पठाण हसन अस्लमचा पहिला रोजा पुर्ण

 पठाण हसन अस्लमचा पहिला रोजा पुर्ण 



आष्टी प्रतिनिधी - मुस्लिम धर्माच्या पवित्र  रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लिम समाजातील लहान चिमुकल्यांना वगळून इतर सर्वांना रोजा (फर्ज) सक्तीचे असतात. परंतु घरात पालकांचे पाहून हे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा धरतात. आष्टी येथील आझाद उर्दू प्राथमिक शाळामध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेला पठाण हसन अस्लम (वय ८ वर्ष) या लहान मुलाने आयुष्यातील पहिला रोजा कडक उन्हाळा सुरू असतानाही रविवार दिनांक २३ मार्च रोजी पुर्ण केला आहे. यावर्षीचा पवित्र रमजान महिना शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजीच्या सायंकाळ पासून आरंभ झाला. पठाण हसन अस्लम याने दिवससभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंबही न घेता काटेकोर नियम पाळत आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी पुर्ण केल्याबद्दल नातेवाईक व इतरांनी तीचे कौतुक करत पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.