जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्यावतीने ऐरणीवर घाव घालणाऱ्या घिसाडी समाजातील महिलांचा सत्कार
कडा ( वार्ताहर):- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्या वतीने कडा येथील कष्टकरी आणि ऐरणीवर घाव घालणाऱ्या घिसाडी समाजातील महिलांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख हे प्रत्येक वर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करतात यापुर्वीही भाजीपाला विकणाऱ्या व बांधकाम मजूर महिलांना सन्मानित करण्यात आले होते. प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण पुर्ण महिला दिन शंकर देशमुख यांच्या वतीने साजरा केला जातो. सौ. गिरीजा देशमुख व सौ. शकुंतला पवळ यांनी सर्व महिलांना हळदीकुंकू लावून तसेच शेला व पुष्पहार देऊन सन्मानित केले. कडा गावातील घिसाडी समाजातील एकुण १५ महिलांचा सन्मान करण्यात आला. शिक्षिका , डॉक्टर, व इतर उच्चशिक्षित महिलांचा सन्मान नेहमी होतो, परंतु देशमुख यांनी पुरुषांबरोबर कष्ट करणाऱ्या व ऐरणीवर घाव घालणाऱ्या आणि मान सन्मानापासुन दुर असणाऱ्या घिसाडी समाजातील महिलांचा सत्कार केला. कडा येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास हरिश्चंद्र बोडखे, राजु शिंदे , राजाभाऊ भंडारी, वेदांत देशमुख, महेश कर्डीले, अशोक खंदारे, शास्त्री, सोमनाथ आपरे व इतर उपस्थित होते.
stay connected