले आहेत की रक्त हे कोणत्याही जातीच्या व्यक्तीचे काढले तर ते लालच निघेल वा रक्तदान होतांना ते रक्त कधीच भेदभाव बाळगत नाही. मी अमूक माणसांचा असे कधीच म्हणत नाही. कधी ते रक्त दान होतांना धर्मावरुन भांडत नाही. मी हिंदू मी मुसलमान म्हणा, कधीच ते रक्त मी अमूक जातीचा बहुजन तर मी तमूक जातीचा सनातन असा फरक करीत नाही. यावरुन एकंदरीत सांगायचं झाल्यास जात नष्ट होणार असल्याची चिन्हं दिसतात. 
           जात. जातीवरुन वरील स्वरुपाच्या गोष्टी ह्या जरी खऱ्या असल्या तरी मी अमूक जातीचा. मला अमूक म्हणा किंवा माना. असे का मानावे आम्ही. अन् त्या जातीवरुन कधीकधी ती नष्ट व्हायलाच पाहिजे व जातीवरुन भेदभावही नष्ट व्हायलाच पाहिजे. असेही का मानावे आम्ही? असे शहरातील नाही तर तमाम देशातील लोकांचे वागणे दिसून येते. 
        लोकांच्या एकंदरीत वागण्यावरुन शहरात जातीप्रथा दिसत नाही. शिवाय शहरातील लोकं कामासाठीही एक दुसऱ्याच्या घरी, अनोळखी माणसाच्याही घरी कामाला जात असतात. ज्या घरी ते कामावर जातात. त्या घरची मंडळी ती त्याची जात पाहात नाहीत. काम करवून घेतात, ओळख पारख नसतांनाही अन् जात माहीत नसतानाही अन् जातही माहीत झाली तरी जातीचा भेदभाव मानत नाहीत.  याचाच अर्थ असा की शहरात जातीवरुन वादंग नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास समाजातून जात मिटल्याची चिन्हं दिसत आहेत. 
          ग्रामीण भागातही  आज आंतरजातीय विवाह होवू लागले आहेत. तेही एकमेकांच्या घरी कामाला जावू लागले आहेत. तेही एकमेकांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होवू लागले आहेत. याचाच अर्थ असा की ग्रामीण भागातूनही शहरासारखी जात मिटत चाललेली आहे. तशीच जात मिटत चालली आहे सरकारी कार्यालयातूनही सरकारी नोकऱ्या मिळाल्यावर अनेक जातीची माणसं एकत्र जेवनाचे डबे खातांना दिसतित. परंतु हे जरी खरं असलं तरी शहरात जात आहे, ती शाळेतील एकंदरीत वातावरणातून दिसते. ज्या शाळेत मुलं दाखल करतांना प्रत्यक्षात जात लिहिली जावू नये. असे असतांना जात ही विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश घडतांना लिहिली जाते. शहरात जात समाजातून जरी मिटत चालली असली तरी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जात आजही शहरात सुरु असलेली दिसत आहे. हेही नाकारता येत नाही. ही झाली शहरातील स्थिती. ग्रामीण भाग तर याहीपेक्षा वेगळा आहे. तिथे तर जात एखाद्या जळूसारखी आहे. जी जात जळूसारखी माणसांचं रक्तही पिते. कधीकधी यावरुनच अत्याचार होतो व उच्च जातीची माणसं कनिष्ठ जातीवर अनन्वीत जातीआधारावर अत्याचार करतात. 
         ग्रामीण भाग असो वा शहरी. जात एवढी माणसाला घट्ट चिकटली आहे की जातीवरुन भेदभाव आजही दिसतो. जात आजही अस्तित्वात आहे. कधीकधी शहरातही एखाद्या व्यक्तीची मुलगी एखाद्या दुसर्‍याच जातीतील मुलांसोबत पळून जरी गेली तर बाऊ होतो. कधी त्याचा तेवढा जास्त दिवस बाऊ होत नाही. ग्रामीण भागात मात्र त्याचा बाऊ होतो. एवढंच नाही तर अशा घटना खेड्यात घडल्यास वाळीत टाकण्यासारख्या घटना घडतातच. व्यतिरीक्त कधीकधी ज्यांची मुलगी पळून गेली. त्यांच्या घरी आत्महत्याही घडत असतात. सर्वात जास्त प्रमाणात परजातीसोबत मुलगी पळून जाण्याचा धक्का मुलीच्या बापालाच पोहचतो व तोच आत्महत्या करीत असतो. एखादा अपवाद असतो की जातीवरुन वादंग होत नाही व परजातीशी एखाद्या मुलीचा विवाह झाल्यास मायबाप त्या विवाहाला स्विकार करीत असतात. इतर जातीचे जातीवरुन वाळीत टाकणे दूरच. 
           जात..... एकीकडे जात आहे असे चित्र दिसतं तर दुसरीकडे जात अस्तित्वात नाही असंच चित्र दिसतं. जात ही रक्तावरुन दिसत नसली व सर्वांचे रक्त लालच असले तरी जात ही आजच्या काळात सरकारी कार्यालयातही दिसून येते. जातीवरुन आम्ही भेदभाव करीत नाहीत म्हणणारे चक्कं जातीवरुन सरकारी कार्यालयात भेदभाव करतांना दिसतात. ते इतर कनिष्ठ जातीशी फटकून वागतात. त्यांना साध्या पदोन्नत्याही देत नाहीत वा त्या द्यायला मागेपूढे पाहतात. तेच चित्र शहरातील काही लोकांच्या वागण्यावरुन दिसून येते तर तेच चित्र कधीकधी ग्रामीण भागातील लोकांच्या वागण्यावरुन दिसून येते. एकंदरीत सांगायचं झाल्यास रक्तावरुन व रक्तदानावरुन जात जरी नष्ट झालेली दिसत असली तरी आजही जात आहे. त्यातच जातीप्रथाही टिकूनच आहे. शिवाय जातीवरुन आजही भेदभाव आहे हे नाकारता येत नाही. तेव्हा जात नाही वा जातीप्रथा व जातीआधारीत भेदभाव मिटत आहे, मिटणार आहे. जात नष्ट होणार आहे असे कोणीही म्हणू नये. मानू नये. त्यामुळंच कोणी जर म्हणत असेल की थांबा, जात टिकविणे आहे, तर ते तेवढंच खरं आहे यात शंका नाही. 

