*छत्रपतींचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच ओळखा.... सुरेश पाटील*
बीड (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर मधील औरंगजेब याच्या कबरी वरून वाद निर्माण झालाने छत्रपतींचा इतिहास मिटवण्याच्या कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना वेळीच ओळखा असे आवाहन शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा समाजसेवक सुरेश पाटील यांनी केले आहे.
छत्रपतींचा इतिहास महाराष्ट्र सह देशातील ऐतिहासिक वास्तू मुळे प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वास्तूमुळे पिढ्यान पिढ्या राजेंचा इतिहास अनेक पिढ्यांना शिकण्यासाठी उपलब्ध आहे. अशा ऐतिहासिक वास्तू जपण्याचं काम सरकारने करावे. देशासह महाराष्ट्रात असलेल्या ऐतिहासिक वास्तू नष्ट करून आमच्या राजांचा इतिहास संपवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सर्व मावळे जशास तसे उत्तर देतील. असे मत शिव संघर्ष ग्रुपचे शिव मावळे तथा समजासेवक सुरेश पाटील यांनी माध्यमाशी बोलताना केले आहे. हजारो वर्षापासून उभे असलेल्या ऐतिहासिक वास्तू कोणी नष्ट करत छत्रपतींचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न करू नये. असेही सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
कबरी, प्रेक्षणीय स्थळ, ऐतिहासिक स्थळ यांना आत्ता काढण्याचे भाषा काही लोक बोलून सामाजिक तेढ निर्माण करत असतील आणि धर्माची ठेकेदारी फक्त आम्हीच घेतले आहे. अशा अविर्भावात राहत असतील तर ते कदापी शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे शिवमावळे सहन करणार नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा, लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी योजना, इव्हीएम हटाव मुद्दा, येथील वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, वीजबिल माफी,शेतकरी कर्जमाफी असे महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवून धर्माच्या अन जातिच्या नावावर इथे दंगली घडवल्या जात. असतील. तर तेही खपवून घेतले जाणार नाही. असेही सुरेश पाटील यांनी सांगितले.
stay connected