मसोबावाडी येथे विजेचा करंट लागून युवकाचा मृत्यू
आष्टी तालुक्यातील मसोबा वाडी येथील एका १९ वर्षीय युवकाचा विजेचा करंट लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि . 27 रोजी सकाळी 7 वाजता घडली .
मसोबावाडी गावातील दुकानदार मच्छिंद्र आण्णा शेकडे यांचा तरुण मुलगा ओमकार मच्छिंद्र शेकडे वय 19 वर्षे त्याचा आज सकाळी विजेचा शॉक लागुन अपघाती मृत्यु झाला . त्याचा अंत्यविधी आज दुपारी 1 वाजता मसोबावाडी येथे करण्यात आला . या दुर्दैवी घटनेमुळे मसोबावाडी व परिसरात शोककळा पसरली . नुकतेच त्याचे लग्न जमले होते व आज लग्नाची तारीख ठरवण्याचे नियोजित होते . तत्पूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे .
stay connected