         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०




 

सायकल

        सीमी श्वान सायकल चालवत होता. तो श्रीमंत होता. तशी रिमी मांजर गाडी चालवत होती. ती गरीबच होती व ती त्याला नेहमीच चिडवत असे. 
         एकदा सीमी रस्त्यानं चालला होता. तेव्हा त्याला रिमी दिसली. ती रडकुंडीला आली होती. गाडी ढकलता ढकलत नव्हती. तसं सीमीनं कारण विचारलं. रिमी म्हणाली, "काय करु, गाडीत पेट्रोल नाही. म्हणून ढकलतोय. परंतु थकल्यानं जीव रडकुंडीला आलाय."
         सीमीनं तिला सायकल चालवण्याचा सल्ला दिला. आता रिमी सायकल चालवते व तिला काही समस्या आली तरी कोणताच त्रास होत नाही. 

बोध- आपल्याला झेपेल, तेच काम करावं. दुसऱ्याचा द्वेष करु नये.

On Tue, 28 Jan 2025, 6:04 am Geet Shingade, <geetshingade454@gmail.com> wrote:
१} विमान 

प्रकाशनं एकदा विमान पाहिला. 
विचार केला आकाशी उडीन. 
त्यानं एक कागदाचा विमान बनवला. त्याला पंख लावले. त्यात एका माणसाचे चित्र ठेवले. नाव दिलं प्रकाश. आता रोजच प्रकाश आकाशात उडू लागला.

बोध- स्वप्न मोठं असेल तर ते पुर्ण होणारच.

 २} लबाड उंदीर 

एकदा एका उंदरानं भीतीपोटी सापाशी मैत्री केली. म्हणे, "मी तुला मदत करणार." एवढ्यात शिकारी आला. त्यानं सापाला पकडलं व तो त्याला नेवू लागला. त्यानं बराच आवाज लावला. परंतु उंदीर मदतीला आलाच नाही. साप निघून गेल्यावर उंदीर आनंदानं नाचू लागला. 

बोध- लबाडाशी मैत्री करु नये.

३} खरी मैत्री 

गंपूला पोहणे कठीण वाटायचे. त्यानं एका बेडकाशी मैत्री केली.  
बेडूक म्हणाला, "गंपू माझ्याकडे ये. मी पोहायला शिकवतो."
गंपू बेडकाकडे गेला आणि पोहणे शिकला.

बोध- चांगल्या मित्राचीच संगत खरी लाभदायक असते.

४} चॉकलेट

चिंकी चॉकलेट खाणारी मुलगी. ती फारच चॉकलेट खायची. आज तिनं चॉकलेट खाल्ली नव्हती. 
चिंकीनं एकदा स्वप्न पाहिलं. 
स्वप्नात अळी आली. म्हणाली, " मी तुझ्या दातातील अळी. मला आज चॉकलेट मिळालं नाही. चॉकलेट दे. नाहीतर मी तुलाच खाते."
         थोड्या वेळाचा अवकाश. तिला जाग आली व तिनं त्या दिवसापासून चॉकलेट खाणे सोडले.

बोध - चांगल्या वस्तू खाणे आरोग्याला फायदेशीर असतात.

५} खरा आनंद

रिंकीचं दूध पिवून झालं नव्हतं. एवढ्यात मिंकी मांजर आली. तिला लहान लहान पिल्लं होती. तिला भूक फार लागली होती. रिंकीला दया आली व तिनं तिला दूध दिलं. दूध पिवून मिंकी मांजर आनंदानं झोपी गेली. त्याचा फार मोठा आनंद रिंकीला झाला होता.

बोध- दुसर्‍यांना मदत करण्यातच खरे समाधान लाभते.

६} कावळ्याची मदत 

काल एक कावळा बराच तहानलेला व उपाशी होता . 
आबानं त्याला वडापाव दिला. 
आज आबा म्हातारे होते व उपाशी होते. कावळ्यानं ते पाहिलं. आज त्याच कावळ्यानं आबाला वडापाव आणून दिला होता. 

७) मदत

ढंपू गाढव गवतावर विचार करीत चरत होते. विचार होता, आपण माणसाला मदत करायची नाही. आपण मदत करतो, तरी ते बेईमान होतात. 
        गाढवानं मदत करणं बंद केलं. मग माणसानंही त्याला मदत करणं बंद केली. एवढ्यात पावसाळा आला. गाढव ओलेचिंब झालं. आता त्याला माणसाची आठवण येवू लागली होती. 

बोध- कोणी केलेले उपकार विसरु नयेत.
बोध- आपण एखाद्याला केलेली मदत व्यर्थ जात नाही.

८) शान

चितू सिंह जंगलचा राजा होता.
तोच जंगलाची शान होता, 
आता जंगल स्मशान झाले होते 
झाडं शेतीसाठी मकानासाठी रस्त्यासाठी कटली होती 
आता जंगलात झाडं नव्हती 
 पाऊस पाणी पडत नव्हते 
जंगलात प्राणी राहात नव्हते 
चितूनं विचार केला, त्यानं गणू माकडाशी मैत्री केली 
गणूनं झाडं लावली 
जंगल हिरवंगार झालं 
जंगलात प्राणी आले. पक्षी आले.
मोर नाचायला लागले. सिंहोबाची शान वाढली. अन् सारेच कसे आनंदी झाले. 
म्हणून झाडे आपण लावूया. 
पाऊस पाणी बोलवूया

बोध- झाड म्हणजे पर्यावरणातील एक महत्वाचा घटक. म्हणून झाडं लावावीत.

९) परीवर्तन 

        रवी पतंग उडवीत होता. एक दिवस त्यानं चिमण्यांचा चिवचिवाट सुरु ऐकला. एक चिमणी म्हणाली, "काय बाई लोकं, त्यांना कळत नाही की पतंगानं चिमण्यांचा जीव जातो."
          ते बोलणं जवळच उभा असलेला रवी ऐकत होता. त्यानंतर तो हसला व त्यानं पतंग उडविणं बंद केली.

१०) परीक्षा 

         गरुडराणी झाडाच्या फांदीवर उंचावर बसून होती. तिचा पती पिल्लांची देखभाल करण्यासाठी घरट्याच्या खाली ताटकळत होता. तिनं जमीनीवर पाहिलं, एक माणूस दारु पिऊन आपल्या पत्नीला मारत होता. तशी ती खाली येवून त्याच्या पत्नीला म्हणाली, 
          "वेड्या बाई, माझ्यासारखी परीक्षा घेतली असती, तर असे घडलेच नसते."
          त्या महिलेनं ऐकलं व घटस्फोट झाला. 

बोध- कोणतीही गोष्ट करण्याआधी ती चांगली की वाईट हे पडताळून पाहावे.

