हंबर्डे शैक्षणिक संकुलात हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

 *हंबर्डे शैक्षणिक संकुलात हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न*




आष्टी: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय, ॲड. बी. डी. हंबर्डे विधी महाविद्यालय, पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल, गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल व ग्रामीण रुग्णालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. महिला कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थीनी व माता पालकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



शनिवार, दिनांक 8 मार्च 2025 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हंबर्डे शैक्षणिक संकुलात हिमोग्लोबिन तपासणी शिबिर तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिट आष्टी यांची टीम सकाळी महाविद्यालय प्रांगणात हजर झाली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मान्यवर महिला अतिथींनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. रिजवाना शेख यांनी महिला आरोग्य, आहार, व्यायाम आणि दिनचर्या यांचा परस्पर संबंध विशद करून हिमोग्लोबिन व एकूण आरोग्य चांगले रहावे यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या. सौ. मनिषा चवरे, सौ. रागिणी पिसाळ, सौ. अनिता निंबोरे, सौ. मनिषा गोल्हार, सौ. सोनल उपाध्ये, सौ. सुमित्रा काळे, सौ. मंगल भोसले, सौ. गीतांजली काळे यांनी आपले विचार मांडले. पिंपळेश्वर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य श्रीमती भाग्यश्री पवार यांनी सर्व महिलांना स्वतःसाठी वेळ काढण्याचा आणि वेळच्या वेळी आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोप करताना सौ. सुलभा हंबर्डे यांनी पुरुष वर्गाकडून अपेक्षा असतेच पण महिलांनी महिलांशी चांगलं वागण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. विविध उपक्रम राबविण्यात सौ. प्रतीक्षा वैद्य आणि सुवर्णा सोले यांनी विशेष मेहनत घेतली. सौ. तृप्ती कुलकर्णी यांनी संचलन केले तर सौ. राणी आंधळे यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले. ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील श्री. वैभव साठे, सौ. रूपाली पवार, अल्फिया पठाण, रोहिणी चंदनशिव, ऐश्वर्या सवालाख, मिजान शेख, लक्ष्मी काकडे या टीमने एकत्रितपणे काम केले. एकूण 58 महिलांनी या आरोग्य तपासणी शिबिरात सहभाग नोंदवला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.