करंजी गावात एक दिवस गावकऱ्यासोबत रंगला दरबार
आष्टी l
शासनाच्या विविध विभागाच्या योजनेची माहिती देणे पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळून देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून मराठवाड्यात एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे बुधवारी आष्टी तालुक्यातल्या करंजी गावात असाच ग्राम दरबार चांगलाच रंगला होता
विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून मराठवाड्याच्या प्रत्येक गावात जर बुधवारी शासनाची माहिती गावकऱ्यांना मिळावी म्हणून एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार हा खास उपक्रम सुरू केला आहे याच निमित्ताने बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करंजी गावात बुधवार दिनांक ५ मार्च रोजी सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर या खास दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गट विकास अधिकारी जी. व्ही बागलाने यांनी गावात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली तर गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी गावातील शाळा आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली तर कृषी अधिकारी काळे यांनी कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेची माहिती गावकऱ्यांना दिली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तुपार जावळे यांनी आरोग्य विभागात राबवण्यात येणाऱ्या योजनेची माहिती दिली तर विस्ताराधिकारी जायभाय,एन.डी शिंदे यांनी विविध योजनेसाठी लागणारे कागदपत्रांची माहिती दिली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सारिका भरत आजबे, उपसरपंच जयश्री बाळू चौधरी, सर्व ग्रामपंचायत सदस गावकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जायभाये यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामविकास अधिकारी कैलास धोंडे यांनी मानले
stay connected