११) निरीक्षण

         मंजूळा पाचव्या वर्गात शिकणारी मुलगी. मुलगी फारच हुशार. परंतु दुर्दैवानं आईबाप मरण पावले. शिक्षण गेलं. 
          मंजूळा असहाय्य झाली. शिकण्याची इच्छा मारली गेली. परंतु ती निरीक्षण करायची. झाडं, फुल, फळ, पक्षी यांच्याशी बोलायची. निसर्गात रमायची. त्यातून ती शिकली. तिनं शेतकऱ्यांचं जीवन पाहिलं. खंत वाटली व कालानुकालीक मोठी होताच तिनं एक यंत्र काढलं. ज्याचा शेतकऱ्यांना उपयोग होत होता. 

बोध:- केवळ शाळेत शिकणं महत्वाचं नाही. परीसरही जास्त शिकवून जातो.


१२) सुप्त गुण 

          मृग महिना लागला होता. पावसाची सर आली होती. बाबूराव मातीच्या घरात होता. तशी भिंत पडली व त्यात बाबूरावचे दोन्ही पाय गेले. परंतु बाबूरावनं हिंमत हारली नाही. 
        बाबूराव विचार करु लागला. आपण काहीच करु शकत नाही. तशी त्याला एक मुंगी म्हणाली, 
         "वेड्या कायर माणसा, मी मुंगी, निसर्गातील लहान जीव. मोठमोठी पहाड चढते."
         बाबूरावनं तिचं ऐकलं. तिचा त्याला हेवा वाटला व त्यानंही निर्धार केला. मी एवरेस्ट चढणार. आज त्यानं एवरेस्ट शिखर पादाक्रांत केलं होतं. 

बोध:- प्रत्येकात सुप्त गुण असतात. त्यासाठी जाबवंतासारखा गुरु हवाच.

 १३) ऑपरेशन 

          आई बाजारातून घरी आली. प्रत्येकाला खाऊ दिला. ज्यातून लहानग्या आरुषीला विषबाधा झाली. आरुषीचं पोट दुखू लागलं. त्यानंतर तिला दवाखान्यात नेलं. एक्सरे काढला गेला व निदान झालं. तिच्या पोटात घासणीच्या ताराचा लहानसा तुकडा गेला होता. तो ऑपरेशननं बाहेर निघणार होता. 
         ऑपरेशन झालं व तुकडा बाहेर निघाला. आईनं सुस्कारा सोडा. देवाचे आभार मानले. बरं झालं की अनर्थ टळला. 

बोध:- बाहेरचं जीनस विचारपुर्वक खावे.

१४) बोलणं

       मुलं बोलत होती. ते पाहून सर म्हणत होते, 'शांत बसा.' मुलं ऐकत नव्हती. सरानं बोलणंच बंद केलं.

बोध- कोणाला सुधारायचे असेल तर आपणच आधी सुधारावे 

 १५) जन्म

       अनुसयाची आजी आजारी होती. तिला आजीची चिंता होती. वाटत होतं आजी जाणार. 
         वसंत आला होता. झाडांना पालवी फुटली होती. अनुसया बागेत खेळत होती. एवढ्यात एक पिकलं पान पडलं. तिला आश्चर्य वाटलं. एवढ्यात पान म्हणालं, "काय आश्चर्यानं बघतेय. अगं मी गळून पडणारच नाही तर नवीन पालवी येणार कशी?"
         पानानं म्हटलेले शब्द. अनुसयानं ऐकले व ती समजली की एक जीव जातो. मगच नवीन जीव जन्म घेतोय. आपली आजी जाणार. परंतु त्या जागेवर नवीन जीव जन्म घेवून येणार.

बोध - मृत्यू हेच जीवन आहे. 

१६) आधार

        गुणी कोकीळा झाडावर बसून रडत होती. ते रडणं होतं, गाणं नव्हतं. तिला तिचा पती आज वात्रट बोलला होता, म्हणाला होता की तू ऐतखाऊ आहेस. सुंदर नाहीस. मी बरा आहे. म्हणून तुझी शान आहे.
          पावसाळा आला होता. तिच्या पतीला थंडी वाजत होती. कोकीळेनं ते पाहिलं. तिनं रडणं सुरु केलं. भाषा समजत नसल्यानं इतरांना ते गाणं वाटलं. ते धावत आले. त्यांचं मनोरंजन झालं. बदल्यात त्यांनी तिला मदत केली व तिच्या पतीचा जीव वाचवला.

बोध- कोणताही व्यक्ती स्वभावाने वाईट नसतोच. 

१७) मदत

गंपू उंदीर बिळात होता. त्याला विचार होता. आपण जगायचं कसं? बाहेर निघालो तर मांजरीची भीती आणि बिळात असलो तर सापाची भीती. एवढ्यात त्याला एक उपाय सापडला. त्यानं काजव्याला आमंत्रीत केले. आता तो भयमुक्त झाला. आता तो आणि काजवा सुखात बिळात राहू लागले होते.

बोध- निर्भीडपणा हाही एक अलंकार आहे.

 १८) सुधारणा

       गजू बगळा पाण्यात उभा होता. त्याचे डोळे मिटले होते. मात्र मासोळ्यांना माहीत होतं की तो आंधळ्याचंच सोंग करतोय आणि तो तसाच करायचा व वागायचाही. 
         एकदा एका खेकड्यानं बगळ्याचे पाय पकडले व तो खोल पाण्यात खेचू लागला. तोच बगळा 'मदत करा, मदत करा' असे ओरडायला लागला होता. त्यातच बाकी मासोळ्यांना त्याची मजा वाटायला लागली होती. त्यांना वाटत होते की या बगळ्याने त्याचे अख्खे कुटूंबचे कुटूंब खाल्ले. तोच एक वयोवृद्ध मासोळी म्हणाली, "चला धावायला पाहिजे."
          वयोवृद्ध मासोळीनं त्याला मदत करावी म्हटलं. परंतु कोणीच सरसावलं नाही. तोच ती पुढं गेली व खेकड्याला इजा करु लागली. ते पाहून बाकीच्याही मासोळ्या धावल्या व बगळ्याला बंधमुक्त केलं. आता बगळ्याला आपली चूक समजली होती व त्यानं आता मासे पकडणं बंद केलं होतं.

बोध- कुणाचेही कोणी वाईट करु नये.

         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०



 

जात नष्ट करणे आहे?

