प्रद्युम्न डाळिंबकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
आष्टी प्रतिनिधी - आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील प्रद्युम्न मोहन डाळिंबकर या युवकाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील शेतकरी मोहन आणि कमल डाळिंबकर या शेतकरी दांपत्याचा प्रद्युम्न मोठा मुलगा. त्याने आष्टी येथील गणेश माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर आष्टीच्या हंबर्डे महाविद्यालयातून बीएससी शिक्षण पूर्ण केले . बारावी नंतर तटरक्षक दलात नाविक म्हणून त्याची निवड झाली होती. मात्र यूपीएससी करण्यासाठी त्याने ती नोकरी सोडून दिली . पोलीस भरतीमध्येही प्रयत्न केला , मात्र तिथे अपयश आले. PSI परीक्षेमध्ये दोनदा प्रयत्न अयशस्वी राहिला . परंतु अपयशाने खचून न जाता त्याने अभ्यास आणि शारीरिक मेहनत या दोन्हीवर लक्ष केंद्रित केले . त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यशाला गवसणी घातली . प्रद्युम्न याच्या यशाबद्दल ब्रह्मगाव ग्रामस्थ आणि गणेश विद्यालयाच्या आणि हंबर्डे महाविद्यालयाच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे .
stay connected