गौरव: रेनबो इंग्लिश स्कूल धामणगाव मधे कौतुकास्पद उपक्रम
"महिलांची सामर्थ्य, जिद्द आणि समाजातील योगदान यांना सलाम "
- सरपंच संजनाताई गाढवे
धामणगाव : धामणगाव येथील ज्ञानरचना सी फाउंडेशन संचालित रेनबो इंग्लिश स्कूल येथे महिला दिनाचे औचित साधून परिसरातील महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमात परिसरातील प्रामुख्याने विविध शेत्रातील महिला त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात महिलांना सन्मानित करण्यात आले हाच खऱ्या अर्थाने *सन्मान नारी शक्तीचा* ठरला.
या माता भगिनीं आज विविध क्षेत्रा मधे पुरुषाला खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
या कार्यक्रमासाठी परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.यावेळी सर्व मैत्रिणीनी या कार्यक्रमाचे कौतुक करत, समाधानकारक बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ संजनाताई गाढवे तर प्रमुख पाहुणे म्हणून परिसरातील सर्व माता भगिनीं उपस्थित होत्या यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती वैष्णवी राऊत यांनी तर आभार कुमारी शुभांगी अशोक चौधरी यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजनकर्त्या संस्थेच्या प्राचार्य श्रीमती मैथिली कमलेश मिरगणे यांनी उपस्थिताचे स्वागत केले.
कार्यक्रमासाठी सौ सीमा चौधरी , मोनिका गांधी. , पोकळे ताई, सुनंदा साळुंखे , अनिता चौधरी कोमल गाढवे,मैथिली मिरगणे उपस्थित होत्या.
_______________________
समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान महिला दिनाचे औचित्य साधून केले जाईल .
या पुढील कालखंडात प्रतिवर्षी अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात फाऊंडेशन प्राधान्य देईल.
सौ मैथिली कमलेश मिरगणे
अध्यक्षा
_______________________
stay connected