डाॅ. सोमनाथ टेकाडे एक निर्मळ मनाचे व्यक्तिमत्व- डाॅ. मधुकर हंबर्डे

 डाॅ. सोमनाथ टेकाडे एक निर्मळ मनाचे व्यक्तिमत्व- डाॅ. मधुकर हंबर्डे 

-----------------

अमृत महोत्सव :डाॅ सोमनाथ टेकाडेंवर शुभेच्छांचा वर्षाव





---------------------

राजेंद्र जैन/ कडा 

-------------

कुठलंही क्षेत्र असो, माणसाचं मोठेपण हे त्याच्या कर्तृत्वाला अथक परिश्रमाची जोड असेल तरच सिध्द होत असतं. असेच निर्मळ मनाचे कर्तव्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डाॅ सोमनाथ टेकाडे आहेत. जवळपास चार दशकेहून अधिक वैद्यकीय क्षेत्रात काम करताना डाॅक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य देऊन समाजासमोर आपल्या कर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटविला असल्याचे मत डाॅ. मधूकर हंबर्डे यांनी व्यक्त केले.


कडा येथील सेवानिवृत वैद्यकीय डाॅ सोमनाथ विश्वनाथ टेकाडे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी डाॅ. सोमनाथ टेकाडे यांना उपस्थित मान्यवरांसह नातलगांकडून पुष्पगुच्छ प्रदान करुन दीर्घायुष्य लाभावे, म्हणून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तर सुवासिनींकडून डाॅक्टरांचं औक्षण करून मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांची साखरतुला करण्यात आली.



पुढे बोलताना डाॅ. हंबर्डे म्हणाले की, डाॅ. सोमनाथ टेकाडे म्हणजे एक शिस्तप्रिय अन् कर्तव्याला प्राधान्य देणारा वैद्यकीय अधिकारी म्हणूनच त्यांची ओळख होती. या क्षेत्रात चार दशकाहून अधिक त्यांनी आरोग्य विभागात रुग्णसेवा करुन उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविला. स्वत:ला झोकून देऊन रुग्णसेवा करीत असताना, स्वत:च्या प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष केले असल्याची खंत हंबर्डे यांनी व्यक्त केली. डाॅक्टरांनी इतरांच्या आरोग्याची काळजी घेताना स्वत:कडे पण थोडं लक्ष देण्याची गरज आहे. डाॅ टेकाडे यांचे अख्खं कुटूंबिय वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. वडीलांचा प्रामाणिक पणाचा आदर्श आणि परोपकाराची भावना डोळ्यासमोर ठेवूनच रुग्णसेवेचा वारसा पुढे नेत आहेत. हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार डाॅ. हंबर्डे यांनी काढले.



या अमृत महोत्सव कार्यक्रमास डाॅ कल्याणराव वारे, प्राचार्य डाॅ हरिदास विधाते, डाॅ पंडीत खिलारे, डाॅ उमेश गांधी, विठ्ठल बनसोडे, डाॅ गणेश झगडे, डाॅ मानव चौधरी, डाॅ विशाल हरकर, डाॅ अण्णा गाडे, बिपीन भंडारी, संजय टेकाडे, दिलीप काळे, शिवाजी मुळे, घन:शाम गिलचे, प्रा. खेतमाळस, प्रा राम बोडखे, रमेश मुळे, प्रा. विधाते, राजू भोजने, पत्रकार उत्तम बोडखे, दिंगबर बोडखे, राजेश राऊत, राजेंद्र जैन इतर प्रतिष्ठीत ग्रामस्थांसह सौ अंजली टेकाडे, डाॅ मंजुश्री टेकाडे, डाॅ अर्चना टेकाडे, डाॅ प्रिया टेकाडे यासह डाॅ टेकाडे हाॅस्पीटलचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ सचिन टेकाडे, सुत्रसंचालन दिनेश पोकळे यांनी केले तर आभार डाॅ संदीप टेकाडे यांनी मानले. अमृत महोत्सवानिमित्त उपस्थितांकडून डाॅ टेकाडेंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

--------%%--------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.