*डिजिटल मिडिया परिषदेचे राज्यस्तरीय पदाधिकारी निवडणार - प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे*
*- मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक*
पुणे/प्रतिनिधी
डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात लवकरच एक व्यापक बैठक घेतली जाणार असुन या बैठकीसाठी राज्यभरातील डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य पदाधिकारी जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक,पत्रकार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेचे जाळे निर्माण करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे. राज्यातील जवळपास २० जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्या गेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांत सुध्दा या जिल्हा पदाधिकारी निवडी संदर्भात यंत्रणा उभी केली गेली आहे. येत्या काही दिवसांत एक व्यापक बैठक घेतली जाणार असुन या बैठकीची तारीख, वेळ आणि ठिकाण लवकरच कळवले जाईल. मराठी पत्रकार परिषदेची डिजिटल मिडिया परिषद ही विंग मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.
देशमुख सर यांनी तयार केली असून आपण त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर काम करत असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सांगितले. या डिजिटल मिडिया परिषदेची राज्यस्तरीय पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही दिवसांत एक राज्यस्तरीय बैठक बोलावली जाणार आहे. आपणही यात सहभागी होण्यासाठी तसेच राज्य पदासाठी व जिल्हा पदासाठी इच्छुक असल्यास 9822548696 या वाटस अप नंबर वर आपला जिल्हा, आपली थोडक्यात माहिती व आपल्या माध्यमाची अर्थात यु ट्यूब किंवा पोर्टल ची लिंक पाठवावी. येत्या काही दिवसांत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही महत्वपूर्ण बैठक घेऊन डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या व जिल्हा पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत. तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक आणि पत्रकार बांधवांनी या बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.
stay connected