आष्टीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते महेबुब शेख यांच्याकडून मुस्लिम बांधवांना इप्तार पार्टी

 आष्टीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते महेबुब शेख यांच्याकडून मुस्लिम बांधवांना इप्तार पार्टी



आष्टी। प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या वतीने आष्टी तालुक्यातील मुस्लिम बांधवांसाठी शुक्रवार दि.२१ मार्च रोजी शहरातील ईदगाह मैदान येथे सायंकाळी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

सध्या मुस्लिम धर्मातील पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. या महिन्यांच्या अखेरच्या टप्प्यात मुस्लिम बांधवांसाठी विविध राजकीय पक्षाकडून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. अशातच आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या वतीने देखील आष्टी तालुक्यातील व आष्टी,मुर्शदपुर शहर परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्ष असून महेबुब शेख यांच्याकडून मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील रोजा इफ्तार पार्टीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सतिश शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, आण्णासाहेब चौधरी,राम खाडे डॉ. शिवाजी राऊत, सुनिल नाथ,संजय थोरवे, डॉ नदीम शेख, ॲड रिजवान शेख, जिशान सय्यद,दादासाहेब झांजे,जगन्नाथ ढोबळे, डॉ विलास सोनवणे, डॉ राज शेख, विजय गाढवे, शफ्फी सय्यद,शेरूभाई शेख,माऊली मुटकुळे,सादीक कुरेशी,गणीभाई तांबोळी, अतुल शिंदे, शब्बीर शेख,मोसिम पठाण, सचिन गोंदकर, अशोक पोकळे, शिवाजी सुरवसे, ॲड बी सी शेख,लईकशेठ काझी, मोहसिन कुरेशी,लहू भवर,शाहुल काकडे,तोफीक शेख,रजी बेग, वसिम बारी,अन्वर अत्तार, मोहम्मद कुरेशी ,निसार कुरेशी,गुलाम हाबीज साहेब,असद सय्यद,कलील शेख,जाकीर अत्तार, ॲड वहिम शेख, हमीद बेग,तसेच कार्यकर्ते, डॉक्टर,वकील, पत्रकार, सर्व क्षेत्रातील मान्यवर व हिंदू,मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.