रक्षकच झाले भक्षक महिला दिना निमित्त पाटोद्यात गंभीर घटना

 *रक्षकच झाले भक्षक महिला दिना निमित्त पाटोद्यात गंभीर घटना* 



➡️महिला दिनी सत्कार करायचे म्हणून बोलून घेऊन पाटोदा पोलीस स्टेशनच्या बीट अमलदारांनी महिलेवर केला बलात्कार? पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल



पाटोदा (प्रतिनिधी) 

पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर  बलात्कार केल्याची घटना पाटोद्यात घडल्याने खळबळ उडाली असून पाटोदा शहरात ह्या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.पोलिसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा रक्षकच भक्षक झाल्याचे चर्चा सध्या पाटोद्यात सुरू आहे. घडलेल्या घटने संदर्भात पाटोद्यात संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे 

यासंदर्भात पाटोदा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की

गेवराई तालुक्यातील  महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करीत असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर  कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती. यानिमित्ताने मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली यातून त्यांच्यात संभाषण व मँसेज आदी होती यांच संधीचा लाभ घेत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगुन त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले होते ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँक च्या बाजूला  घेऊन जात महिलेवर बलात्कार केला.यावेळी त्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केला.दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येवून स्वतः पोलीस निरीक्षक यांच्या समोर सांगितले आहे. दुपारी १ वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती घटनेची गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत व तपासा संदर्भात सुचना केल्या संध्याकाळी ६-३० सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठविण्यात आले आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा क्र 77/25 भा.द.वी 64/2 -A(1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाटोदा पोलीस निरीक्षक जाधव साहेब करीत आहेत






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.