श्री.अशोक खरसाडे यांच्या इफ्तार पार्टी ला मोठ्या संख्येने सर्व जाती धर्मातील समाज एकवटला
_____________________________
बीड ( प्रतिनिधी) वर्ष (5) प्रति वर्षाप्रमाणे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून बीड शहरालगत असणाऱ्या मौ.आहेर वडगावातील मज्जित मध्ये सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे श्री.अशोक खरसाडे यांच्या वतीने सर्व जाती धर्मातील लोकांना आवर्जून बोलावून सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय एकात्मता, भाईचारा कायम अबाधित राहावा या उद्देशाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते
याही वर्षी प्रतिसाला प्रमाने दि.27/03/2025 वार गुरुवार रोजी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमानंतर
खरसाडे यांनी एकीचा,आपुलकीचा, एकमेकांविषयी प्रेमाचा,जिव्हाळ्याचा मुस्लिम बांधवांसाठी संदेश देत पवित्र रमजान महिन्याचे महत्व व नेकी काम करणाऱ्याला अल्ला कडून कसा दुंवा मिळतो यावर भाष्य केले आणि वातावरण आनंदीमय झाले.
पो.नि.बंटीवाड यांनी देखील जात धर्म पंथ याच्या पलीकडे कर्मश्रेष्ठ आहे असेच एकोप्याने राहा आणि आनंदित रहा असे म्हणत सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी
आप जिल्हाध्यक्ष अशोक येडे , प.स. गुंडीबा नवले,पो. ह आनंद मस्के, मोराळे, मुंडे, योगेश निर्धार, वायभट गावातील पो.पा.सखाराम काटे , मौलाना जहिर हापिज, शेख अनिस,शेख अरमान शेख असिफ, पठाण राजू,शेख मोहिदिन शेख रमजान, शेख युनूस, शेख हबीब तसेच गावातील , शिंदे, घाडगे, रोहीटे, कदम, काटे तावरे आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या साक्षीने मोठ्यात कार्यक्रम संपन्न झाला..
stay connected