           *जात अस्तित्वात आली कामावरुन. कामाची आखणी केली गेली व त्या कामानुसार कामाचं वर्गीकरण झालं. त्यातच विशिष्ट कामाची माणसं लवकर ओळखायला यावीत. म्हणून जात निर्माण झाली. ज्यात सुरुवातीला जातीजातीतील भेदभाव नव्हता. ज्यात विटाळही नव्हता. परंतु कालांतरानं त्यात विटाळ व भेदभाव शिरला. ज्यातून सामान्य माणसांचे जीवन जगणे असह्य झाले होते. हे सर्व स्वार्थापायी झालं होतं. विशिष्ट वर्गानं आपली अक्कलहुशारी वापरुन आपल्या बिरादरीला सुख भोगता यावं म्हणून निर्माण झालेल्या जातीचा वापर कलुषीतता निर्माण करण्यासाठी केला. आजही करीत आहे. म्हणूनच जात नष्ट करणे आहे.*
        जात स्वार्थासाठी निर्माण केलेली गोष्ट. काल जातीचं महत्व होतं. लोकांना जात व जातीची माणसं ओळखू यावी म्हणून. ज्या जातीनं पुढं जावून व्यक्तीत विटाळ व भेदभाव निर्माण केला. ज्यातून विशिष्ट जातीवर अत्याचार झाले. जे असह्य अशाच स्वरुपाचे होते. जातीवर आधारीत विटाळ कालपर्यंत चालला. आजही आहे. म्हणूनच जात नष्ट करणे आहे.
         जात...... जी जात नाही, ती जात. जातीवरुन विटाळ अस्तित्वात आला. विटाळ हा स्वच्छतेवरुन अस्तित्वात आला. काही लोकं म्हणतात की पुर्वी जातीवरुन विटाळ नव्हता तर तो विटाळ म्हणजे काही काळाकरिता लोकांना दिलेली शिक्षा होती. जातीवरुन विटाळ जर असता तर कुंभार, सुतार वा इतर तत्सम कामे करणाऱ्यां लोकांच्या बाबतीतही विटाळ असता. परंतु तो नाही. याचाच अर्थ जातीवरुन विटाळ नव्हताच. विटाळ होता कामावरुन. लोकांना वाटत होतं की ती कामं अर्थात घाणेरडी कामं कोणीही करु नये. ती सोडावीत. म्हणून विटाळ नावाची शिक्षा. ती शिक्षा होती लोकांनी सुधरावं यासाठी. त्यांनी व्यवस्थीत राहावं. घाणेरडं राहू नये यासाठी दिलेली. त्यांचं म्हणणं होतं की लोकांनी घाणेरडं काम करु नये. स्वच्छ अंघोळ करावी व नीटनेटकं राहावं. कारण असं अस्वच्छ राहण्यातून लोकांना आजार शिवतो. साथीचे रोग पसरतात. कारण पुर्वी गावात साथीच्या साथी यायच्या. ज्या साथीत कित्येक लोकं मरण पावत असत. ती आजाराची साथ अस्वच्छतेपासून पसरत असल्यानं ती अस्वच्छतेची कामं करणाऱ्यांचा तत्सम लोकं विटाळ मानत असत. म्हणूनच जे लोकं चांगले राहात असत. स्वच्छता पाळत असत. त्यांच्याबाबतीत विटाळ नव्हताच. यासाठीच मनुस्मृती लिहिल्या गेली. 
         विटाळ...... अस्वच्छतेवरुन व कामाच्या स्वरुपावरुन आलेला. लोकांचं आजचं म्हणणं की त्या वेळच्या लोकांचं म्हणणं की लोकांची अस्वच्छतेची कामं करु नये. म्हणूनच विटाळ. परंतु हे जरी खरं असलं तरी ती अस्वच्छतेची कामं करणं एखाद्या तरी घटकाला आवश्यक होतं. जर ती कामं त्या विशिष्ट घटकानं केली नसती तर कदाचीत अस्वच्छताच अस्वच्छता पसरली असती. शिवाय तेवढेच आजारही आणि आजाराच्या साथीही. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या गाईचं देवू. एखादी गाय जर एखाद्या व्यक्तीच्या घरी मरण पावली असती आणि तिला ओढत नेवून फेकणारी जात जगात नसती तर कदाचीत त्या गाईला तिथंच सडत राहावं लागलं असतं. तिच्या पार्थिव शरीराची दुर्गंधी परीसरात सुटली असती. शिवाय त्यातून आजार पसरलाच असता. त्यामुळंच ती अस्वच्छतेची जात तेवढीच महत्वाची होती. जेवढी स्वच्छतेची कामं करणारी जात महत्वाची होती. त्यामुळंच विटाळ मानायलाच नको होता. व्यतिरीक्त मनुस्मृती लिहून जगाला मनुस्मृतीतील जाचक नियमांच्या आधारे जगायला लावले. जे जगणे अस्वच्छतेची कामं करणाऱ्यांसाठी व संपुर्ण स्रीवर्गासाठी जाचक स्वरुपाचे होते. मनुस्मृतीत स्वच्छता बाळगणाऱ्या विशिष्ट वर्गासाठी वेगळे व अस्वच्छ राहणाऱ्या विशिष्ट वर्गासाठी वेगळे नियम होते. शिक्षेच्या बाबतीतही भेदभाव केलेला होता. शिवाय अधिकार आणि स्वातंत्र्यही गोठवले होते. 
         काही लोकांनी विटाळाला अतिशय महत्वपुर्ण घटक मानून त्याचा साथीच्या आजाराशी सःबंध जोडला. त्याला अधिक प्राधान्य दिलं. परंतु हे जरी बरोबर असलं तरी विटाळ हा अतिशय महत्वाचा घटक नव्हताच आणि तो मानणे गरजेचे नव्हतेच. शिवाय आजाराशी विटाळाचा संबंध लावून लोकांनी एका विशिष्ट जातींना अस्पृश्य मानलं. तसंच रजस्व नावाच्या नैसर्गिक प्रवृत्तीलाही विटाळ मानून स्रियांच्याही स्वतंत्र्यपणे जगण्यावर मर्यादा आणल्या. त्यांचे समाजातील अधिकार नाकारले. त्यातच अस्पृश्यांचा सुर्योदयानंतरच्या काही तासाचा गावातील प्रवेश नाकारला.
