आष्टीत आ.सुरेश धस यांच्यावतीने दावत-ए-इफ्तार पार्टी संपन्न
आष्टी। प्रतिनिधी
आष्टी ईदगाह मैदान येथे भाजपा आ.सुरेश धस यांच्यावतीने मुस्लिम बांधवांसाठी दावत-ए-इफ्तारचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात शेवटच्या शुक्रवारी दि.२८ मार्च रोजी आष्टी येथील ईदगाह रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मुस्लिम समाजाचा पवित्र महिन्याचे औचित्य साधून भाजपाचे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आ.सुरेश धस हे दरवर्षी मतदारसंघात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात.
सर्वधर्मिय जातीय सलोखा जोपासला जावा, समाजा-समाजामध्ये एकता आणि सामाजिक सलोख्याचा विश्वास अधिक दृढ व्हावा या उद्देशाने रोजा इफ्तार पार्टीचे आ.सुरेश धस यांच्यावतीने आयोजन केले जाते.याचेच औचित्य साधून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अनेक नागरिकांनी यावेळी आस्वाद घेतला.यावेळी आ.सुरेश धस यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा नेते जयदत्त धस,नगराध्यक्ष जिया बेग,डॉ.अजहर बेग,सय्यद तय्यब, दत्ता काकडे,यशवंत खंडागळे,एन.टी. गर्जे,बाळू शेठ मेहेर,संजय मेहेर,सेवा निवृत्त नायब तहसीलदार सलीम शेख,नूसरत बेग,टाटा बेग,बब्बुशेठ अत्तार, अज्जू भाई,अस्लम बेग,रिहान बेग,समीर बेग,अज्जू तासकंद,नगरसेवक इर्शन खान, समीर शेख,नगरसेवक शरीफ शेख,इम्रान तांबोळी,शाकिर कुरेशी,शफी कुरेशी,समीर सय्यद,चिंटू अग्रवाल,सादिक कुरेशी,रज्जी बेग, पत्रकार जावेद पठाण,सलीम कुरेशी,अँड.रियाज शेख,सय्यद अय्याज,रहीम शेख आदी हिंदू-मुस्लिम बांधव मोठया संख्येने या इफ्तार पार्टीला उपस्थित होते.
stay connected