मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने महाड चवदार तळे येथे समता दिन व रोजा इफ्तारपार्टी.
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याचे पाणी सर्व धर्मीयांसाठी खुले व्हावे यासाठी 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता. या घटनेला 20 मार्च रोजी 98 वर्ष पूर्ण झाले. 20 मार्चला दरवर्षी महाड येथील चवदार तळे या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठा जनसामुदाय येत असतो. याच दिनाचे औचित्य साधून पुणे येथील मूलनिवासी मुस्लिम मंच संघटना व महाड येथील मुस्लिम समाज बांधवांचे वतीने रोजा इफ्तारपार्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित करण्यात आला होता.
रोजा इफ्तार कार्यक्रमच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले की प्रेषित मोहम्मद पैगंबर, सूफी संत व महापुरुषांची विचारधारा समाजामध्ये रुजविणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्रात बघत आहोत की समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा काम सर्रासपणे सुरू आहे. छोटासा कारण करून महाराष्ट्रात दंगली होत आहे. खोटा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पुढे करून तरुणांच्या माथी भडकवल्या जातात. जातीय तेढ व भावना दुखवणाऱ्या भाषणे करणाऱ्या नेत्यांवर कारवाई होत नाही.
एकमेकांना जोडण्याऐवजी तोडण्याचा काम करणाऱ्या नेत्यांना दंगलीत सामील असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना या पवित्रभूमी व महाराष्ट्राचा खरा इतिहास समजून सांगणे गरजेचे आहे. सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन देश व समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी समता, भाईचारा प्रस्थापित करावा असे आव्हान इनामदार यांनी केले.
मौलाना हसरत मोहनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1949 रोजी दिल्ली येथे एकत्रित रोजा इफ्तार केला होता त्या क्षणाची स्मूर्ती व्हावी व त्या रोजा इफ्तारीची आठवण समाजाला करून द्यावी याकरिता महाड येथील चवदार तळे या ठिकाणी मूलनिवासी मुस्लिम मंचाचे वतीने सलग दुसऱ्या वर्षी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रमुख श्री. प्रकाश जमदाडे साहेब. साहित्यिक कलीम अजीम, जमातूल मुस्लिमिन मोहल्ला चारिटेबल ट्रस्ट अध्यक्ष मोहम्मद अली चिपळूणकर, क्रांती भूमी सामाजिक संस्था अनंत कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक काझी, सादिक शेख, महाड येथील जमाते इस्लामी हिंद पदाधिकारी फसीउद्दीन फलाही, मकसूद शेख सर, पुणे महानगरपालिका माजी नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे, पोपट कदम,
अरबाज खान, फैयाज रजनाग, स्यमुद खान, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रम मध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अनेक जिल्ह्यातील माता-भगिनींचा मोठा सहभाग होता. नागपूर येथून आलेल्या एका बुद्ध विहार मंडळाचे ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांनी रोजा इफ्तार पार्टी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना दुवा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या अनेक ऐतिहासिक कार्याची माहिती कार्यक्रमांमध्ये सांगण्यात आली.
stay connected