         एकीकडे त्यांचा स्पर्श म्हणजेच आजाराचा शिरकाव मानलं. तर दुसरीकडे त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्यांना चालल्या. याचाच अभ्यास बाबासाहेबांनी केला होता. त्यानंतर बाबासाहेबांनीच सांगीतलं की पिढीतील धंदे सोडा. ते धंदेच विटाळ टिकवतात. आपल्याला माणसाप्रमाणे जगू देत नाहीत. आपल्याला त्या धंद्यामुळेच अतुच्छतेचं जगणं सहन करावं लागतं. त्यांनी पिढीजात धंदे सोडायला लावले. जातीगत विटाळ मिटविण्यासाठी. परंतु जात मिटवली नाही. जी जात मिटवायला हवी होती. ज्या कामातून जात निर्माण झाली होती व जातीअंतर्गत विटाळही निर्माण झाला होता. जो विटाळ मनुस्मृती आणि भाला संग्राममधील काही जाचक नियमांनी निर्माण केला होता. जाती, विटाळ व भेदभावाच्या पैलूतूनच त्यांनी मनुस्मृती जाळली. कारण त्यात लिहिलेल्या काही अनैतिक गोष्टी. ज्या मनाला रुचत आणि पटत नव्हत्या. शिवाय त्या प्रकरणाचा खटला न्यायालयात गेला. ज्यात विटाळ, भेदभाव होता. प्रथम तो खटला खालच्या न्यायालयात चालला. त्यानंतर तिथं बाबासाहेबांना विजय प्राप्त झाला व तो विजय इतर लोकांना पटला नसल्यानं तो खटला उच्च न्यायालयातही चालला. ज्यात विटाळ वाईटच असा निकाल आला होता. तरीही आज काही लोकं विटाळाच्या नियमांचा उदोउदो करुन त्या संबंधित विटाळाचा संबंध साथीच्या आजाराशी लावतात. त्या अस्पृश्य शोषत असलेल्या व स्रियांचे हक्कं नाकारणाऱ्या गोष्टी काही लोकं चांगल्या होत्या असे मानतात. म्हणतात की आजपर्यंत जो देश मनुस्मृतीच्या आधारावर चालला. चांगला चालला. ज्यानं राष्ट्र टिकवलं. त्यांचं म्हणणं असं की मनुस्मृती चांगली.
         मनुस्मृती, विटाळ, भेदभाव स्रियांचे अधिकार नाकारणे. या गोष्टी चांगल्या होत्या की वाईट. हे म्हणणं नाही. प्रत्येकांचं मत याबाबतीत वेगवेगळं असू शकते. कारण सर्वच व्यक्तींना सर्वच गोष्टी चांगल्या वाटतीलच असं नाही. एखाद्याला एखादी गोष्ट जास्त आवडते तर तीच गोष्ट दुसऱ्याला अजिबात आवडत नाही. तेच झालं मनुस्मृती म, विटाळ, भेदभाव व इतर गोष्टींबद्दलबद्दल. आज जेही लोकं त्या सर्व गोष्टीला चांगले म्हणत असतील. त्यांना त्या गोष्टी आवडत असेलच यात शंका नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांना त्यातील जाचक नियमांची झळ पोहोचलेली नसेल. त्यामुळं त्यांनाच त्यातील नियमांबद्दल काही घेणं देणं नव्हतंच. परंतु ज्यांना त्यातील नियमांची झळ पोहोचली. त्यांना मनुस्मृती, विटाळ, भेदभाव, स्रियांचे अधिकार नाकारणे या गोष्टी तरी कशा आवडतील? समजा एखाद्याला कारल्याची भाजी आवडत नसेल तर तो व्यक्ती कारल्याच्या भाजीला कडूच म्हणेल व ज्या व्यक्तीला कारल्याची भाजी आवडत असेल, तो व्यक्ती आवडीनं कारल्याची भाजी कडू होवूनही खाईलच खाईल. तेच झालं बाबासाहेबांबद्दल. त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. त्यांना त्यातील नियम अजिबात पटले नाहीत. म्हणूनच त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि चवदार तळ्याचा सत्याग्रहही. ही बाब नाकारता येत नाही. तसाच तो खटला न्यायालयात गेला व न्यायालयानंही त्यातील नियम सामान्य लोकांच्या जीवन जगण्यासाठी वाईट आहेत याची पडताळणी करुन वा गृहीत धरुन जी मनुस्मृती जाळण्याची कृती वा इतर कृती चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर केल्या होत्या. त्या कृतींना योग्य ठरवत बाबासाहेबांच्या कृतींचं समर्थन केलं. त्यानंतर निकाल दिला की आजपासून अशा सर्वच कृत्यांवर कायमस्वरुपी बंदी लावण्यात येत आहे. त्यातूनच विटाळ, स्रियांचे अधिकार नाकारणे आणि भेदभावावर बंदी घालण्यात आली. 
          विटाळ व भेदभावाची पाश्वभुमी. समाजाला बाबासाहेब जागृत करीत होते. सांगत होते की पिढीजात धंदे सोडा. ते अस्वच्छतेचे धंदे आहेत व त्यापासूनच भेदभाव, विटाळाचे किडे वळवळतात. वाढतात. विटाळ ही कीडच. शेवटी काही लोकांना वाटले, विटाळ नष्ट व्हावा. त्यांनी पिढीजात धंदे सोडले. ज्यातून सामाजिक परीवर्तन झालं व विटाळ मिटला व त्याचा परिणाम हा झाला की तद्नंतर समाजातील काही लोकांनी पिढीजात धंदे सोडले नाहीत. त्यांनाही समाजात सन्मानाचं स्थान मिळायला लागलं. 
