*ऐन निवडणुकीच्या तोंडावर, निवडून येण्यापूरत कर्जमाफी देणार म्हणणारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करा-डॉ.जितीन वंजारे*
बीड प्रतिनिधी:- निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी व्हलगणा करणारे व भरघोष मते घेऊन सरकार स्थापन करणारे सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि राज्यातील सर्व मंत्री यांच्यावर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा नोंद करा कारण फक्त निवडणुकी पुरती उदघोषणा करून सरळ सरळ शेतकरी कष्टकरी यांची फसवणूक करून मते लुबाडणाऱ्या येथील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्र्यावर फसवणूकीचा 420 चा गुन्हा नोंद करा नसता बोलल्या प्रमाणे कर्जमाफी चा निर्णय घ्या. स्वतः बोलल्याप्रमाणे वागता येत नसेल तर नैतिकतेने खुर्च्या सोडा खाली करा नसता निवडणूक आयोग आणि महामहीम कोर्ट यांनी सध्याच्या सत्तेतील मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्याशी सर्व मंत्र्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा अशी घोषणा शेतकरी नेते मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना हमी भाव नाही दरवर्षी दहा पटीने खताचे बियांनांचे व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू, यंत्र सामग्री चे भाव वाढत आहेत, महागाई वाढत आहे पण शेताकऱ्यांच्या शेतीमालला जो 2010 मध्ये भाव होता तोच आजही कायम आहे? हा सरळ सरळ शेतकरी फसवणूकीचा धंदा येथील सरकार करत असल्याचा आरोप डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला. 2010 मध्ये कापसाला सात हजार भाव होता त्याकाळी खताची गोणी चारशे रुपायाला होती आजही कपासाला भाव सात हजारच आहे पण खताची गोणी मात्र तीन हजाराला झाली आहे किती फसवणार आहात शेतकऱ्यांना. शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे भारत हा शेतीप्रधान देश आहे मग शेतकऱ्यांचा कणा मोडेपर्यंत त्याला लुटणार आहात का? शेतकऱ्यांच्या मढ्यावरचं लोणी खाणारी येथील सरकारी कृषी व्यवस्था आहे. लोक हवालदिल आहेत पाऊस वेळेवर नाही असमानी आणि सुलतानी संकट पेक्षा आत्ताच सरकारी लुटीच संकट वाढल आहे. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी च येथील राजकारणी व्यवस्था करतात की काय असा प्रश्न येथे निर्माण होत आहे. अश्यातच सत्ता परिवर्तन अन मते मिळवण्यासाठी वाटेल ती प्रलोभने दिली गेली सत्तेत आलो तर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफी देऊ, धनगर आरक्षण देऊ, मराठा आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस आणि त्यांचं सरकार मधील मंत्री आज शेतकऱ्यांनी कर्ज भरून घ्यावे नसता कार्यवाही करु अशी व्हलगणा करत आहेत. किती हा खोटेपणा स्वार्थी लोकांनो सत्ता डोक्यात जाऊ देऊ नका बोलल्या प्रमाणे कर्जमाफी द्या नसता पदांचे राजीनामे द्या आता शेतकऱ्यांनी रस्त्यावर येन गरजेचं आहे. लाडकी बहीण योजना आणि फसवी शेतकरी कर्जमाफी ह्या योजना फक्त मते लुटण्यासाठीच होत्या हे स्पष्ट झाले आहे. येथील निवडणूक आयोग आणि तत्सम सरकारी आयोग येथील स
केंद्राच्या अन राज्याच्या गुलामीला अधीन झाले असून आता फक्त महामहीम कोर्ट यांनी तरी डोळे उघडे करून लेखी प्रलोभाने आणि आस्वासणे देऊन शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण योजना जर बंद पाडली तर सत्ताधारी नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करून येथील शेतकरी आया बहिणींना न्याय द्यावा असे आव्हाहन शेतकरी नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी येथील मा.कोर्ट आणि निवडणूक आयोगाला केले आहे. कायद्यानुसार सत्ता आणण्यासाठी सरकारी तिजोरी वापरने, प्रलोभने, आश्वासने देऊन सत्तेत येणे एक प्रकारचा गुन्हा आहे. मोठमोठी उद्योगपती यांना भरमसाठ कर्ज देऊन येथील सरकारी बँका कंगाल केल्या, उद्योगपती कर्ज बुडवून बाहेरच्या देशात पळून गेली, आणि येथील सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे त्यांच्या लाडक्या बहिणींना वेठीस धरत आहे. हे सरासर चुकीचं आहे. शेतकरी जगला तर देश जगेल नसता खाताल काय अन लेताल काय? पण त्याच शेतकऱ्याला आजपर्यंत खाईत लोटणारी सरकारी यंत्रणा अस्तित्वात आहे. कारण शेतकरी संघटित नाही पण आता शेतकरी हुशार झाला आहे आता आम्ही एकत्र येणार मोठा लढा उभारणार आणि शेतकरी या पंच सूत्री मध्ये कर्जमाफी करूनच घेणार असा निर्धार शेतकरी नेते डॉ जितीन वंजारे यांनी केला आहे. पालकमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पुढील कार्यक्रम राबविणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
शेतकरी कर्जमाफी या वर्षी करणार नसाल तर पळून गेलेले तुमचे संगे सोयरे वापस आना त्यांच्या कडून त्यांना बे भरवसा दिलेले कर्ज मागे घ्या राष्ट्राचा कर्जाचा बोजा कमी करा. आमच्यावर लादलेला कर्जाचा डोंगर खाली करा. आणि शेतकरी कर्जमाफी द्या असा स्पष्ट सवाल डॉ जितीन वंजारे यांनी केला आहे.सरकार सगळ्यां कर्जबुडव्या उद्योजकाला कर्ज देत, फुकट सरकारी जमीन देत,वीज मोफत देत मग शेतकऱ्यांना मोफत वीज आणि पीक कर्ज माफी का देत नाही? ती दिलीच पाहिजे इतकंच.
stay connected