*उद्योग क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविणारे ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांना राज्यस्तरीय लोकाशा भुषण अवार्डने सन्मान*
_पालकमंत्री ना.अजितदादा पवार व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वितरण_
*_उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कडून भरत गित्ते यांचे भाषनातून केले कौतुक_*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
ॲल्युमिनियम मॅन भरत गीते हे भारताला ॲल्युमिनियम उद्योगाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांची दूरदृष्टी निव्वळ व्यवसायापलीकडेही जाते. विकास, शिक्षण आणि देशाच्या विकासाप्रति त्यांची सखोल बांधिलकी आहे. उद्योग क्षेत्रात वेगळी भूमिका ओळख निर्माण करणारे परळीचे भूमिपुत्र ॲल्युमिनियम मॅन भरत केशवराव गिते यांना बीड येथे आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय लोकाशा भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार, मंत्री ना.पंकजाताई मुंडेंच्या प्रमुख उपस्थिती भरत गित्ते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान ॲल्युमिनियम मॅन भरत गिते म्हणाले की, संत ज्ञानेश्वर यांनी म्हटल्याप्रमाणे "इवलेसे रोप लावलेल्या द्वारी | त्याचा वेलू गेला गगनावरी ||" या उक्तीप्रमाणे माझे कार्य सुरू आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी व मला नवी उमेद देणारा आहे. येणाऱ्या काळात उद्योग क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबवून नविन्य पूर्ण दृष्टीकोण उत्कृष्ट नियोजन, रोजगार यासाठी योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वडिलांचे उत्तम संस्कार आपल्यावर झाल्यामुळे आपले जीवन सुखी व समृद्ध झाले आहे. त्यामुळेच आपण इथपर्यंतचा प्रवास करू शकलो हे उपकार कधीच फिटणार नाही. शेतकरी कुटुंबामध्ये जन्म होऊन पण, शिक्षणाचे महत्व जाणणारे व ज्यांच्याकडून उद्योगाचे बाळकडू घेतले असे माझे स्वर्गीय वडील केशवराव गिते यांना हा बहुमान समर्पित करतो असे ते म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडून भरत गिते यांच्या उद्योग क्षेत्रातील कार्याचे भाषणातून केले तोंडभरून कौतुक करत अभिनंदन केले.
बीड येथे लोकाशाच्या वर्धापन दिनानिमित्त दि.31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान लोकाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लोकाशा महोत्सवाचा समारोप राज्याचे उपमुखमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. तसेच याच सोहळ्यात राज्यातील नवरत्नांना लोकाशा भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योग क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. कंपनीचे एमडी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या उद्योजक तथा परळीचे भूमिपुत्र ॲल्युमिनियम मॅन भरत केशवराव गिते यांना लोकाशाच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय नवरत्न लोकाशा भुषण पुरस्कार ना.अजितदादा पवार आणि ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लक्ष रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे होते. भरत गिते यांनी उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. यापूर्वी ही त्यांनी केलेल्या उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे याआधी बऱ्याच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झालेले आहेत. भारतीय उत्पादन क्षेत्रात जागतिक पातळीवरील सर्वोत्तम पद्धतींचा समावेश केलेला असून, मेक इन इंडियात योगदान दिले.तौरल इंडिया हे ॲल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन्स मध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर गेले आहे. औद्योगिक क्षेत्रात ५०० कोटींची गुंतवणूक आणि १,२०० रोजगार निर्मिती यासाठी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सामंजस्य करार केला. हा क्षण प्रत्येक परळीकरासाठी अभिमानाचा ठरला. सामंजस्य करार यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, राज्यातील औद्योगिक विकासाला नवी चालना मिळेल. राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला गती मिळणार आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत लोकाशाच्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षीचा