        आज विटाळ नाही. विटाळ कायमचा मिटला आहे असंही म्हणता येत नाही. तरीही समाजात काल ज्या घटकाला हीन समजलं जात होतं. त्या घटकाला आज समाजात मानाचं तसंच सन्मानाचं स्थान आहे. काल धंद्यावरुन नीच समजल्या अस्पृश्यांनाही आज उच्च जातीचे लोकं आपल्या बरोबरीनं जगण्याची परवानगी देतात. त्यांना हीन लेखत नाहीत. विटाळाच्या कालचक्रात काल मोठं घर बांधण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना काल मोठं घर बांधता येत नव्हतं. आज तेही मोठं घर बांधू शकतात. एकमेकांच्या विवाह समारंभात भेदभाव न बाळगता सहभागी होत असतात. काल उच्च शिक्षण शिकता येत नव्हतं. आज उच्च शिक्षण शिकता येतं. काल एका अस्पृश्यानं तपश्चर्या केली म्हणून त्याच्या कानात शिसं ओतलं. आज तशी गोष्ट घडत नाही व तसा अन्याय झाल्यास आज न्यायालयात दाद मागण्याची तरतूद उपलब्ध आहे. कोणीच कोणाला हीन लेखू शकत नाही. अत्याचार करु शकत नाही. कारण आज कायद्याचं राज्य आहे व कायद्याचं उल्लंघन आज तरी करता येणे शक्य नाही. हेही शक्य झालं बाबासाहेबांमुळं. तरीही काही ठिकाणी विटाळ वळवळतोच. भेदभावही वळवळतोच. काही ठिकाणी स्रियांचे अधिकारही नाकारले जातातच. हे सगळं घडत असतं जातीमुळे. काही ठिकाणी आजही विशिष्ट जातीला हीन समजलं जातं. विटाळ मानला जातो. जात सहजासहजी सांगता येत नाही. ती जाणीवपूर्वक जाणूनबुजून लपवून आपली दुसरीच उच्चभ्रू जात सांगीतली जाते. याला काय म्हणता येईल. भेदभाव आणि विटाळच ना. 
         आज बाबासाहेब आंबेडकर देवच आहेत की ज्यांनी समाज सुधरवला. समाजातील विटाळ थोडाफार बदलवला. लोकांना खुल्ल्या मनानं जगात प्रवास करता येत असतं. आपली जात लपवून का असेना, वावरता येत असतं. अन् तरीही यदाकदाचित जातीवर अन्याय झाल्यास न्यायालयात दादही मागता येत असतं. याचाच अर्थ असा की बाबासाहेबांनीच कायद्याचं राज्य आणलं. लोकांना सन्मानानं जगण्याचाही मार्ग उपलब्ध करुन दिला. विटाळ थोडासा का होईना, परंतु कायमचा संपला. हे जरी बरोबर असलं तरी आजही काही ठिकाणी भेदभाव आहेच. विटाळाच्या कालचक्रात आजही माणसं मारलीच जात आहेत. असं का होतं? तर त्याचं एकमेव कारण आहे जात. कारण जातीनंच भेदभाव निर्माण केला अन् जातीनंच विटाळदेखील. ती जात जेव्हा बंद होईल, तेव्हाच विटाळालाही पायबंद बसेल. त्यातल्यात्यात जातीप्रथा देखील नष्ट होईल यात शंका नाही. जर जात नष्ट होत नसेल तर, विटाळ, भेदभाव वा स्रियांचे अधिकार नाकारणे ह्या गोष्टी कधीच संपणार नाहीत. काल जरी मनुस्मृती जाळली असेल, तरी आज ती जाळून काहीच उपयोग नाही. काल चवदार तळ्याचं आंदोलन केलं गेलं व खटला लढल्या गेला असला तरी आज त्याचा काही उपयोग नाही. अन् कालच्या निकालानं विटाळ व भेदभाव थोडासा का होईना, संपला असला तरी आज त्याचा काहीच फायदा नाही. हे म्हणणे संयुक्तिक ठरते. 
         डॉ. बाबासाहेब हे हिंदू होते. आरक्षण हे त्यांनी हिंदू धर्मात राहूनच लोकांना मिळवून दिलं. जेव्हा संविधान जगजाहीर झालं. ते कशासाठी तर हा सर्व उपेक्षित राहिलेला समाज सुधरावा. त्या समाजानंही आरक्षणाचा वापर करुन आपला सर्वप्रकारचा विकास करावा. परंतु तेवढी सोय करुनही जेव्हा त्यांनी पाहिलं की हा अस्पृश्य समाज जागच्या जाग्यावर आहे. त्यांच्यात एवढासाही बदल झालेला नाही. तेव्हा तसाच विचार करुन धर्म बदलवला तर कदाचीत आपला समाज सुधरु शकतो असं बाबासाहेबांना वाटलं व त्यांनी धर्म बदलवला. ते बौद्ध झाले. परंतु ते जरी बौद्ध झाले असले आणि आपल्या समाजालाही बौद्ध बनवलं असलं तरी समाज सुधरला नाही. त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला नाही. म्हणूनच आरक्षण वाढवावं लागलं. 
          आज आरक्षण आहे. परंतु समाज सुधरला नाही. समाजातील काही लोकांनीच फक्त आरक्षणाचा लाभ घेतला. काहींनी लाभ घेतलाच नाही. म्हणूनच आरक्षण आजही सुरु आहे व त्यातूनच आज इतरही जातीचे वाद सुरु झाले आहेत. त्यामुळंच विशेष सांगायचं म्हणजे हे सर्व जात आहे, म्हणूनच सुरु आहे. जात जर नसती तर आरक्षण, भेदभाव, विटाळ नसताच, ना कोणावर कोणाचा अत्याचार झाला असता, ना कोणीच कोणाला उच व कोणीच कोणाला नीच समजले नसते. सर्व लोकं समान असते, समानतेनं जगले असते. म्हणूनच जात नष्ट करणे आहे व सर्व लोकांना समाजात समानतेने वागणे शिकवणे आहे यात शंका नाही. 
                 
