आम सभा ही सर्वसामान्य जनतेच्या न्यायाचे दालन आहे.. सरपंचांनी, कार्यकर्त्यांनी जनतेची कामे करावीत.. आ.सुरेश धस यांचे प्रतिपादन

 आम सभा ही सर्वसामान्य जनतेच्या न्यायाचे दालन आहे.. 
सरपंचांनी, कार्यकर्त्यांनी जनतेची कामे करावीत.. आ.सुरेश धस यांचे प्रतिपादन 






आष्टी (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षात आष्टी पंचायत समितीची आमसभा झालेली नाही त्यामुळे अनेक गावांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न प्रलंबित आहेत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळालेला नाही आष्टी तालुक्यातील प्रलंबित असलेले सर्व घटकांतील घरकुलांची कामे गावातील शाळा खोल्यांची बांधकामे अंगणवाडी खोल्या बांधकाम जलजीवनच्या अपूर्ण योजना पूर्ण कराव्यात आणि ग्रामसेवक तलाठी महावितरण कर्मचारी यांनी जनतेला आर्थिक वेठीला धरू नये असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले आष्टी येथील पंचायत समितीच्या आमसभेमध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव दरेकर माजी सभापती बद्रीनाथ जगताप सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी उपविभागीय अधिकारी श्रीमती व सीमा शेख तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील गट विकास अधिकारी श्री गोकुळ बागलाने बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती बेल्हेकर तालुका कृषी अधिकारी गोरक्ष तरटे माजी उपसभापती रंगनाथ धोंडे एनटी गर्जे परमेश्वर शेळके नगराध्यक्ष जिया बेग, शिराळ येथील प्रगतीशील शेतकरी गौतम नाना आजबे, कल्याण काका काकडे, शिराळचे माजी सरपंच बंडू आबा आजबे, आदी उपस्थित होते 

पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की घरकुल योजनेतल्या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना तत्काळ घरे मंजूर करून त्यांना निवारा निर्माण करून द्यावा त्यामध्ये प्रामुख्याने भटके विमुक्त आदिवासी पारधी मायक्रोमायनॉरिटी यांचा प्राधान्याने विचार करावा

सरपंचांनी कार्यकर्त्यांनी गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या बांधकामाकडे लक्ष द्यावे अंगणवाडी बांधकामाकडे लक्ष द्यावे भटक्या विमुक्तांच्या स्मशानभूमी बांधकामे करण्यात यावीत कारण अनेक ठिकाणी ही कामे अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत जलसिंचन विहिरींमध्ये गट विकास अधिकारी यांनी नियमात बसत असलेल्या 32 95 जलसिंचन विहिरींची कामे तात्काळ सुरू करावीत गेल्या दहा वर्षांत आष्टी मतदार संघात कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा योजनेचा प्रस्ताव बनविण्यापासून  शिक्का मारेपर्यंत एजंट ची साखळी तयार झाली ही बंद करून,आता कोणत्याही शासकीय कार्यालयात वैयक्तीक लाभासाठी कुणाकडून पैसे घेतले तर कोणत्याच अधिका-यांची गया केली जाणार नाही जर कुणी अधिकारी पैसे मागतांना आढळून आला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला जलजीवन मिशन अंतर्गत अनेक योजना मंजूर झाल्या असून या सर्व योजनांच्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्याच्यासाठी सुधारित अंदाजपत्रके करण्यात यावीत आपण ती लवकरात लवकर मंजूर करून घेऊ असे सांगत अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्त्या यांच्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात त्यासाठी कोणाच्याही शिफारशीची आवश्यकता नाही नियमाप्रमाणे नेमणूक कराव्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत तहसील कार्यालयामार्फत करण्यात आलेली अनेक रस्ता कामे ही एकाच अंतरात दोन दोन कामे करून भ्रष्टाचार करण्यात आल्याचे तक्रारी आहेत त्यामुळे तहसीलदार यांनी या सर्व तक्रारीची चौकशी झाल्याशिवाय कुशल मजुरीचे पैसे अदा करू नयेत असे सांगून यासाठी कोणताही भेदभाव करू नका कोणी जरी असेल तरी सर्वांसाठी एकच भूमिका ठेवा असे सांगितले स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी असतील तर त्यांचे परवाने रद्द करा सुरत चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग 38 किलोमीटर आष्टी तालुक्यातून जात आहे या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी बागायत असून देखील त्यांची जिराईत म्हणून नोंद झालेली आहे त्या सर्व बागायती म्हणून करण्यात याव्यात याबाबतही कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आष्टी तालुक्यातील शेती विद्युत पंपासाठी ट्रान्सफॉर्मर्स पुरेसे उपलब्ध करून देण्यात आले असून आणखीही आवश्यकता भासल्यास ट्रान्सफॉर्मर देण्यात येतील परंतु आता शेती पंपासाठी वीज मोफत असल्यामुळे ग्रामीण भागातील घरगुती वीज जोडण्याची संख्या वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे अनधिकृत आकड्यांमुळे अनेक ठिकाणी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत हे दुर्दैवी आहे त्यामुळे वीज कनेक्शन अधिकृतपणे करून घ्यावीत असे आवाहन करून आमदार सुरेश धस पुढे म्हणाले की पुढील काळामध्ये दिवसा बारा तास पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होईल यासाठी आपण प्रयत्न करणार असून लवकरच टाकळी आम्ही या येथे 220 के.व्ही. वीज उपकेंद्र मंजूर झाले असून लवकरच विजेचा प्रश्न सुटणार आहे कांदा चाळ ही सामूहिक पद्धतीने करावी असे शासनाचे निर्देश आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये यामध्ये अडचणी येत असल्यामुळे लवकरच आपण वैयक्तिक लाभाच्या कांदा चाळी मंजुरीसाठी मंत्री महोदयांची भेट घेणार आहोत मनरेगातूनच बांबू लागवड ही कामे करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे वाळू उपशावर बंधन असले तरी शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून द्यावी लागणार आहे त्यामुळे तहसीलदार यांनी या कामी लक्ष घालावे असेही शेवटी आमदार सुरेश धस यांनी सांगितले यावेळी शेरी बुद्रुक येथील सरपंच संदीप खकाळ यांनी मस्साजोग चे सरपंच संतोष यांच्या निर्गुण हत्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आवाज उठवला त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला तो सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला

