मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या संजीवन समाधी महोत्सवाचे २९ आणि ३० मार्च रोजी आयोजन

 मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या संजीवन समाधी महोत्सवाचे २९ आणि ३० मार्च रोजी आयोजन




आष्टी:प्रतिनिधी  

बीड,  नगरसह महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आष्टी तालुक्यातील सावरगाव नजीकच्या मच्छिंद्रनाथ देवस्थान ( मायंबा ) समाधी महोत्सवाचे २९ आणि ३० मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे.  

     गर्भगिरीच्या पर्वत रांगेतील आष्टी आणि पाथर्डी तालुक्याच्या हद्दीवर मच्छिंद्रनाथ मायंबा हे देवस्थान आहे.  या ठिकाणी राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात.  दरवर्षी गुढीपाडव्याला येथे मोठी यात्रा भरते . त्याच्या आधी संजीवन समाधी महोत्सवामध्ये  विविध उपक्रमास सुरुवात होते.  यावर्षी मंगळवार दिनांक 25 मार्चपासून हा महोत्सव सुरू होत असून या दिवशी निशाण दिंडीचे मच्छिंद्रनाथ गडाहून पैठण कडे प्रस्थान होईल . 29 मार्च रोजी पैठण येथे निशान मिरवणूक होईल.  तेथून कावडीसह गडाकडे भाविक प्रस्थान करतील . 29 मार्च रोजी निशान आणि कावडीचे मच्छिंद्रगड येथे आगमन होईल.आधी महाआरती होईल त्यानंतर दुपारी दीड ते सायंकाळी चार या वेळेत विविध ठिकाणाहून कावडीने आणलेल्या गंगाजलाने समाधीस अभिषेक केला जाईल . सायंकाळी चार ते पहाटे साडेपाच या वेळेत समाधीस उटणे,  चंदन लेप लावणे हा कार्यक्रम पार पडेल.  मागील वर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने रात्री बारा ऐवजी हा चंदन लेप लावण्याचा कार्यक्रमाची वेळ सायंकाळी चार पासून वाढवण्यात आली आहे .  त्यानंतर रविवार दिनांक 30 मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता समाधीची विधीवत महापूजा केले जाईल त्यानंतर आरती होईल आणि नियमित दर्शन सुरू होईल अशी माहिती मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे



 

आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे संपूर्ण जगामध्ये एकमेव अशी मच्छिंद्रनाथांची एकमेव संजीवन समाधी असून गेल्यावर्षी दर्शन रांगेमध्ये प्रचंड अडचणी आल्या होत्या.काही त्रुटी राहिल्या होत्या .त्या त्रुटी यावर्षी आम्ही सर्व सुधारल्या आहेत.आजपर्यंत सायंकाळी सात वाजता समाधी उघडी करून दर्शन सुरू होत होते मात्र यावर्षी सकाळी दहा वाजता कावडी येतील .दुपारी साडेबारा वाजता आरती होईल .एक वाजेपर्यंत उटणे काढणे कार्यक्रम .दुपारी एक ते चार कावडीने आणलेले पाणी घालणे.व चार वाजता उटणे (लेप)लावणे कार्यक्रम सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत समाधी दर्शन सुरू राहील हा बदल वाढत्या गर्दीमुळे करण्यात आला आहे.


आ.सुरेश धस

आष्टी विधानसभा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.