धामणगाव येथील कमलेश चौधरी याची PSI पदी निवड
आष्टी ( प्रतिनिधी ) आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील कमलेश शहादेव चौधरी या युवकाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. मागील महिन्यात महसूल सहायक म्हणून देखील त्याची निवड झाली होती.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी असलेल्या कमलेश चौधरी यांचे वडील शहादेव चौधरी आणि आई चंद्रकला चौधरी या हे शेतकरी आहेत. कमलेश याने बारावीचे शिक्षण कडा येथील श्रीराम विद्यालयातून घेतले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेत अभ्यास करायचा यासाठी बीए ला कड्याच्या धोंडे महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर अहिल्यानगर येथील न्यू आर्ट कॉलेजमधून एम ए पूर्ण केले . स्पर्धा परीक्षेतून यश मिळवण्यासाठी स्वयं अध्ययन करत अभ्यास सुरू ठेवला. सेट परीक्षेत देखील यश मिळवले . मागील महिन्यात महसूल सहायक म्हणून त्याची निवड झाली . आता नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत देखील त्यांनी यश मिळवले आहे . धामणगावकरांनी कमलेश याच्या दुहेरी यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे
stay connected