महाराष्ट्रात प्रथमच मराठी भाषा गौरव दिनाचा बिल्ला प्रसिद्ध केल्याबद्दल महाड तालुका सामाजिक संस्थेतर्फे अंकुश जोष्टे यांचा सत्कार


महाराष्ट्रात प्रथमच मराठी भाषा गौरव दिनाचा बिल्ला प्रसिद्ध केल्याबद्दल महाड तालुका सामाजिक संस्थेतर्फे अंकुश जोष्टे यांचा सत्कार 



महाड तालुका सामाजिक संस्था ठाणे ही विविध सामाजिक कार्यक्रम राबविणारी संथा असून संस्थेचे आधारस्तंभ असलेले मंगेश वाळंज यांच्यामुळे ठाण्यात संस्थेचा मोठा नावलौकिक आहे. तसेच आपल्याच माणसांच्या कलागुणांना वाव देऊन आदर सत्कार करून प्रोत्साहित करते . संस्थेचे सभासद असणारे महाड तालुक्यातील वारंगी गावात जन्मलेले, तसेच वाळसुरे गावाचे सुपुत्र असलेले, अंकुश जोष्टे यांनी २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून या दिनाचा बिल्ला  महाड तालुका सामाजिक संस्थेच्या  श्री सत्यनारायण महापुजेच्या व हळदी कुंकू कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध केला. त्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले. महाराष्ट्रातील मोठ्या शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी व व्यावसायिक ठिकाणी मराठी भाषेची होणारी पिछेहाट आणि आपल्या रोखण्यासाठी आणि आपल्या भाषेचा अभिमान दर्शविण्यासाठी हा बिल्ला उपयुक्त ठरेल. ह्यावेळी "जय मराठी,मी मराठी" घोषणा देण्यात आल्या. हया प्रसंगी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती व अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्योजक काशिनाथ सकपाळ यांच्या हस्ते  अध्यक्ष मारुती उमराटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

ह्या बद्दल आम्ही वाळसुरे समूह, जि.प. शाळा घुरुपकोंड च्या मुख्याध्यापिका स्मिता नवघरे, परिवार वैश्य वाणी समाज ठाणे चे कार्यधक्ष विमोचन देवळेकर, कोकण युवा सेवा संस्था चे उद्योजक प्रमुख रुपेश कोलते, प्रा. छाया बोरकर गोंदिया, सेवा निवृत PSI संजय गांगण, साहित्य भरारी च्या संस्थापिका समाजसेविका, प्रकाशिका, साहित्यिकां ,लेखिका वैशाली मून (चंद्रपूर) परिवर्तन फाऊंडेशन चे अध्यक्ष अमित तेलुरे, समाजसेविका सुषमा गुप्ता, समाजसेवक विकास जैस्वाल, उद्योजक विजय मुंडे, उद्योजक प्रताप शेटे, नवतरुण मित्र मंडळ चे अध्यक्ष नितीन सूर्यवंशी यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.