           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०





 

माहेरचा गोडवा

         गोविंदा आज म्हातारा झाला होता.त्याला चालता फिरता येत जरी नसलं तरी त्याचं डोकं जाग्यावर होतं.त्याची स्मृती अजून गेलेली नव्हती.ती अजूनही शाबूत होती.नव्हे तर तो आपल्या बुद्धीनं आजही विचार करु शकत होता.
         त्याला आपल्या मुलीबद्दल गर्व होता.त्याचं स्वप्न होतं की आपली मुलगी वकील बनून समाजातील जे दुर्बल घटक आहेत.त्यांची सेवा करावी.ते स्वप्न साकार झालं होतं.कारण त्याची मुलगी वकील बनली होती.ती लढत होती अन्यायाविरुद्ध.जे कोणी अन्याय आणि अत्याचार करीत होते अबलांवर.
          तो तसा खुश होता.पण त्यालाही दुःख व्हायचं.जेव्हा तो भुतकाळ आठवायचा.त्याची मुलगी नयना आणि कांता अशाच अत्याचाराच्या शिकार बनल्या होत्या.
          गोविंदाला आज वाटत होतं की आपली मुलगी ज्याप्रमाणं हुंडाबळी स्रीयांना न्याय मिळवून देण्यासाठी लढते.ज्याप्रमाणे ती बलत्कार पिडीतेसाठी लढते.त्याचप्रमाणं तिनं भ्रृणहत्येविरोधातही लढावं.कारण त्या बिचा-या गर्भातील मुली.त्या मुलींचा अजूनही जन्म झालेला नसतो.त्यांनी अजूनही कोणाला त्रास दिलेला नसतो.काही लोकं अत्याचार झाल्यास पाप केल्याचा हवाला देतात.तसं तर काहीच नसतं.कारण ह्या गर्भातील मुलींनी कोणतं पाप केलेलं असतं? तरीही आमचा नागडी समाज त्यांना ठार करतो.कारण मुलगी होणं हाच आजच्या काळातील शाप आहे.
           मुलगी झाली रे झाली की तिचा जन्मापासूनच छळ केला जातो.लहानपणीच तिचं नाक कान टोचलं जातं.त्यात तिला असंख्य वेदना होतात.पुढं खेळण्याच्या वयातच तिला घरची सगळी कामं करायला लावली जातात.पाणी भरणे,भांडी घासणे तसेच तिला लवकरच स्वयंपाक शिकवला जातो.मुलगी झालीच तर तिच्या नावानं पाहिजे तेवढ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला जात नाही.पण मुलगा झालाच तर खुप खुशी साजरी केली जाते.
         पहिली मुलगी झाली.तर मुलासाठी वाट पाहिली जाते.कारण अमर्याद हुंडा आणि समाजातील स्रीयांची असुरक्षितता यामुळं स्रीयांचा जन्म हा नकोसा समजला जावून भ्रृणहत्या........भ्रृणहत्या हा गुन्हा असतांना देखील.काही काही ठिकाणी तर गर्भाला जबरदस्तीनं पाडलं जातं.म्हणूनच याबाबत ठोस कायदा बनायला हवा की जेणेकरुन कोणी भ्रृणहत्या करणार नाही.मुलींना संरक्षण मिळेल.
           भ्रृणहत्येबाबत विचार केल्यास जर स्रीला समाजात सुरक्षा मिळाली तर भ्रृणहत्या होणार नाहीत.या सुरक्षेत हुंड्यासाठी मुलींना न छळणे.हुंडा पद्धती बंद करणे.देवदासी प्रथा बंद करणे एवढेच नाही तर ज्या ज्या क्षेत्रात आणि ज्या ज्या ठिकाणी मुलींना छळलं जातं.त्या त्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावायला हवा.एवढेच नाही तर स्रीयांचे हुंड्यासाठी बळी जात असतील तर तिला सासरी पाठविण्याऐवजी मुलांनीच तिच्या माहेरी येवून राहिल्यास किंवा मुलीनं तिला माहेरी येवून राहायला बोलावल्यास हुंड्यासाठी कधीच छळ होणार नाही.स्रीयांना अभय मिळेल.परंतू जावई सास-याच्या घरी राहायला जावू नये म्हणून काही म्हणी आजही अस्तित्वात आहेत.जसे 'सास-याच्या घरी जावई चोर' 'घरढगल्या' 'बायल्या' खरं तर सास-याच्या घरी जावई जावून राहणे चांगली पद्धत असून त्या पद्धतीतून नक्कीच स्रीयांवरील अत्याचार कमी होवू शकतील.भ्रृणहत्याही कमी होतील.कारण स्रीयांचा सन्मान वाढेल व मुली पैदा करण्यात लोकांना कुचराई वाटणार नाही.पण आज मुली मुलांकडे राहायला जात असल्यामुळे हुंडाबळीसारख्या समस्या आहेत.तसेच भ्रृणहत्याही सर्रास होत आहेत.
           आज गोविंदाच्या मुलीनं जनहित याचिका न्यायालयात स्वतःकडून दाखल केली होती.त्यात प्रावधान ठेवलं होतं की विवाहानंतर मुलींनी सासरी राहायला जाण्याऐवजी माहेरीच राहावं.तसेच वर मुलांनी पत्नीकडे येवून राहावं.त्यास हवालाही दिला होता.तो म्हणजे कांता आणि नयनाचा.केवळ नयनाच नाही तर समाजातील कित्येक मुलींचा.ज्या मुली हुंड्यासाठी जाळल्या जात होत्या नव्हे तर बलत्काराच्या शिकार होत होत्या.
           आज तिनं दाखल केलेली तक्रार निकाली निघाली होती.न्यायालयानं स्पष्ट आदेश दिला होता की लग्न झाल्यानंतर पतीनं पत्नीच्या माहेरी जावून राहावं.
            आज मुलींना अभय मिळालं होतं.मुली हुंड्यासाठी जाळल्या जात नव्हत्या.तसेच गावचीच मुलगी म्हणून गावात बलत्कारही होत नव्हते.एवढंच नाही तर मुलगी होवो की मुलगा, कोणाचीही गर्भलिंगतपासणी केली जात नव्हती.तसेच मुलापेक्षा मुलीच्या जन्माच्या वेळी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला जात होता.आज स्रीयांना माहेरी माहेरचा गोडवा वाटत होता.

        अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०




 