महत्वाचं हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यास उद्योगपती शांतीलालजी मुथ्था, ओमप्रकाशजी चांडक, अभिनेता शयाजी शिंदे, आरोग्यदुत ओमप्रकाश शेटे, अँकर विलास बडे, अँकर निखीला म्हेत्रे, मंगेश चिवटे, हभप महादेव महाराज चाकरवाडीकर, शिवाजी महाराज नारायणगड, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, कुस्तीपट्टू राहूल अवारे, यांच्यासह टीव्ही संपादक रोशन शेठ बंब, कार्यकारी संपादक प्रताप नलावडे, निवासी संपादक उत्तमभाऊ हजारे, उपसंपादक अभिजित नखाते, मुकेश झणझने, व्यवस्थापक अतुल भालशंकर सह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांसह बीड जिल्ह्यातील खासदार, आमदार व सर्व लोकप्रतिनिधींची तसेच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यापारी, पत्रकार, डाॅक्टर्स, यांच्यासह सर्व स्तरातील जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार हा एक आनंद असतो, जो आणखी जास्त जबाबदारी देऊन जातो, असेच समजणारा मी आहे. आज लोकाशा परिवाराने मला इथे पुरस्कार देऊन सन्मानित केले या बद्दल मी पुनःछ संपादक तथा आयोजक विजयराज बंब आणि समूहाचे आभार मानतो. तरुणांनो आपल्याकडे कोरडवाहु जमिनी बरोबरच वंशपरंपरेने जिद्द, चिकाटी प्रचंड मेहनत व दूरदृष्टी या भागाने दिली आहे, तिचा योग्य ठिकाणी वापर कराल तर बीड चे सकारात्मक नाव पुढच्या एका दशकांमध्ये फक्त भारत नाही तर जगाच्या पाठीवर झळकवाल हा माझा विश्वास आहे. तसेच जिल्ह्यात नव उद्योजक घडविण्याचा आपला संकल्प असल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त उद्योजक भरत गित्ते यांनी पत्रकार बांधवाना बोलतांना व्यक्त करतांना सांगितले.
*उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कडून भरत गिते यांचे भाषनातून केले कौतुक*
नंदागौळ या छोट्या खेड्यामध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेलले युवक आज एक यशस्वी उद्योगजक भारताचे ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांना पुरस्कार देण्यात आला. शेतकरी कुटुंबामध्ये जन्म होऊन पण, शिक्षणाचे महत्व जाणणारे व ज्यांच्याकडून उद्योगाचे बाळकडू घेतले. भरत गिते यांनी उद्योग क्षेत्रात परळीसह बीडला राज्याला देशाला नवीन ओळख करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या उद्योग क्षेत्रात कारकीर्दला त्यांनी शुभेच्छा दिल्या. परळी वैद्यनाथ तालुक्यातील नंदागौळ गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. दहावी पर्यंत शिक्षण परळीत पूर्ण केले. लातूर दयानंद कॉलेज मधून अकरावी व बारावी शिक्षण पूर्ण केले. जर्मनी येथे उद्योग क्षेत्रातील उत्कृष्टता, कौशल्यविकास व उत्पादन व्यवस्थापन शिकवले. हे सर्व काही महाराष्ट्रात आपल्या मातीसाठी, लोकांसाठी लागू करण्याच्या संकल्पनेने भारतात परत आलो. मागील दहा वर्षात पुण्यातील चाकण येथे एक सक्षम उद्योग मेक इन इंडियाच्या उपक्रमा अंतर्गत उभा करून ऊर्जा, संरक्षण, रेल्वे आरोग्य या अनेक क्षेत्रात तौरल इंडिया भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सेवा पुरवत आहे. देशातील उद्योग क्षेत्रात भरारी घेतली. आज त्यांच्या तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. कंपनीचा हजारो कोटीचा टर्नवर आहे. हजारोच्या जवळपास कामगार काम करतात. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेत औद्योगिक क्षेत्रात ५०० कोटींची गुंतवणूक आणि १,२०० रोजगार निर्मिती यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. म्हणून भरत गिते यांची ॲल्युमिनियम मॅन म्हणून ओळख निर्माण झाली असे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले. विमान, जहाज बांधणी, ऊर्जा, संरक्षण, रेल्वे आरोग्य अशा अनेक क्षेत्रातसाठी ॲल्युमिनियम पार पार्ट तयार करते. बनवलेलं पार्ट स्वीत्झर्लंड, जर्मनी, अमेरिका, इंग्लड, चायना, साऊथ कोरिया विविध देशात निर्यात होतात.भरत गिते यांच्या उद्योग क्षेत्रातील कार्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडून भाषणातून तोंड भरून कौतुक केले. नवीन पिढीला त्यांनी आवाहन केले की, कष्ट करण्याची ताकत असेल तर माणूस यशस्वी होऊ शकतो काय उभ करू शकतो हे आपण भरत गित्ते यांच्या रूपाने पहिले. चुकीच्या रस्तानी जाऊ नका असे आवाहन उपमुख्यमंत्री ना. अजितदादा यांनी तरुण पिढीला केले आहे.
stay connected