शैक्षणिक: रेनबो स्कूलचे ऑलिम्पियाड मध्ये चोवीस सुवर्णपदक,सिल्व्हर,ब्रांज पदकाने विद्यार्थी सन्मानित
●रेनबो स्कूलचा यशस्वी उपक्रम
*धामणगाव*: देशपातळीवर मॅथ ऑलिम्पियाड परीक्षे मध्ये रेनबो स्कूल धामणगावला 24 सुवर्ण पदक, चार सिल्वर पदके, 1 ब्राँझ पदकावर आपले नाव कोरले अशी माहिती स्कूलच्या प्रिंसिपल श्रीमती मैथिली कमलेश मिरगणे यांनी दिली.
इंडियन टैलेंट ऑलिम्पियाड नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन मॅथ ऑलिम्पियाड चा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये रेनबो इंग्लिश स्कूल च्या विधार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले.
यशस्वी विधार्थ्याना श्रीमती मैथिली मिरगणे, श्रीमती वैष्णवी राऊत , कु शुभांगी चौधरी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सदरील परीक्षा 14 ते १6 जानेवारी2025 दरम्यान संपूर्ण भारतभर घेण्यात झाली होती.
प्रशालेच्या प्रिंसिपल श्रीमती मैथिली मिरगणे यांनी विद्यार्थ्याना हसत खेळत शिक्षण पद्धतींचा अवलंब करून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली गेली असे प्रतिपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे युवा नेते सागर आप्पा धस, धामणगावचे सरपंच मनोजशेठ गाढवे, आष्टी दूध संघाचे चेअरमन संजय नाना गाढवे, युवा नेते विजयअण्णा गाढवे, प स सदस्य रावसाहेब लोखंडे ,मा सरपंच अमोल चौधरी, उपसरपंच सतीश झिंजुर्के. मा उपसरपंच डॉ अकिल सय्यद, शार्दूल भणगे, बाळासाहेब निकम, शाबुद्दीन सय्यद सर , प्रा भागचंद झांजे, पांडुरंग झिंजुर्क,सुरेश मिरगणे संस्थेचे सचिव कमलेश मिरगणे, तसेच ग्रामस्थ ,पंचकृषीतील पालक यांचेसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
*गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी*
मल्हार झिंजुर्के ,शिवांश राऊत, अवनी लाटे,सारंग लाटे,अमीन सय्यद,श्रावणी अघाव,अन्वी घुमरे,सानिका राऊत,हिंदवी मिरगणे,रणविजय गाढवे,शिवम लोखंडे,शिवांश झिंजुर्के,अथर्व महाडीक,उर्वी झिंजुर्के,आर्वी झिंजुर्के, संविधान ससाणे,गौरी सोनवणे,आयत सय्यद,सबा शेख,आर्यन गीते,अर्णव गीते,ज्ञानेश्वरी घुमरे,शिवकन्या लबडे,प्रियांशी घुमरे
*सिल्वर मेडलिस्ट विद्यार्थी*
पार्थ झिंजुर्के, महावीर खोजा,अवधूत लोखंडे,रिया मुरकुटे
*ब्राँझ मेडलिस्ट विद्यार्थी*
आराध्या महाडीक
___________________________
इंडियन मॅथ ऑलिम्पियाड मध्ये रेनबो इंग्लिश स्कूल धामणगाव चे यशस्वी विद्यार्थी समवेत प्राचार्य श्रीमती मैथिली मिरगणे, श्रीमती वैष्णवी राऊत, कु शुभांगी चौधरी आदी
___________________________
stay connected