विवाह करताय ; चांगला विचार करा 

           अलिकडे न्यायालयात घटस्फोटाचे खटले दाखल होत आहेत. खटले वाढत असून निकालाच्या मानानं खटल्याची संख्या जास्त आहे. या खटल्यातील वादाचा विषय असते सासू. सासू मोठी खास्ट आहे असं कारण पुढं करीत न्यायालयात खटले दाखल होत असतात. तसं पाहता अलिकडील काळ बदललेला आहे व काही काही घरात सासवांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. 
        पुर्वीचा काळ असा नव्हता. त्या काळात सासवा बदमाश असत असं आजच्या काळातील लोकांचं म्हणणं. परंतु त्या काळातीलही अपवादात्मक दोनचार जर सोडल्या तर काही सासवा खऱ्याच चांगल्या होत्या. मग सासवा खास्ट असतात. त्या चांगल्या नसतात असा सासवांचा इतिहास बदनाम करणारा का पुढे आला असावा? त्याचं कारण होतं बालविवाह. 
        आई......आपली आई आपल्याला प्रिय असते. कारण ती आपली आई असते. त्यातच तिनं आपल्याला कितीही त्रास दिला तरी तो त्रास आपल्याला त्रास दिल्यासारखा वाटत नाही. कारण ती आपली आई असते. एखाद्या वेळेस आपण आपल्या आईचं एखादं काम जर केलं नाही तरी आई रागावते व आपल्याला मारते. तेव्हा आपल्याला तिचा तात्पुरता राग येतो. मग काही वेळानं तो राग आपण विसरुन जातो. त्याचा राग आपण आपल्या मनात धरुन ठेवत नाही. परंतु त्याचवेळेस जर ती आपली आई नसेल, दुसरं कुणीही असेल आणि ती व्यक्ती आपल्यावर कितीही प्रेम करीत असेल तरी त्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो. तीच गोष्ट पुर्वी आपल्याला सासवाच्या बाबतीत घडून आलेली दिसते. 
           पुर्वी बालविवाह व्हायचे व ते बालवय असायचं आणि त्या बालवयात विवाह व्हायचे. तसं पाहता त्या बालवयात तसे बालविवाह झाल्यानंतर ते खेळण्या बागडण्याचं वय असतांना सासू तिला घरची कामं सांगायची नव्हे तर ती कामं करीत असतांना जर ती चुकलीच तर तिला ती समजावून सांगायची. त्यातच ती अशी कामं करीत असतांना ती सारखी चुकत असेल तर तिला रागवायची. तसं त्या सुनेचं वय,लहान असल्यानं तिला ते मारायचीही. जशी आजची आपली आई आपल्याला मारते तशी. तसं पाहता त्या सासुनं तसं मारताच तिला राग यायचा. जसा आजच्या काळात आपल्याला कोणी मारत असेल तर राग येतो तसा. याच रागावरुन व मारण्यावरुन सासू बदनाम झाली पुर्वीच्या काळी. काही दिवस जाताच हे मारणे जेव्हा ती समजदार होत असे. तेव्हा लक्षात येत असे व तेव्हा तीव्र राग मनात राहात असे. 
           आज काळ बदलला. या बदलत्या काळानुसार सासू सुनेच्या व्यवहारात बदल झाला. सासू सून झाली व सून सासू. आता सासूवर सून अत्याचार करती झाली. परंतु ज्या घरातील मुलगा आपल्या आईवर आपल्याच पत्नीकडून होणारा अत्याचार सहन करु शकला नाही. तेव्हा वाद झालेत व असे वाद झालेत की ज्याचं रुपांतरण चक्कं घटस्फोट व न्यायालयातील खटल्यात झालं. कारण कायद्याचं अलिकडील काळात पत्नीला अभय दिल्या गेलं आहे. 
          कायदे बनले हे अभ्यास करुनच. परंतु ते कायदे बनवितांना कदाचीत घराघरातील परिस्थिती लक्षात घेतलेली नसावी. वरवर परिस्थिती पाहून कायदे बनले असावेत. कारण प्रत्येक घरातील परिस्थिती सारखी नसते. काही घरात प्रेम असतं तर काही घरात प्रेम, जिव्हाळा याला थारा नसतो. उदाहरणार्थ एखादी सावत्र आई एखाद्या बाळाला स्वतःच्या मुलासारखी वागणूक देवू शकते. तर काही सावत्र आई काही काही बाळांना सावत्रपणाचीच वागणूक देत असतात. हे नाकारता येत नाही. तेच घडलं असेल कायदे बनवितांना. कायदे बनले देशातील विपरीत परिस्थिती पाहूनच. त्याचा सखोल अभ्यास केला त्यांनी. परंतु असा सखोल अभ्यास करीत असतांना प्रत्येक घरातील वातावरण वेगळं असते याची जाणीव न ठेवून कायदे बनल्यानं आज घराघरातील वातावरण तंग अशा स्वरुपाचं आहे व आज अशाच तंग वातावरणातून आलेल्या गैरसमजुतीतून न्यायालयात खटले दाखल होत आहेत व त्या खटल्यात वाढ होत आहे.
            महत्वपुर्ण गोष्ट ही की प्रत्येक सुनेनं आज आपल्या सासूला समजून घेण्याची गरज आहे. तिनं तिला आपली आईचं मानावं. तिला बदनाम करु नये. कारण आज तो काळ गेला की ज्या काळात बालविवाह होत व अगदी अल्पवयात घरी आलेल्या मुलीला सर्व करतब शिकविण्याचे काम सासू नावाची त्या काळातील आई शिकवीत असे. ती तिला सर्व गोष्टीत पारंगत करीत असे. जो साधारण आजच्या काळातील महिलांना अत्याचार वाटत असतो. आज त्याच महिलेनं समजून घ्यावं आपल्या सासूला. तसं पाहता आज काळ बदलला नाही. काळ तोच आहे. फरक एवढाच आहे की आजच्या काळात महिलांचे बालविवाह होत नाहीत व आजच्या काळात जे विवाह होतात. ते विवाह ती समजदार झाल्यावर होतात. त्यामुळं सासू जर एखादी चांगली गोष्ट सांगत असेल तर ती आपल्याला सहजासहजी स्विकारता येत नाही. स्विकारण्यात समस्या निर्माण होतात. म्हणूनच घटस्फोट, अत्याचार ह्या साऱ्या कटकटी वाटतात. कारण आजच्या काळात वय वाढलेले आहे विवाहाचे व या वाढत्या वयात आपलं काहीही चुकत असल्यास वा त्यावर कोणीही काही सुचना करीत असल्यास त्या सुचना आपल्याला आवडत नाहीत. त्या सुचना वारंवार केल्यास आपल्याला राग येतो व तशी आपल्याला आपल्याच हितासाठी कोणी अक्कल सुचविलेली आवडत नसल्यानं आपली भांडणं होत असतात. 
           नवीन सुन, मग ती कितीही वयाची का असेना, घरामध्ये नवीनच नांदायला येतांना तिला तसा फारसा अनुभव नसतोच. तो अनुभव सासूला नक्कीच असतो. शिवाय नवीन घर. नवनवीन व्यक्ती, नवीन परीसर, नवीन शेजारी, रोजच नवनवीन लोकांशी येणारा संपर्क हा नवीनच असतो व त्या लोकांशी जुळवून घेणे ह्या गोष्ट काही एकाच दिवशी शक्य होत नाहीत. त्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. परंतु आपला स्वभाव हा उतावीळ असतो. तो उतावीळ बनलेला असतो. कारण आपल्या मायबापानं आपले फारच लाड पुरविलेले असतात. शिवाय अशा उतावीळ स्वभावाने त्या नवीनच वातावरणात आपण स्वतःला दिडशहाणे समजत असल्यानं व आपल्या मायबापानं तसं आपल्याला सांगीतलं असल्यानं आपल्यासमोर नवीन लोकांनी काही सुचविलेलं आपल्याला खपत नाही व ती सुचना करणे म्हणजे आपल्याला अत्याचार वाटतो. त्यातूनच घटस्फोटासारखे प्रसंग निर्माण होत असतात. 
           विशेष सांगायचं म्हणजे आपले वय जरी वाढले असेल अन् वाढत्या वयात आपण समजदार जरी झालो असेल तरी आपण स्वतःला शहाणे समजू नये. तरच संसार टिकतो. आपण समजदार असल्यानं आपल्यावर कोणीही आजच्या काळात अत्याचार करु शकत नाहीत. काही जण सुचनाही करतात. त्या सुचना समजून घ्याव्या. त्याचा बाऊ करु नये. तरच संसार टिकेल. तसा तो टिकवावा. अन् ज्याला तसं वागायचं नसेल. संसार टिकवायचा नसेल, तर त्याचा त्यांनी आधीच विचार करावा. त्यानं विवाहही करु नये व संसारात पडू नये. व्यतिरिक्त संसारात पडून कुणाचं जीवन उध्वस्त करु नये म्हणजे झालं.

            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.