आकुर्डी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा
निगडी( पुणे):-२८ फेब्रुवारी २०२५ रोजी नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.त्या निमित्ताने विज्ञानाची ओळख व्हावी,त्या बाबत कुतूहल जागृत व्हावे यासाठी आज,बुधवार दिनांक ५/३/२०२५ रोजी इयत्ता ५ वी ते ७ वी,चे सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,आकुर्डी,पुणे ३५ येथील ६० विद्यार्थ्यांना विज्ञान / परिसर सहल(भेट) साठी चिंचवड येथील सायन्स पार्क येथे नेण्यात आले..तेथे मुलांना विज्ञान खेळणी,तारांगण,3 D शो ,विविध वैज्ञानिक उपकरणे,शास्त्रज्ञांची ओळख,त्यांचे कार्य,डायनासोर व त्यांचे अंडे यांच्या प्रतिकृती,चाकाच्या शोधापासून ते आतापर्यंतचा विकास..इत्यादी विविध गोष्टींचे ज्ञान देण्यात आले.यासाठी संस्थेचे व्यवस्थापक व सचिव माननीय श्री.गोविंद दाभाडे सर,मुख्याध्यापक सौ.संगीता गुरव मॅडम,उप मुख्याध्यापक श्री.विजय बच्चे सर यांचे मार्गदर्शन लाभले.यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे विज्ञान शिक्षक,विज्ञान विषय प्रमुख:-सौ.प्रतिमा काळे व विज्ञान शिक्षक:-श्री.राहुल वांगेकर,सौ.सविता पाटील,सौ.सुकन्या जाधव.
stay connected