*नकली शिवभक्त कुणाल कामराचा निषेध करतात मग छत्रपतींचा अपमान करणारे कोरटकर,सोलापूरकर आणि भिडे याच्या वेळेस कोणत्या बिळात होते?- डॉ जितीन वंजारे*
बीड प्रतिनिधी:- काल परवा एक घटना घडली काही नेत्यांचे विडंबन गीत आपल्या कॉमेडी अंदाज मध्ये सादर करून कुणाल कामराने येथील राजकीय व्यवस्था आणि सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती जगासमोर आणली आपला देश टॅक्स च्या माध्यमातून कसा लुटला जातोय, जनतेने मोठ्या हिमातीने एकत्र येऊन मोठे केलेले पक्ष संघटना येथील सत्ताधारी कसे फोडतात आणि इंग्रजाचं तोडो फोडो राज्य करो ही नीती वापरून कसे येथील जनतेला लुटतात हे च त्याने दाखवले. शिवसेना शिवसेनेतून फोडली, राष्ट्रवादी राष्ट्रवादी तुन फोडली माणसात माणूस ठेवला नाही या नितीने काम केल आणि आपला देशात देश ठेवला नाही अक्खा लुटून कसा खाल्ला हेच त्याने एक- दोन गीतांच्या माध्यमातून दाखवून दिल आहे. यावर बरेच बाजारू आणि विकत आणलेल्या लोकांनी प्रतिक्रिया दाखल केल्या पण मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून विचारू पाहत आहे की तो भडवा राहुल सोलापूरकर आणि रस्त्यावरील आंबा खाऊन पैदा झालेला प्रशांत कोरटकर आणि तो भिडे जेंव्हा उघड उघड छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होता तोंडातून गरळ ओकत होता तेंव्हा तुम्ही षंड होऊन कोणत्या बिळात बसला होतात. तेंव्हा महाराष्टाचं नव्हे तर भारताच्या इतिहासातील स्वतःच साम्राज्य अठरापगड जातींचे धर्माचे लोक एकत्र करून सर्वाना समान वागणूक देऊन माता जिजाऊ च्या मार्गदर्शनाखाली अवघ्या सोळा वर्ष्यापासून स्वतःच्या हिमातीचे स्वतःच्या कष्टाचे स्वतःच्या लोकांचे स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना हाच कोरटकर वाईट शब्द बोलतो,इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकीचा कॉल देऊन तुम्ही ब्राह्मनाच्या मुख्यमंत्री शासनात आहात गृहमंत्री ब्राह्मण आहे जास्त बोलाल तर जेल मध्ये टाकुण जिवंत मारू अशी धमकी देणारा प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल इतकं वाईट बोलत आहे की ते आय्याश होते, शिवाजी पळून गेला तो भित्रा होता बाजी होता म्हणून वाचला अहो कोरटकर हे असले वाईट बोलून आमच्या महाराजांचा इतिहास तुम्ही बदलू शकत नाहीत, तो भिडे बोलतो शिवाजी महाराज फक्त एका धर्मासाठी लढले,त्याकाळी लिहिणारे तुम्हीच वाचणारे तुम्हीच तुम्ही वाईटच लिहिलं आहे तुमचा बाबा पुरंदरे हा वादाचा भोंवरा आहे हे पण लक्षात असू द्या. जे महामहीम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना हाच कोरटकर चिल्लर वाटतो जो इतक्या घाण टीका टिपण्णी करतो साहेब त्याने इतिहासकार इंद्रजित सावंत ला जीवे मारण्याची धमकी देऊनही तुम्ही इंद्रजित सावंत यांना पोलीस संरक्षण देण्या ऐवजी प्रशांत कोरटकर याला संरक्षण देता? का तो तुमचा जवळचा आहे म्हणून की काय? संविधान तुमच्या एकट्या साठी आहे काय? हा कायद्याचा गैर वापर नाही काय? कोरटकर आणि भिडे सारख्याना सतत गरळ ओकायला ठेवलं काय? तुम्ही त्यांना संरक्षण का देता? त्याने छत्रपतींचा अपमान करून येथील वातावरण बिघडवले आहे म्हणून की काय? कोरटकर पोलीस संरक्षण असताना देखील कर्नाटकात पळून गेलाच कसा? का फडणवीस तुम्हीच त्याला पोलीस संरक्षण देऊन पळून लावलं? मा. हाय कोर्ट ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढेल कोरटकर याची कॉल डिटेल, लोकेशन आणि धमकीचा कॉल याची तपासणी होईलच. पण आपापल्या जातीचा धर्माचा स्वतःचा कार्यकर्ता वाचवायचा अन आपण संविधानिक पदावर असूनही सत्तेचा गैरवापर करायचा हे योग्य नाही. वरतून तुम्ही कोरटकर चिल्लर माणूस आहे असं बोलता वारे मुख्यमंत्री? हे वागणं बर नव्हे.
