आगळा वेगळा जागतिक महिला दिन साजरा
एक आगळा वेगळा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
आजकाल काही ठीकाणी महिला दिनाच्या नावाने तुफान डान्स पार्टी केक कापणे मजामस्ती हेच धोरण लागू करण्यात आले आहे . महिला दिनाचे खरे उद्दिष्ट बाजूला न सारता त्या दिवशी काही तरी सामाजिक कार्य निरंतर करणारी एक संस्था आहे सेवा संकल्प हॅपी गृप नागपूर गेल्या दहा वर्षांपासून संस्था कार्यरत आहे.
वेगवेगळ्या जयंती सणवार उत्सव ही संस्था सामाजिक कार्य करत पार पाडते.यावर्षी सुद्धा तसेच कार्य करत एक उत्तम उदाहरण जनतेपुढे ठेवले.
क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो.योग्य उपचार आहार आणि काळजी घेतली तर हा रोग पुर्णपणे बरा होतो.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजना अंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दृष्टीने सेवा संकल्प हॅपी गृप नागपूर संस्थेच्या वतीने
#UPSC_Government_hospital#Nagpur येथे उपचार सुरू असणार्या रुग्णांना प्रोटीन युक्त फुड बास्केट पोहचविण्यात आल्या.
संस्थेच्या वतीने सौ मनिषा रुंगठा तिबडीवाल यांचे मन:पुर्वक आभार.मिस्टर तिबडीवाल यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेला अनमोल सहयोग केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
stay connected