चुकीच्या आशयाचा मजकुर फेसबुक पेजवर टाकुन मानहानी केल्याप्रकरणी आष्टी पोलिसात तक्रार दाखल जामगाव चे सरपंच राधेशाम धस यांनी केली तक्रार

 चुकीच्या आशयाचा मजकुर फेसबुक पेजवर टाकुन मानहानी केल्याप्रकरणी आष्टी पोलिसात तक्रार दाखल 
जामगाव चे सरपंच राधेशाम धस यांनी केली तक्रार 




आष्टी प्रतिनिधी : तालुक्यातील जामगाव येथील एका व्यक्तीचा खुन झाल्याची घटना दि. 12 मार्च रोजी घडली होती. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असतानाच या घटनेशी जामगाव चे सरपंच राधेश्याम धस यांचा कसलाही संबंध नसताना काही फेसबुक पेजवर त्यांच्या बाबत मानहानीकारक मजकूर टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने सरपंच धस यांनी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.




याबाबत पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात सरपंच राधेशाम धस  म्हटले आहे की, दि. १३/०३/२०२५ रोजी दुपारी ०१:४० वाजता मला भाऊसाहेब मुरलीधर माने रा. मुर्शदपुर ता. आष्टी, जि. बीड यांचा मो.क. ७०८३२९१०१० या क्रमांकावरून माझा मोवाईल क्र. ७७०९९९१४१४ यावर फोन आला याने मला सांगितले की,स्टोरी डॉट कॉम व 'राजकारण महाराष्ट्राचे' या दोन नावाच्या फेसबुक पेज वरुन "बीड ब्रेकींग सुरेश धसांच्या जामगावातील बेपत्ता धनंजय रणसिह यांचा मृतदेह सापडला, ३० हजारांच्या वादातून काटा काढल्याची माहिती, धसांचे पुतणे जामगावचे सरपंच, आणि आरोपी अज्ञात" अश्या आशयाचा मजकूर पोस्ट करण्यात आला आहे.याची मी शहानिशा केल्यानंतर सदरील पोस्ट मुळे माझी समाजामध्ये खुप बदनामी झालेली आहे.तसेच माझे हॉटेल व्यवसाय असून या फेसबुक पेजवरील पोस्टमुळे माझ्याविषयी नाहक लोकांचे मनात भिती निर्माण झाल्याने माझे हॉटेलचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे.गुरुवारी दिवसभर मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे.सदरची पोस्ट जाणीवपुर्वक मला मानसिक त्रास व्हावा व माझी लोकप्रीयता कमी व्हावी तसेच माझे आर्थिक नुकसान व्हावे यासाठी टाकलेली आहे. करीता "स्टोरी डॉट कॉम" व 'राजकारण महाराष्ट्राचे' हे पेज जी व्यक्ती चालवते त्या व्यक्तीचा शोध घेवुन संबंधीत व्यक्तीविरुध्द व त्या पेज वर माझ्या विरुध्द माझी बदनामी होईल,मला मानसिक त्रास होईल,या उद्देशाने टाकलेली पोस्ट यांचेवर कायदेशीर कारवाई व्हावी.तसेच या पोस्ट वर अनेक लोकांनी बदनामी कारक व धमकी सारख्या कमेंट केलेल्या आहेत.या  बदनामी कारक कमेंट टाकणाऱ्या व्यक्तींविरोधात देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणे आवश्यक असल्याने माझे संबंधीत व्यक्ती विरोधात कायदेशीर पणे तक्रार असल्याचे पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.त्याचबरोबर सरपंच राधेश्याम धस यांनी तक्रार अर्जासोबत संबंधित फेसबुक पेजचे स्क्रीन शॉट व विरोधात कमेंट करणाऱ्यांची नावे देखील सादर केली आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.