CHH.SAMBHAJINAGAR | मुकुंदवाडी परिसरात धारदार शस्त्र घेऊन व्हिडिओ व्हायरल करणारे तरुण अखेर जेरबंद

 CHH.SAMBHAJINAGAR | मुकुंदवाडी परिसरात धारदार शस्त्र घेऊन व्हिडिओ व्हायरल करणारे तरुण अखेर जेरबंद 










- छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात हातात धारदार शस्त्रे घेऊन तसेच बंदूक घेऊन व्हिडिओ व्हायरल करत खंडणी वसूल करणारे तीन आरोपी आज छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे येथे जाऊन अटक केली आहेत. विकी सोनकांबळे उर्फ हेल्मेट, मुकेश साळवे उर्फ मुक्या आणि बालाजी पिवळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील विकी हेल्मेट आणि बालाजी पिवळ या दोन्ही आरोपींवर प्रत्येकी 46 गुन्हे दाखल आहेत. तर मुकेश साळवे याच्यावर 16 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



         मुकुंदवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेश व त्यांचा मुलगा व भाचा असे तिघे मिळून मुकुंदवाडी, परिसरातील इच्छामनी हॉटेल जवळील त्यांच्या भंगाराच्या दुकानाच्या जागेत पत्ते खेळत टाईमपास करत असताना त्याठिकाणी विक्की हेल्मेट, मुकेश साळवे, किशोर शिंदे व उमेश गवळी यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह येऊन भंगाराचे दुकान चालविण्यासाठी 2000/-रूपायाची खंडणी मागितली. त्यावर फिर्यादीने नकार दिल्याने सर्वांनी मिळून फिर्यादीला व त्याच्या नातेवाईकांना मारहाण करून लाकडी दांडके, कोयत्याचा धाक दाखवून 10,000/- रूपये रोख रक्कम जबरदस्ती घेऊन तिथून पसार झाले होते. तर गणेश यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा केल्यानंतर इन्स्टांग्राम सोशल मिडियावर शस्त्रासह त्यांचे स्वतः चे व्हिडिओ टाकून ते प्रसारीत करून सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्यांच्याविरूद्ध माहिती देण्यासाठी नागरिक पुढे येत नसत. त्यामुळे गुन्हा केल्यानंतर देखील हे आरोपी फरार राहायचे मात्र या आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याचे कळताच त्यांनी शहरातून पळ काढला. मात्र, पोलिसांच्या धाकाने छत्रपती संभाजीनगर शहर सोडून वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते. या आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, गुन्ह्यातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विक्की हेल्मेट हा त्यांच्या साथीदारांसह मुंबईला गेला आहे. ह्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक मुंबई येथे रवाना झाले. तेथे जावून आरोपींचा मुंबई येथे मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, अंधेरी, धारावी, दादर, सानपाडा, मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरामध्ये सलग शोध घेत असताना माहिती मिळाली की, हे सर्व आरोपी हे ठाणे रेल्वेस्टेशन येथे येणार आहेत. त्यावरून पथकासह ठाणे रेल्वेस्टेशन येथे 10 तास सापळा लावला लावून सर्व आरोपीना बेड्या ठोकून त्यांना मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.