प्राध्यापक डॉ. सय्यद जमीर यांची महाराष्ट्र बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड

 *प्राध्यापक डॉ. सय्यद जमीर यांची महाराष्ट्र बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड*     



दिनांक 18 मार्च ते 24 मार्च 2025 या दरम्यान गुवाहाटी आसाम येथे होणाऱ्या पहिल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी महाविद्यालयाचे  राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. सय्यद जमीर शब्बीर यांची महाराष्ट्र बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाल्याचे पत्र भारतीय बास्केटबॉल संघटनेचे सचिव कुलविंदर सिंग व अध्यक्ष अधव अर्जुना यांनी दिले आहे. 



त्यांच्या या यशाबद्दल श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश भंडारी, ट्रस्ट अध्यक्ष श्री गोकुळदाजी मेहेर, कार्याध्यक्ष कांतीलाल चानोदिया, उपाध्यक्ष बिपिन भंडारी, उपाध्यक्ष अनिल झाडमुथा, सचिव हेमंत पोखरणा, कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी, मानद मंत्री डॉ. महेंद्र पटवा, संचालक योगेश चानोदिया, संजय मेहेर, गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज. मो. भंडारी, प्रशासकीय अधिकारी नवनाथ पडोळे, बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष शिवराज पाटील, सहकारी, क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.