अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन . चिचोंडी पाटील येथे श्रीराम मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम .

 अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन .     
चिचोंडी पाटील येथे श्रीराम मंदिरामध्ये  विविध धार्मिक कार्यक्रम .



      चिचोंडी पाटील प्रतिनिधी संतोष जाधव 

         

सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की, चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर येथे श्री राम मंदीर मध्ये श्री संत ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर पुरीजी महाराज, श्री संत गणेशनाथ महाराज, श्री संत मदन महाराज यांच्या कृपाआशिर्वादाने श्रीरामनवमी जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री संत तुकाराम गाथा पारायण सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे .


सर्व परमार्थ प्रेमी भाविक वृंदास कळविण्यात अतिशय आनंद वाटतो की, भक्त वत्सल पांडुरंगाच्या कृपेने आणि गुरुजनांच्या आशिर्वादाने समाजात प्रेम, सहिष्णुता, सात्विकता, वृध्दिंगत व्हावी. निरपेक्ष सहकार्याचे गाव सर्वांग परिपूर्ण संस्कारक्षम, बलशाली, स्वावलंबी बनावे. परमेश्वर चिंतनाची गोडी रहावी या सदहेतुने चिचोंडी पाटील या आपल्या गावात सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर पुरीजी महाराज यांच्या कृपेने व ह.भ.प. स्वामी रामानंद पुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्वान व गुणवान मंडळींच्या उपस्थितीत हा अखंड हरिनाम सप्ताह

रविवार दिनांक ३० मार्च २०२५ ते रविवार दिनांक ०६ मार्च २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. तरी भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.


दैनंदिन कार्यक्रम

• पहाटे ५ ते ६ काकडा भजन

• सकाळी ७ ते ८ विष्णू सहस्रनाम

• सकाळी ८ ते ११:३० गाथा पारायण दुपारी ११:३० ते २ गाथा भजन

दुपारी ३ ते ५ गाथा पारायण

सायं. ६ ते ७ हरिपाठ


आणि दररोज  रात्री ८ ते १० श्री हरिकीर्तन आणि हरी जागर


रविवार

दिनांक ३० मार्च रोजी

चिचोंडी पाटील येथील

ह.भ.प. वैष्णवी ताई फिसके यांचे कीर्तन

सोमवार

दिनांक ३१ मार्च रोजी

ह.भ.प. दिपालीताई कोकाटे चिचोंडी पाटील यांचे किर्तन

मंगळवार

दिनांक ०१ एप्रिल रोजी विश्वशांती भवन पिंपळा येथील ह.भ.प.नारायण महाराज वाळके यांचे कीर्तन

बुधवार दिनांक ०२ एप्रिल रोजी श्री ज्ञानेश योगाश्रम संस्था डोंगरगण

ह.भ.प. महंत भागवत महाराज जंगले शास्त्री यांचे कीर्तन

गुरुवार दिनांक ०३ एप्रिल रोजी लोणी चे ह.भ.प. रामदासदादा  रकताटे महाराज यांचे कीर्तन

शुक्रवार दिनांक ०४ एप्रिल रोजी चिचोंडी पाटील येथील ह.भ.प. संजय महाराज घोडके यांचे कीर्तन

शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी योगवेदान्त आश्रम अकोळनेर इथल्या ह.भ.प. स्वामी अमृतानंद सरस्वती माताजी यांचे कीर्तन


रविवार दि.०६एप्रिल २०२५  रोजी सकाळी ७ ते साडेनऊ यावेळेत  ग्रंथ आणि  ग्रामदिंडी प्रदक्षिणा होईल.

 त्यानंतर  १० ते १२ यावेळेत श्रीरामतीर्थ सालेवडगाव येथील ह.भ.प.स्वामी रामानंद पुरीजी महाराज  यांचे काल्याचे किर्तन, श्रीराम जन्मोत्सव आणि  त्यानंतर महाप्रसाद होईल.

या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा हि नम्र विनंती कार्यक्रम स्थळ श्री राम मंदीर चिचोडी पाटील

स्वागतोत्सुक समस्त संतसेवक ग्रामस्थ चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.