तसाच त्या सोलापूरकर बाबतीतही झालं तो राहुल सोलापूरकर म्हणतो हा शिवाजी औरंगजेबला लाच देऊन आग्राहून सुटला? अरे काय ही भाषा? काय हे प्रकरण?काय यांची येथील गृहमंत्री पाठराखण करतात ये लाजिरवाणी आहे. येथील सत्ताधारी लोक केवळ मुख्य मुद्यावरून ध्यान भटकावण्यासाठीच केल जातं आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही ज्या जहरील्या वाणीच्या लोकांना आजपर्यंत संरक्षण देत आहात त्या लोकांमुळे दंगली होऊ पाहत आहे,महाराष्ट्र अशांत होत आहे, महापुरुष लढवय्ये शूर वीर छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचं दैवत आहे ऊर्जास्थान आहे आमची प्रेरणा आहे महामानव, बोधिसत्व, घटनाकर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आमचे उद्धारकर्ते आहेत त्यांच्या विषयी घाण ओकणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही. अशी लोक इतिहास झाकू पाहत आहेत द्वेष भावनेने पाहून काहीही बरळत आहेत याला वेळीच आवर घाला. ही जनता आहे एकदा का पलटली की सत्ता आणि अजून काहीही असो सगळंच पळटून जाईल. संविधानिक पदावर असताना सर्वाना समान समता,न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आणि सार्वभौम मिळालं पाहिजे. प्रशांत कोरटकर,राहुल सोलापूरकर आणि त्या भिडे सारख्या नीच लोकांनी सारख्या दंगली घडवू पाहणाऱ्या लोकांची मस्तके ठेचा त्यांना कायमचे प्रतिबंधित करा. अशी लोक तुमच्या जवळ असणं घातक आहे. हे इतिहासकार इंद्रजित सावंत सारख्या लोकांना दिवसा ढवळ्या जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, त्यांचा पण दाभोळकर, कलबुर्गी करायचा आहे काय? आणि तुम्ही त्याला संरक्षण देता म्हणजे तुम्हीच त्यांना वाचवता आहात काय? त्यांचा बोलावता धनी तुम्हीच आहात काय? असाही संशय निर्माण होत आहे. तरीही आमची नम्र विनंती आहे एक जबाबदार गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या नात्याने लवकरात लवकर असल्या सडक्या औलादीना जे्रबंद करा त्यांना अटक करून योग्य कार्यवाही करा. आणि महाराष्ट्रात महागाई, शेतकरी कर्जमाफी , लाडकी बहीण योजना, नौकरभरती, बेरोजगारी दूर करा. तो कोरटकर चिल्लर माणूस नाही त्याने अक्खा महाराष्ट्र पेटवला आहे.दंगली घडवण्याचा प्लॅन आहे काय? हे बंद करा.
आजकाल नकली शिवभक्त जास्त झाले आहेत. राजकारणाचे गुलाम जास्त झाले आहेत. ते गुलामी करताना आमच्या दौवातावर बोलणाऱ्या लोकांचे समर्थन करताना दिसत आहेत. तो कुणाल कामरा जे बोलला ते खरं की खोटं तपासून पहा नक्की पहा पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वाईट बोलून तो प्रशांत कोरटकर,राहुल सोलापूरकर आणि भिडे जे बदनामकारक बोलला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. समाजात असे कोरटकर पुन्हा जन्मले नाही पाहिजेत. तो तुमच्या जवळचा आहे म्हणून त्याची पाठीराखान करू नका. त्यावर योग्य ती कार्यवाही करा. आणि तुम्ही ती कराल अशी अश्या बाळगतो. आणि मी एक आंबेडकरी चळवळीचा छोटा कार्यकर्ता शिवभक्त डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर आपणाला एक आव्हाहन करतो की महाराष्ट्रावर होणार गुजराती, युपी,बिहारीं च आक्रमण थांबवा मराठी माणूस आणि मराठी भाषा मुंबई सह पुण्यातूनही हद्दपार होत आहे. दुसऱ्या राज्यात गेल्यावर झक मारून हिंदी किंवा तेथील भाषा बोलावि लागते मग इथे येऊन मराठी का बोलत नाहीत. सरकार मराठी भाषा संवर्धन आणि सक्तीची का करत नाही, आता सरकार तुमचं आल्यापासून हिंदी भाषा आणि मराठी भाषा बोलणाऱ्याचे वाद चव्हाट्यावर येत आहेत, मराठी लोकांना भाड्याने घर मिळत नाही इथे आमची माती आमचा माणूस जगला पाहिजे. आपापली राज्य आपापली संस्कृती,भाषा अन परंपरा जपून ठेवत आहेत पण इथे मात्र त्याचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मराठीभाषा अन मराठी माणूस वाचवा त्यासाठी योग्य पाऊल उचला इतकंच. बाकी त्या कुणाल कामरा चा स्टुडिओ फोडणाऱ्या शिव भक्तांनी कोरटकर आणि सोलापूरकर यांचं ऑफिस का नाही फोडलं?पक्षापेक्षा माझे छत्रपती शिवाजी राजे लहान आहेत का?तो आपल्या राज्याबद्दल इतकं घाण बोलला तरी तुमचं रक्त का उसळलं नाही? राजकारणात फक्त सत्तेसाठी फोटो वापता काय? तुमच्यातला मराठा का जागा झाला नाही? तेंव्हा आपण कोणत्या बिळात होतात? हा विचार करण्याचा मुद्दा आहे. राजकारण करा पण महापुरुष यांच्या नावे नको इतकंच. जय भीम जय शिवराय जय शंभो.....
stay connected