    गेल्या सात वर्षांनंतर पहिल्यांदाच आष्टी पंचायत समितीच्या प्रांगणात शनिवार (दि.१५) रोजी आयोजित करण्यात आली होती.यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर,उपविभागीय अधिकारी वसिमा शेख, तहसिलदार वैशाली पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमजान तांबोळी,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, माजी पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप,आष्टी नगर पंचायत नगराध्यक्ष जिया बेग,एन.टी.गर्जे,परमेश्वर शेळके, यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले,प्रत्येक गावचे तलाठी,ग्रामसेवक यांनी सजावर उपलब्ध राहावे,तलावातील पाणी पुढील दुष्काळाची दाहकता ओळखुन राखीव ठेवावे,

तसेच साबलखेड,आष्टी रस्त्यांचे काम लवकर पुर्ण करावे,पंचायत समितीमध्ये दलालांची संख्या जास्त झाली असल्याची खंत माजी आ.दरेकर यांनी व्यक्त केली.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने यांनी केले.सुरूवातीला पिंपरी घुमरीचे सरपंच यांनी ग्रामिण भागातील घरकुल साठी वाढीव अनुदान किती मिळणार व कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल टाकूनही आम्हाला दोन दोन वर्ष पट्टी मिळत नाही यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी यांनी आपण बाजार समितीची बदनामी न करता रितसर तक्रार द्या यावर आम्ही दोन दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगर पंचायत अंतर्गत शेतक-यांना वैयक्तीक लाभ विहीर,शेत तलाव या योजनेचा लाभ मिळत आहे.तरी याबाबत शासन दरबारी पाठपुरवठा करावा आणि शहरासाठी रूटी प्रकल्पातुन सोडलेले पाणि बंद करून आष्टी,मुर्शदपुर शहरासाठी हे पाणि राखीव ठेवा अशी मागणीही त्यांनी केली.या आमसभेत दादासाहेब पाडुंळे,परिवंत गायकवाड,यशवंत खंडागळे,अनिल ढोबळे,बापुराव ससाणे,युवराज शिंदे,शरद खांडवे, जाधव,रामा काशिद,बाळासाहेब बांगर, परमेश्वर घोडके,हनुमंत जेवे,बाळासाहेब खिळे,दत्तोबा वाडेकर, आत्माराम फुंदे,विजय डुकरे,अंगद शिंदे, शिवाजी गर्जे,धनजंय तरटे,सागर आमले यांच्यासह शेकडो नागरिकांनी आपले गा-हाणे या आमसभेत मांडले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.