जावेद सय्यद यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर
आष्टी : महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान सोहळा, साऊ ज्योती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच आयोजित करण्यात येत आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा23 मार्च रोजी पुण्यात पार पडणार आहे.
या सोहळ्यात दौलावडगाव ता.आष्टी.जि.बीड येथील, सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या समाजविभीमुख व्यक्तिमत्वाला, पोलीस मित्र समिती व पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल पत्रकार मा. श्री.जावेद सय्यद सर यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आपण करत असलेल्या उल्लेखनीय, प्रभावी कार्यातून एक सक्षम राष्ट्राच्या प्रस्थापनेचा प्रवाह भक्कम होऊन, तुम्ही कार्यरत असलेल्या क्षेत्रात तुमच्या कार्याचा ठसा उमटवला आहेच शिवाय, आपल्या हातून होत असलेली राष्ट्रसेवा ही खरोखरंच अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे असे गौरव उद्गार सामाजिक संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.
या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या जाहीर झालेल्या सन्मानाने माझी सामाजिक जबाबदारी वाढली आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी येत्या काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी नवी उर्जा, प्रोत्साहन, पाठबळ देणार आहे. अशी भावना पत्रकार जावेद सय्यद सर यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या आहेत.
stay connected