*डॉ.गौरव कुलकर्णी यांचे हिमॅच्युरिया या आजारावर मोलाचे मार्गदर्शन लाभले- डॉ जितीन वंजारे

 *डॉ.गौरव कुलकर्णी यांचे हिमॅच्युरिया या आजारावर मोलाचे मार्गदर्शन लाभले- डॉ जितीन वंजारे*



      दिवसेंदिवस उन्हाळ्याच्या झळा वाढत चालल्या आहेत, ऊन जास्तीत जास्त वाढत चालले आहे त्यामुळे तापमानात दिवसेंदिवस भर पडत आहे, ग्लोबल वार्मिंग सगळीकडेच वाढत असल्याकारणाने जीवघेना उकाडा जाणवत आहे त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊन उष्माघात होऊन बरेच लोक आपल्या जीवाला मुकतात. त्यातच लघवीत रक्त जाणे म्हणजे हिमॅच्युरिया हा आजार सर्व साधारणपने सर्रास दिसून येत आहे. लघवीत रक्त जाणे या विषयावर सखोल असं मार्गदर्शन अहिल्या नगर चे प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ गौरव कुलकर्णी यांनी केले. ही सी एम ई पाथर्डी येथील हॉटेल संस्कृती या ठिकाणी तालुक्यातील तीस ते चालीस डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडली.ह्यावेळी पाथर्डी मेडिकल असोसिएशन चे जवळजवळ सर्वच डॉक्टर्स उपास्थित होते या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तथा बीड हिमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर उपास्थित होते. यावेळी चिंतामणी हॉस्पिटल आणि युरोलॉजी सेंटर चे सर्वेसर्वा सन्माननीय प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ गौरव कुलकर्णी यांचा सत्कार पाथर्डी मेडिकल असोसिएशन च्या तर्फे करण्यात आला.



       यावेळी डॉ कुलकर्णी सरांनी सांगितले की लघवीत रक्त येण्यामागे मूत्र मार्गातील संसर्ग, प्रोस्टेट ग्रंथी ची गाठ,अनुवंशिक आजार, कॅन्सर, रक्त पातळ होण्याची औषधी,मुतखडा, किडनी आजार, मूत्रपिंड, मुत्राशय, प्रोस्टेट चा कॅन्सर किंवा इतर इन्फेकशन इत्यादी मुळे लघवीत रक्तश्राव होऊ शकतो.लघवीला लाल, तपकीरी गुलाबी लघवी येऊ शकते, अश्या वेळी योग्य तपासण्या आणि तात्काळ उपचार करून घेण्याचा सल्ला दिला. चिंतामणी हॉस्पिटल आणि युरोलॉजी सेंटर अहिल्या नगर कधीही तुमच्या सेवेत असेल,कोणतेही रुग्ण आल्यानंतर त्याला योग्य मार्गदर्शन आणि सटीक उपाय योजना आम्ही करू अशी ग्वाही यावेळी डॉ गौरव कुलकर्णी यांनी दिली.गोरगरिब रुग्णांना योग्य किंमतीत महागडे उपचार सवलतीच्या दरात देऊ असही ह्यावेळी डॉ कुलकर्णी बोलले.यावेळी सेमिनार संपल्या नंतर स्नेहभोजन केल आणि कार्यक्रम संपला. हा सीएमई  यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल चे जनसंपर्क अधिकारी रोहन कुटारे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला असोसिएशन अध्यक्ष डॉ श्रीधर देशमुख, राज्य प्रतिनिधी डॉ सुहास उरणकर, डॉ अमोल शिरसाठ, सल्लागार डॉ मृत्युंजय गर्जे, सल्लागार डॉ दीपक देशमुख, डॉ बाहेती, डॉ. अभय आव्हाड,डॉ शिरीष जोशी, डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्यासह पाथर्डी शहरातील अनेक अनेक डॉक्टर बंधू भगिनी उपास्थित होत्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.